Fact Check: उत्तराखंडच्या आकाशात हात जोडलेला ढग दाखवणारा व्हिडिओ संपादित केलेला आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): आकाशात ढग वेगवेगळे आकार घेत असल्याची कल्पना तुम्ही कधी केली असेल, तर हा रिपोर्ट परिचयाचा वाटेल. ‘देवभूमी’ उत्तराखंडच्या आकाशात प्रार्थना करणाऱ्या हातांच्या जोडीप्रमाणे दिसणारा ढग तयार झाल्याचा, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. परंतु, विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आणि ते, सीजीआय (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी) द्वारे तयार करण्यात आले असल्याचे सिद्ध झाले आहे.

दावा:

फेसबुक युजर, शनमुना बालनने एक व्हायरल व्हिडिओ (आर्काइव्ह लिंक) शेअर करत दावा केला आहे की, “उत्तराखंडमधील जोशीमठ धोक्यात असताना, आकाशात एक विचित्र ढग दिसत आहे, ज्यात एक प्रणाम दिसत आहे. जणू काही लोक, देवभूमीच्या परमात्म्याला आवाहन करत आहेत की, त्यांना विनाशापासून वाचवा.”

तपास:

विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल लेन्स सर्च केले आणि त्यास, फेसबुक आणि ट्विटरवर असेच अनेक दावे सापडले. आम्हाला 15 डिसेंबर, 2022चा आणखी एक फेसबुक व्हिडिओ देखील सापडला आहे, ज्याच्या आतील मजकूर आहे – अमेरिकेच्या आकाशात विचित्र ढग. 

हा व्हिडिओ सुरुवातीला, ‘@myuz_gaza1’ नावाच्या युजरने टिक टॉकवर पोस्ट केला होता. भारतात टिक टॉकवर बंदी असल्याने आणि त्याची प्रोफाइल लिंक उघडली न गेल्यामुळे, आम्ही अधिक माहितीसाठी त्याच्या स्नॅपचॅट, यूट्यूब आणि फेसबुक प्रोफाइलचा शोध घेतला.

तिथे आम्हाला आकाशात ढगांच्या रूपात देवदूतांचे आणि बरेच काही तसेच व्हिडिओ सापडले.

आम्हाला गाझा क्रू नावाचे आणखी एक फेसबुक पेज सापडले, ज्यात आम्हाला त्याचा व्हॉट्सअॅप नंबर आणि ईमेल आयडी मिळाली. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘नाही, हे चित्र काल्पनिक आहे. मी ते माझ्या टिक टॉक चॅनेल, Myuzgaza1 वर डिझाइन
केले होते.”

मानवी डोळ्याने ढगांमध्ये ओळखीचे दिसणारे आकार निवडणे ही असामान्य बाब नाही; या घटनेला ‘पॅरिडोलिया‘ म्हणतात. परंतु, चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या व्हिडिओचे वेगवेगळे प्रभाव आणि परिणाम आहेत. 

अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विश्वास न्यूजने जागरण न्यू मीडियाचे मोशन ग्राफिक्स डिझायनर (एव्ही टीम), संजय जेमिनी यांच्याशी संवाद साधला. अशी कामे संगणक ग्राफिक्समधून करता येतात आणि त्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, जीएफएक्स (आफ्टर इफेक्ट) त्यापैकी एक आहे.

शेवटी व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे विलक्षण हात जोशीमठसाठी प्रार्थना करत आहेत, आम्ही चमोलीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अभिषेक त्रिपाठी यांच्याशीही संपर्क साधला, ज्यांनी पुष्टी केली की, “ही क्लिपिंग जोशीमठची नाही. एवढ्या मोठ्या इमारती जोशीमठात नाहीत.

युजरच्या सोशल स्कॅनमध्ये त्याचे फेसबुकवर 910 मित्र असल्याचे दिसून आले.

निष्कर्ष: ‘देवभूमी’ उत्तराखंडच्या आकाशात दिसणारी प्रार्थना करणाऱ्या हातांच्या जोडीप्रमाणे दिसणारी ढगनिर्मितीची सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट, सीजीआय (CGI) निर्मित आणि आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट