Fact Check: सैनिकाचा हा इमोशनल व्हिडिओ एका चित्रपटाचा सीन आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल क्लिप एका चित्रपटातील सीन आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक भावुक सैनिक दिसतो. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा एका सत्य घटनेचा व्हिडिओ आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. हे एका चित्रपटातील दृश्य आहे.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल व्हिडिओ मध्ये एक भावुक सैनिक दिसत आहे. पोस्ट सोबत लिहले आहे: Soldier says goodbye to family during war
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
तपासाच्या सुरुवातीला आम्ही ह्या व्हिडिओच्या किफ्रेम्स गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला युट्युब वर एक व्हिडिओ मिळाला ज्यात व्हायरल व्हिडिओ च्या सुरुवातीचे २० सेकंड्स बघितले जाऊ शकतात. याला بهاء الكاظمي नावाच्या युट्युब चॅनेल ने अपलोड केले होते. हा व्हिडिओ १५ ऑगस्ट २०१७ रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन प्रमाणे, हा एक चित्रपट आहे, ज्याला बहा अल-काज़ेमी नावाच्या डायरेक्टर ने बनवला. डिस्क्रिप्शन प्रमाणे, यात एका इराकी महिलेची गोष्ट सांगितली आहे, जिचा मुलगा सैनिक होता आणि आईएसआईएस सोबत लढताना मारल्या गेला.

इंटरनेट वर सर्च केल्यावर आम्हाला कळले कि डायलिंग नावाच्या या चित्रपटात मेनहेल अब्बास यांनी सैनिकांची भूमिका पार पडली. ते एक अरबी कलाकार आहे. मेनहेल ने हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला.

आम्हाला इंटरनेट वर या चित्रपटाबद्दल अजून माहिती मिळाली. हा चित्रपट 2015मध्ये रिलीज झाला होता.
या विषयाबद्दल आणि अधिक पुष्टीसाठी विश्वास न्यूज ने मेनहेल अब्बास यांना संपर्क केला. मेसेज ला रिप्लाय देत असताना ते म्हणाले, कि या क्लिप मध्ये दिसत असलेला व्यक्ती ते स्वतः आहेत. हा व्हिडिओ डायलिंग हा २०१५ साली रिलिज झालेल्या चित्रपटातील सीन आहे.

या पोस्ट ला बरेच लोकं खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहेत. यातील एक म्हणजे, উৎসর্গিত-U T S H O R G I T O हा फेसबुक यूजर. सोशल स्कॅनिंग मध्ये कळले कि फेसबुक वर त्यांचे 147 हज़ार फ़ॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल क्लिप एका चित्रपटातील सीन आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट