X
X

Fact Check: भाजप मंत्र्यानी जोड्यानी मारण्याची धमकी देणाऱ्या शो चा हा स्क्रीनशॉट मॉर्फ्ड आहे

भाजप मंत्री यांनी रोजगार मागत असलेल्या विद्यार्थ्यांना जोड्यानी मारण्याची धमकी दिली असा R भारत चॅनेल चा व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट खोटा आहे. हा फोटोशॉप चा वापर करून बनवण्यात आला आहे.

  • By: Amanpreet Kaur
  • Published: Oct 1, 2020 at 03:09 PM
  • Updated: Oct 1, 2020 at 03:17 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर Rभारत या न्यूज चॅनेल चा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या चॅनेल चा एक शो, ‘पूछता है भारत’ याचा तो स्क्रीनशॉट आहे, ज्याचे एंकर चॅनेल चे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी आहेत. स्क्रीनशॉट मध्ये दावा केला जात आहे कि रोजगार ची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजप मंत्रीनी जोड्यानी मारण्याची धमकी दिली आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि व्हायरल होत असलेले पोस्ट फोटोशॉप च्या मदतीने तयार केले आहे आणि ते खोटे आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वर व्हायरल होत असेलेल्या या पोस्ट ला एडवोकेट लखन गुप्त नावाच्या यूजर ने शेअर केले आहे. पोस्ट मध्ये R भारत चॅनेल चा शो, पूछता है भारत’ चा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात लिहले आहे, “सीएम या गुंडा.? रोजगार मांग रहे छात्रों को भाजपा मंत्री ने दी जूतों से मारने की धमकी। नौकरी मांगना देशद्रोह है.?
पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल पोस्ट चा तपास सुरु करायच्या आधी सगळ्यात आधी आम्ही इंटरनेट वर कीवर्ड च्या मदतीने व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये सांगितली गेलेली बातमी सर्च केली, पण आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही, ज्यात भाजप च्या कुठल्या नेत्याने असे म्हंटल्याचे स्पष्ट होत असेल. जर कुठल्या भाजप मंत्र्याने असे वक्तव्य केले असते तर ते नक्कीच बातम्यांमध्ये आढळले असते.

या नंतर आम्ही R भारत चा शो, ‘पूछता है भारत’ चे व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चैनल वर शोधले. पण आम्हाला असा कुठलाच व्हिडिओ सापडला नाही, ना त्यांनी असा कुठला एपिसोड घेतला होता, ज्यात या गोष्टीचा उल्लेख असेल.

आम्ही त्या शो च्या प्लेट चे आणि व्हायरल स्क्रीनशॉट ची तुलना केली, त्यात आम्हाला बरेच फरक दिसले.

-व्हायरल पोस्ट चा मजकूर आणि R भारत चैनल च्या शो चा मजकूर या दोखांमध्ये काहीच साम्य नाही आहे.

  • R भारत चैनल मोठ्या फॉन्ट चा उपयोग करतात
  • व्हायरल पोस्ट मध्ये R SUBSCRIBE हा सिम्बॉल, ‘नौकरी मांगना देशद्रोह है?’ या वाक्याखाली लपल्याचा दिसतो, पण खऱ्या व्हिडिओ मध्ये हा लोगो स्पष्ट दिसतो.
  • व्हायरल पोस्ट मध्ये काही चुका देखील आहे. या व्हायरल पोस्ट मध्ये भाषा आणि व्याकरणाच्या बऱ्याच चुका दिसतात.

विश्वास न्यूज ने R भारत च्या सिनियर एग्जीक्यूटिव एडिटर अभिषेक कपूर यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि त्यांच्या न्यूज चॅनेल वर अशी कुठलीच बातमी त्यांनी चालवली नाही. त्यांनी असे देखील सांगितले कि व्हायरल होत असलेले स्क्रीनशॉट मॉर्फ्ड आहे. तसेच R भारत चॅनेल अश्या भाषेचा उपयोग करत नाही असे देखील त्यांनी सांगितले.

फेसबुक वर हि पोस्ट ‘एडवोकेट लखन गुप्त’ यांनी शेअर केली आहे. जेव्हा आम्ही या यूजर ची प्रोफाइल स्कॅन केली तेव्हा असे कळले, कि यूजर इलाहाबाद, उत्तर प्रदेश चा रहिवासी आहे आणि इलाहाबाद हाईकोर्ट मध्ये ते वकील आहेत.

निष्कर्ष: भाजप मंत्री यांनी रोजगार मागत असलेल्या विद्यार्थ्यांना जोड्यानी मारण्याची धमकी दिली असा R भारत चॅनेल चा व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट खोटा आहे. हा फोटोशॉप चा वापर करून बनवण्यात आला आहे.

  • Claim Review : R भारत चॅनेल ने बातमी चालवली कि भाजप मंत्र्यानी बेरोजगार विद्यार्थ्यांना जोड्याने मारण्याची धमकी दिली आहे.
  • Claimed By : एडवोकेट लखन गुप्त
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later