वॉट्सऐप वर केबीसी च्या नावे व्हायरल होत असलेला मेसेज ज्यात सांगण्यात येत आहे कि लोकांना २५ लाख रुपयांची लॉटरी लागू शकते, तो मेसेज खोटा आहे. या फसवेगिरीला बाली पडल्यास लोकांचे आर्थिक नुकसान हू शकते.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोड़पति (KBC) याच्या नावावर एक दावा व्हायरल होत आहे. हा दावा ऑडिओ आणि पोस्ट च्या स्वरूपात व्हायरल होत आहे. लोकांना वॉट्सऐप वर ऑडिओ मेसेज आणि इमेज च्या स्वरूपात हि पोस्ट मिळत आहे, ज्यात २५ लाख रुपये लॉटरी लागण्याचा दावा केला जात आहे. विश्वास न्यूज ला आपल्या वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर पण बऱ्याच यूजर्स ने हा दावा फॅक्ट-चेक साठी पाठवला. विश्वास न्यूज च्या तपासात, KBC च्या नावावर लॉटरी लागायचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरला. असा दावा या आधी देखील व्हायरल होत होता, आणि त्याला भुलून बऱ्याच लोकांचे आर्थिक नुकसान देखील झाले.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या वॉट्सऐप चैटबॉट वर इमेज आणि ऑडियो स्वरूपात, केबीसी चा कथित ज्यात २५ लाख रुपयांची लॉटरी लागते तो व्हायरल दावा मिळाला आहे. आमच्या वाचकांनी या मागचं सत्य जाणून घेण्यास आम्हाला संपर्क केला.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी महत्वाचे कीवर्डस जसे कि kbc, 25 lakh आणि lottery हे वापरून, इंटरनेट वर याचा तपास करण्यास सुरुवात केली. जर का जसे या पोस्ट मध्ये सांगितले आहे, तशी २५ लाखाची लॉटरी जर लोकांना लागत असती तर या बद्दल नक्कीच कुठे ना कुठे बातमी आली असती, आणि बऱ्याच मीडिया हाऊसेस नि या बातमीला चांगलेच कव्हरेज दिले असते. आम्ही इंटरनेट वर सर्च केल्यास आम्हाला अशी कुठलीच बातमी सापडली नाही.
या उलट आम्हाला अश्या अधिकृत मीडिया हाऊसेस च्या बातम्या नक्की मिळाल्या, ज्यांनी असे नमूद केले कि सोशल मीडिया वर सध्या व्हायरल होत असलेला मजकूर ज्यात असे म्हंटले आहे कि लोकांना केबीसी तर्फे २५ लाख रुपये लॉटरी लागू शकते तो एक फ्रॉड आहे. टाइम्स ऑफ इंडिया ची ८ सप्टेंबर २०२० ची अशीच एक रिपोर्ट आम्हाला मिळाली, ती तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता.
लुधियाना च्या या रिपोर्ट मध्ये स्पष्ट सांगितले गेले आहे कि लोकांना केबीसी च्या नावे वॉट्सऐप वर २५ लाख रुपये लॉटरी लागण्याचा मेसेज आणि छायाचित्र मिळत आहे. लोकांना पैसे मिळण्यासाठी एका लिंक वर क्लिक करण्यास सांगण्यात येत आहे. रिपोर्ट मध्ये, एसीपी (साइबर क्राइम) प्रमाणे या मेसेज ला खोटे आणि हानिकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट मध्ये असे सांगितले आहे कि साइबर एक्सपर्ट प्रमाणे, अश्या कुठल्याच कॉल किंवा मेसेज वर विश्वास करू नये. तसेच त्यात सांगितलेल्या कुठल्या लिंक वर क्लिक केल्यास, मोठे आर्थिक नुकसान हू शकते.
विश्वास न्यूज ला पुढच्या तपासात 29 सितंबर 2020 रोजी प्रकाशित दैनिक जागरण ची एक रिपोर्ट मिळाली. त्यात केबीसी च्या १२ वा सीजन हा सोनी लिव या वाहिनी द्वारे घेण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यात, ‘हर दिन 10 लखपति’ या प्राईझ प्लॅन ची माहिती दिली आहे. त्या प्रमाणे सोनीलिव ने केबीसी प्ले अलॉन्ग
मध्ये प्रतिदिन, १० लखपती याची सुरुवात केली आहे. त्यात लोकं सोनी लिव एप्लीकेशन द्वारे सहभागी हू शकतात. त्यात दररोज, १० विजेते एक-एक लाख रुपये जिंकू शकतात. या रिपोर्ट ला तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकतात. यात कुठेच व्हायरल मेसेज मध्ये सांगितल्या प्रमाणे २५ लाख रुपये मिळण्याचा दावा केला गेलेला नाही.
विश्वास न्यूज ने वाट्सऐप चैटबॉट वर मिळालेल्या इमेज ला सरळ सोनी टीवी सोबत ट्विटर वर शेअर केले आणि खरे काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. @SonyLIV ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून आम्हाला उत्तर दिले आणि सांगितले कि हा ऑफर त्यांच्या द्वारे चालवण्यात आलेला नाही. @SonyLIV ने असे देखील सांगितले कि हि फसवेगिरी आहे आणि तसेच या प्रकरणाला ते कायदेशीर रित्या हाताळतील असे देखील सांगितले.
निष्कर्ष: वॉट्सऐप वर केबीसी च्या नावे व्हायरल होत असलेला मेसेज ज्यात सांगण्यात येत आहे कि लोकांना २५ लाख रुपयांची लॉटरी लागू शकते, तो मेसेज खोटा आहे. या फसवेगिरीला बाली पडल्यास लोकांचे आर्थिक नुकसान हू शकते.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923