Fact Check: रोहित आणि सूर्यकुमार यांचा संपादित व्हिडिओ शेअर करून मुंबई इंडियन्स सोडल्याचा दावा खोटा

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जात आहे की, रोहित शर्माशी बोलल्यानंतर सूर्यकुमार भावूक झाला आणि म्हणाला की तो आणि बुमराह, मुंबई इंडियन्स सोडणार आहेत.विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची चौकशी केली. ती बनावट असल्याचे सिद्ध झाले. दोन वेगवेगळ्या काळातील व्हिडिओ एकत्र करून ही बनावट पोस्ट तयार करण्यात आली आहे. जुलै 2022च्या इंस्टा लाइव्हच्या व्हिडिओशी छेडछाड करून व्हायरल पोस्ट तयार करण्यात आली आहे.काय होत आहे व्हायरल 

21 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ पोस्ट करताना, इंस्टा हँडल दीपक यादवने लिहिले की, रोहित सरांशी बोलल्यानंतर भावूक झाला सूर्या.

व्हिडिओमध्ये सूर्य कुमार यादव भावूक झाल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडीओच्या वर लिहिले आहे की, “रोहित सरांशी बोलल्यानंतर भावूक झाला सूर्या आणि म्हणाला की मी आणि बुमराह मुंबई सोडू कारण मुंबई इंडियन्सने सगळ्यांचे मन मोडले आहे.”

व्हायरल पोस्टचा मजकूर जसा आहे तसा इथे लिहिला आहे. तो खरा असल्याचे मानून इतर वापरकर्तेही त्यास व्हायरल करत आहेत. या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.

तपास 

या व्हायरल पोस्टची चौकशी करण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम गुगल ओपन सर्च टूलचा वापर केला. व्हायरल पोस्टच्या आधारे काही कीवर्ड तयार करून गुगलमध्ये सर्च करण्यात आले. भास्‍कर डॉट कॉम वर आम्हाला एक वर्ष जुनी बातमी मिळाली. त्यात नमूद केलेला व्हिडिओ ऋषभ पंतच्या इंस्टा लाइव्हशी संबंधित आहे. त्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांचा समावेश होता.

तपास पुढे नेत, यूट्यूबवर कीवर्डच्या आधारे शोध घेण्यात आला. आम्हाला स्पोर्ट्स टुडे नावाच्या यूट्यूब चॅनेलवर मूळ व्हिडिओ सापडला. त्यास 27 जुलै 2022 रोजी अपलोड केल्याचे सांगून, ऋषभ पंत, रोहित शर्मा, यूजी चहल, एमएस धोनी सुद्धा इन्स्टा लाईव्हवर सामील झाल्याची माहिती देण्यात आली. 

विश्वास न्यूजने 40 मिनिटांचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. 12 मिनिटे आणि 5 सेकंदांनंतर, आम्ही व्हायरल पोस्टचा तो भाग पाहिला, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव डोळे चोळताना दिसत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये याच क्लिपचा वापर करण्यात आला आहे.

तपासाच्या पुढील टप्प्यात दैनिक जागरणचे क्रीडा संपादक अभिषेक त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. व्हायरल झालेला व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर केला. त्यांनी तो पाहिल्यानंतर तो बनावट असल्याची खात्री केली. व्हायरल पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे सूर्यकुमार यादव याने असे काहीही सांगितलेले नाही.

तपासाअंती बनावट पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याची सखोल चौकशी करण्यात आली. इंस्टाग्राम हँडल दीपक यादवला 32 हजार लोक फॉलो करतात. या हँडलवर आतापर्यंत 400 हून अधिक पोस्ट करण्यात आल्या आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजद्वारे करण्यात आलेल्या तपासात व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे सिद्ध झाले. जुलै 2022 च्या इंस्टा लाइव्ह व्हिडिओमधील दोन क्लिप संपादित करून बनावट पोस्ट तयार करण्यात आली आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट