विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल दावा खोटा आहे. मध्य प्रदेश मध्ये महिलांसाठी दारूचे वेगळे दुकान सुरु होत नाही आहे. हा प्रस्ताव 2020 मध्ये काँग्रेस सरकार ने ठेवला होता.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका बातमीचे कटिंग व्हायरल होत आहे, ज्यात लिहले होते, “महिलाओं के लिए अलग से दुकान खोलेगी सरकार. भोपाल, इंदौर, जबलपुर से होगी शुरुआत।” ह्या शेअर करून दावा करत आहेत कि हि बातमी आताची आहे आणि मध्य प्रदेश मध्ये बीजेपी सरकार ने हा प्रस्ताव पारित केला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. मध्य प्रदेश मध्ये महिलांसाठी दारू चे वेगळ्याने दुकान उघडण्याचा प्रस्ताव हा 2020 मध्ये काँग्रेस च्या सरकारच्या वेळी झाला होता.
काय होत आहे व्हायरल?
Himani Singh नावाच्या फेसबुक यूजर ने व्हायरल पोस्ट शेअर करून लिहले: बस यही फर्क है हम पढ़ाएंगे वह पिलाएंगे। कांग्रेस बेटियों को उच्च शिक्षा के लिए प्रोत्साहित करने के लिए मोबाइल और स्कूटी देगी। और भाजपा महिलाओं के लिए शराब की दुकान खोलेगी।#यूपीकीबेटीकोस्कूटी
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये पीपुल्स ब्यूरो लिहले आहे. किवर्ड सर्च सोबत शोधल्यावर आम्हाला कळले कि हि बातमी पीपुल्स समाचार नावाच्या वृत्तपत्रात 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रकाशित झाली होती. तेव्हा राज्यात काँग्रेस ची सत्ता होती.
आम्हाला हि बातमी outlookindia.com, indiatimes.com , india.com , oneindia.com वर देखील मिळाली. सगळ्या बातम्या फेब्रुवारी, मार्च 2020 मधल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस ची सत्ता होती आणि कमलनाथ मुख्यमंत्री होते.
अजून शोधल्यावर आम्हाला मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चा 28 फेब्रुवारी 2020 चा एक ट्विट मिळाला, ज्यात त्यांनी निराशा दर्शवली.
आम्ही ह्या बाबत अधिक पुष्टी करण्यासाठी दैनिक जागरण चे सहयोगी वृत्तपत्र नईदुनिया चे भोपाळ चे संवाददाता दीपक विश्वकर्मा ह्यांना संपर्क केला. त्यांनी ह्या विषयी मध्य प्रदेश चे आबकारी आयुक्त राजीव दुबे ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “असा कुठलाच प्रस्ताव सरकार ने पारित केला नाही. सोशल मीडिया वरची पोस्ट खोटी आहे. विभाग अशी कुठलीच तयारी करत नाही, ना तसे निर्देश मिळाले आहे.”
हि पोस्ट Himani Singh नावाच्या यूजर ने शेअर केली. त्यांना 23,207 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल दावा खोटा आहे. मध्य प्रदेश मध्ये महिलांसाठी दारूचे वेगळे दुकान सुरु होत नाही आहे. हा प्रस्ताव 2020 मध्ये काँग्रेस सरकार ने ठेवला होता.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923