Fact Check: चीन च्या ड्रॅगन परेड चा व्हिडिओ केरळ मधील दीपोत्सवाच्या नावाने व्हायरल

दक्षिण चीनमधील गुआंगशी येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नदीत ड्रॅगन परेड आयोजित केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा केरळमधील दिव्यांचा सण असल्याचा भ्रामक दावा केला जात आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांनी सजवलेल्या बोटी एका नदीत एका विशिष्ट लयीत फिरताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून असे दिसते की अजगर नदीत हळू चालत आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याचा दावा केला जात आहे, जिथे नदीत 240 बोटी घेऊन दिवाळीचा सण साजरा केला जात होता.

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ केरळमधील नसून चीनमधील युलोंग नदीत आयोजित ड्रॅगन फेस्टिव्हलचा आहे, जो भ्रामक दावा करून व्हायरल केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर ‘Himanshu Bhattacharjee’ ने व्हायरल व्हिडिओ (आर्काइव लिंक) शेअर करून लिहले, ”Deepotsavam in the river with 240 boats in Kerala. Enjoy watching the wonderful video.”

https://twitter.com/Himanshusb2/status/1589673093089628160?s=20&t=RLAqUIkIPRabC5_RWAV-1w

सोशल मीडियावरील इतर अनेक युजर्सनी हा व्हिडीओ सामायिक केला आहे आणि अशाच प्रकारचे दावे केले आहेत. यूट्यूबवरील इतर अनेक वापरकर्त्यांनीही हा व्हिडिओ शेअर केला असून, याला केरळचा दीपोत्सव असे वर्णन केले आहे.

तपास:

व्हायरल व्हिडिओच्या की-फ्रेम्सच्या Google रिव्हर्स सर्चमध्ये न्यू चायना टीव्हीच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला सुमारे चार महिने जुना व्हिडिओ सापडला, जो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी जुळतो.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दक्षिण चीनमधील गुआंगशी येथे आयोजित ड्रॅगन परेडचा आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कंदीलांनी सजवलेल्या बोटींची परेड आयोजित केली जाते.

हा व्हिडिओ पाच महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आलेल्या आणखी एका यूट्यूब चॅनलवरही आढळून आला आहे. यामध्ये हा व्हिडिओ चीनचाही सांगण्यात आला आहे.

शीन्हुआ एजन्सीचा हवाला देत www.news.cn वेबसाइटवर प्रकाशित झालेला अहवाल संबंधित कीवर्डसह शोधला गेला आहे आणि त्यातही त्याचे वर्णन चीनमधून केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत विश्वास न्यूजने केरळच्या माध्यमम दैनिकाचे संपादक फिरोज खान यांच्याशी संपर्क साधला. “व्हायरल व्हिडिओ केरळशी संबंधित नाही आणि त्याचा ऑडिओ मल्याळी भाषेत नाही,” ते म्हणाला.

भ्रामक दावा करून व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरला ट्विटरवर 300 हून अधिक लोक फॉलो करत आहेत.

निष्कर्ष: दक्षिण चीनमधील गुआंगशी येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नदीत ड्रॅगन परेड आयोजित केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा केरळमधील दिव्यांचा सण असल्याचा भ्रामक दावा केला जात आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट