X
X

Fact Check: कोविड-19 बरा करण्यासाठी चिकू वापरावे, हा दावा खोटा, व्हायरल चित्र एडिटेड आहे

चिकू हे फळ कोरोनाव्हायरस ठीक करत नाही, व्हायरल दावा खोटा आहे तसेच व्हायरल चित्र देखील एडिट केलेले आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये, टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीचे छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बातमीचे हेडलान “चीकू द कोविड किलर” असे दिले आहे. लेखात असा दावा करण्यात आला आहे की चिकूचे फळ कोविड-19 बरा करू शकते.

विश्वास न्यूज ने पोस्ट चा तपास केला, त्यात कळले कि हा दावा खोटा आहे आणि चित्र देखील एडिट केलेले आहे.

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्रात “चीकू द कोविड किलर” या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या बातमीचे छायाचित्र पाहिले जाऊ शकते. लेखात असे लिहिले आहे की, “कोविड-19 चा उपचार स्थानिक फळात सापडला आहे, ज्याला सामान्यतः चिकू म्हणून ओळखले जाते.”

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल होत असलेला फोटो काळजीपूर्वक बघूनच विश्वास न्यूजने तपास सुरू केला. आम्हाला कळले की फोटो स्पष्टपणे बदलला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या कथित बातम्यांच्या प्रतिमेमध्ये आवृत्तीचा उल्लेख किंवा तारीख नाही. हे तपशील सहसा वर्तमानपत्राच्या हेडलाईन मध्ये नमूद केले जाते.

फॉन्ट आणि टेक्स्ट फॉरमॅटमध्येही तफावत असल्याचे आम्हाला आढळले. जेव्हा आम्ही टाइम्स ऑफ इंडियाची वेबसाइट तपासली तेव्हा आम्हाला कळले की त्यात व्हायरल पोस्टमध्ये दिसत असलेल्या डिजिटल आवृत्तीमध्ये प्रकाशित केलेला असा कोणताही लेख नाही.

आम्ही विविध अधिकृत रिपोर्ट्स वर संशोधन केले, परंतु त्यापैकी कुठल्याही रिपोर्ट मध्ये असे सांगितले नाही कि चिकू मुळे COVID-19 बरा हू शकतो.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW), किंवा ICMR यांनी कोविड-19 साठी उपलब्ध उपचारांच्या यादीत चिकूचा समावेश केलेला नाही.

पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, चिकू हे जीवनसत्त्वे E, A आणि C चे भांडार आहे, जे सर्व त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि त्यात आश्चर्यकारक मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. ऍस्कॉर्बिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती सुरकुत्या कमी करण्यात मदत करते आणि आपली त्वचा कोमल बनवते.

परंतु, चिकूने कोविड-19 बरा होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

विश्वास न्यूजने डॉ. अनंत पाराशर, जनरल फिजिशियन आणि विशेषज्ञ ह्यांना संपर्क केला, ज्यांनी कोरोना व्हायरसने ग्रस्त रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर उपचार केले आहेत. “चिकू हे अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले फळ आहे आणि ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकते. पण, हा कोरोनावर इलाज नाही,” असे त्यांनी सांगितले.

आम्ही व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या ‘हेल्थ एंड एजुकेशन फॉर ऑल’ हा फेसबुक पेज स्कॅन केला. पेजचे 1866 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: चिकू हे फळ कोरोनाव्हायरस ठीक करत नाही, व्हायरल दावा खोटा आहे तसेच व्हायरल चित्र देखील एडिट केलेले आहे.

  • Claim Review : चिकू ने बरा होतो कोरोनाव्हायरस
  • Claimed By : FB User-Health & Education for all
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later