Fact Check: हे चॉकलेट ब्रँड नाही देत आहे मोफत चॉकलेट हॅम्पर, व्हायरल लिंक वर क्लीक करू नका

हे चॉकलेट ब्रँड नाही देत आहे फ्री चॉकलेट हॅम्पर आणि तसेच या कंपनीचा ७०वा वर्धापन दिन नाही आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज च्या व्हाट्सअँप चॅट-बोट नंबर 9599299372 वर एक पोस्ट आम्हाला फॅक्ट चेक करण्यास आमच्या वाचकांनी पाठवली. या पोस्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि, कॅडबरी इंडिया आपली ७०व वर्धापन दिनाच्या सरावर चॉकलेट बास्केट गिफ्ट हॅम्पर देत आहे. या हॅम्पर ला मिळवण्यासाठी पोस्ट सोबत एक लिंक दिली गेली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे आणि पोस्ट सोबत दिलेली लिंक एक स्कॅम आहे.

काय होत आहे व्हायरल?
या पोस्ट मध्ये दिलेल्या मजकुराचा मराठी अनुवाद आहे: कॅडबरी इंडिया आपल्या ७०व्या वर्धापन दिन साजरा करत आहे आणि त्या निमित्त लोकांना फ्री चॉकलेट बास्केट गिफ्ट हॅम्पर देत आहे. हॅम्पर मिळवण्यासाठी या लिंक वर क्लीक करा. http://bit.ly/2KMRvYx

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात, भारतात कॅडबरी चे उत्पादन करणाऱ्या मोंडेलेज इंडिया ला इमेल द्वारे संपर्क साधून केले. कंपनीच्या रिस्पॉन्स सेल ने आम्हाला उत्तर दिले: आम्हाला काही यूजर्स ने व्हायरल होत असलेल्या पोस्ट बद्दल सांगितले. यात सांगितले जात आहे कि कॅडबरी द्वारे फ्री हॅम्पर देण्यात येत आहे. हि पोस्ट आम्ही बनवली नाही आणि आमची कंपनी असा कुठला ऑफर देखील लोकांना देत नाही. आम्ही लोकांना विनंती करतो कि लोकांनी यात दिलेल्या लिंक वर क्लीक करू नये आणि आपल्या पर्सनल डिटेल्स देऊ नये. तुमची सेक्युरिटी आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही या गोष्टी वर लौकरात लौकर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू.

व्हायरल पोस्ट सोबत दिलेली लिंक हि मोंडेलेज इंटरनेशनल ची नाही आहे. पहिले या कंपनी ला कॅडबरी च्या नावाने ओळखले जायचे. सोबतच २०२० मध्ये हि कंपनी आपले ७० वर्ष पूर्ण करत नाही आहे आणि ना कॅडबरी च्या प्रॉडक्ट्स चा फ्री हॅम्पर ते देत आहेत. कंपनी ने या प्रकारचा कुठलाच ऑफर जारी केला नाही. जर असे काही असते तर ७०व्या वर्धापन दिनाची माहिती त्यांच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध असती आणि लोकांनी ती नक्की शेअर केली असती.

त्या सोबतच व्हायरल पोस्ट मध्ये दिलेली लिंक यूजर्स ला कोणती ना कोणी एक्स्टेंशन डाउनलोड करण्यास सांगते, हि लिंक एक स्कॅम असू शकते आणि ज्या कोणत्या डिवाइस मध्ये डाउनलोड केली असेल त्यातून डेटा देखील चोरला जाऊ शकतो.

आम्हाला २०१८ साचा फेसबुक वर एक पोस्ट मिळाला, ज्यात एका यूजर ने कॅडबरी ला टॅग करून व्हायरल मेसेज बद्दल माहिती मागितली होती. याच्या उत्तरात देखील कॅडबरी ने माहिती दिली: आम्हाला हि माहिती पाठवण्यासाठी धन्यवाद. हे कॅडबरी चे प्रोमोशन नाही आहे आणि आम्ही ग्राहकांना अपील करत आहे कि या मेसेजस पासून सावध रहा. आम्हाला हा मेसेज सांगण्याबद्दल आणि आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

निष्कर्ष: हे चॉकलेट ब्रँड नाही देत आहे फ्री चॉकलेट हॅम्पर आणि तसेच या कंपनीचा ७०वा वर्धापन दिन नाही आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट