Fact Check: पीएमच्या विरोधात भाजप प्रवक्ते गौरव भाटिया ने नाही केले वक्तव्य, अपूर्ण व्हिडिओ होत आहे व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात असे समोर आले की गौरव भाटिया यांच्या विरोधात अपप्रचार करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपूर्ण विधान व्हायरल केले गेले होते. त्यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान करणारे वक्तव्य केलेले नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांची सहा सेकंदांची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर लोकशाहीचा अपमान होत असल्याचे कथितपणे ऐकू येते. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली. हे दिशाभूल करणारे ठरले. वास्तविक भाजपचे प्रवक्ते काँग्रेसवर हल्लाबोल करत होते. काँग्रेसवर हल्लाबोल करताना त्यांनी आपले म्हणणे मांडले, मात्र सोशल मीडियावर काही लोकांनी त्यांचे विधान संपादित करून अपप्रचाराच्या उद्देशाने व्हायरल केले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज शानू कॉक्‍स ने 23 जानेवारी रोजी एक व्हिडिओ क्लिप अपलोड करून लिहले: लोकतंत्र का अपमान तब होता है जब श्री नरेंद्र मोदी प्रधानमन्त्री बनते हैं देश के।

व्हिडिओ असे सांगून व्हायरल होत आहे कि भाजप प्रवक्ता गौरव भाटिया ने पीएम चा अपमान केला.

दुसरे यूजर्स देखील हा दावा व्हायरल करत आहेत. या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम इनव्हिड टूल चा वापर केला. त्यात व्हायरल झालेला व्हिडिओ अपलोड करून अनेक स्क्रीनशॉट घेतले. यानंतर गुगल रिव्हर्स इमेज टूलद्वारे त्यांचा शोध घेण्यात आला. आम्हाला आज तकच्या यूट्यूब चॅनेलवर मूळ व्हिडिओ सापडला. 21 जानेवारी रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ आज तकच्या हल्ला बोल कार्यक्रमाचा होता. व्हिडिओमध्ये, गौरव भाटिया 13:43 मिनिटांनंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांना उत्तर देताना ऐकले जाऊ शकतात, “ते म्हणाले की तुम्ही आमच्या पक्षाध्यक्षांचा अपमान करता. त्यांच्या मते लोकशाहीचा अपमान होत आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर लोकशाहीचा अपमान होतो. चौकीदार चोर असल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यानंतर राहुल गांधींनी कान पकडून माफी मागितली.”

तपास सुरू असताना विश्वास न्यूजने भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवनीश त्यागी यांच्याशी संवाद साधला. गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना वेगळ्या संदर्भात हे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओमध्ये एडिट केले जात असून तो खोटा दावा करून शेअर केला जात आहे.

तपासाच्या शेवटी आम्ही त्या यूजर चा तपास केला ज्यांनी गौरव भाटिया चे वक्तव्य खोट्या संदर्भासह शेअर केले. फेसबुक पेज शानू कॉक्‍स ला 368 लोकं फॉलो करतात, या पेज ला युपी च्या रामपूर वरून चालवण्यात येते.

विश्वास न्यूजने यापूर्वीही एकदा गौरव भाटियाशी संबंधित एका व्हायरल पोस्टची चौकशी केली होती. व्हायरल झालेला व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा गौरव भाटिया भाजपमध्ये नव्हते तर समाजवादी पक्षात होते. 2017 मध्ये त्यांनी सपा सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. तो तपास येथे तपशीलवार वाचता येईल.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे समोर आले की गौरव भाटिया यांच्या विरोधात अपप्रचार करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपूर्ण विधान व्हायरल केले गेले होते. त्यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान करणारे वक्तव्य केलेले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट