Fact Check : भाजप खासदार रवी किशन चा 2017 साल चा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि भाजप खासदार रवी किशन चा व्हायरल होत असलेला व्हिडिओ २०१७ चा असून तो आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): भारतीय जनता पार्टीचे गोरखपूरचे खासदार रवी किशन हे काही दिवसांपूर्वी एका दलिताच्या घरी जेवण्यास पोहोचले होते. याला जोड देत त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रवी किशन तुम्हारा पसीना ऐसा महक रहा है क्या बोलें? असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करून रवी किशनने दलिताच्या घरात जबरदस्तीने जेवण केल्याचा दावा केला जात आहे. त्यांना दलितांच्या घामाचा वास येतो असे म्हंटले गेले आहे.

विश्वास न्यूजने व्हायरल व्हिडिओ आणि दाव्यांचा तपास केला. तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे . विश्वास टीमच्या तपासात हा व्हिडीओ अलीकडचा नसून 2017 चा असल्याचे कळले. रवी किशन यांनी त्यांच्या समर्थकांशी वैयक्तिक संवाद साधताना ही माहिती दिली होती. कोणत्याही धर्म, जातीबद्दल त्यांनी हे भाष्य केलेले नाही. हा व्हिडिओ शेअर करून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Tasnim Bloch ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत दावा केला: ‘गोरखपुर के सांसद रवि किशन ने चुनाव की वजह से मजबूरी में दलित के घर खाना तो खा लिया इसके बाद उस दलित का मजाक उड़ाया वीडियो वायरल।’

सोशल मीडिया वर अन्य यूजर्स देखील ह्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहे. फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास देण्यात आला आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://twitter.com/trilokjaiswal84/status/1483043914634334210?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483043914634334210%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fpolitics%2Ffact-check-old-2017-video-of-bjp-mp-ravi-kishan-viral-with-fake-allegation%2F

तपास:
विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता शोधण्यासाठी InVID टूलचा वापर केला. त्यातून व्हायरल झालेल्या व्हिडिओचे अनेक ग्रेब्स काढण्यात आले. यानंतर त्यांच्या मदतीने गुगल रिव्हर्स सर्च टूलचा वापर करून मूळ स्त्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, आम्हाला 15 मे 2020 रोजी बहुजन हेराल्ड नावाच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ मिळाला. पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत रवी किशन यांच्यावर निशाणा साधत लिहिले आहे की, हे गोरखपूरचे भाजप खासदार ब्राह्मण रवि किशन शुक्ला आहेत, त्यांना जनतेच्या घामाचा वास येतो.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही काही कीवर्डद्वारे Google वर शोधले. या दरम्यान, आम्हाला 17 मे 2020 रोजी लाईव्ह हिंदुस्तानच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या व्हायरल व्हिडिओशी संबंधित एक अहवाल मिळाला. रिपोर्टनुसार, 2020 मध्येही हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी लोकांनी रवी किशनवर निशाणा साधत रवी किशनला गरिबांच्या घामाचा दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर रवी किशन यांनी स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ लॉकडाऊनचा नसल्याचे सांगितले. ही गोष्ट 2017 च्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीची आहे आणि त्यांनी आपल्या समर्थकांशी अनौपचारिक संवाद साधताना या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. जे काही लोक जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने शेअर करत त्यांची प्रतिमा खराब करत आहेत, असे त्यात म्हंटले आहे. पूर्ण बातमी इथे वाचा.

अधिक माहितीसाठी आम्ही गोरखपूर दैनिक जागरणचे ज्येष्ठ पत्रकार राजेश राय ह्यांना संपर्क केला. व्हायरल झालेला व्हिडिओ आम्ही त्यांच्यासोबत शेअर केला असता त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे.

विश्वास न्यूजने रवी किशनचे जनसंपर्क अधिकारी पवन दुबे ह्यांना देखील संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. त्यांनी दलितांवर भाष्य केलेले नाही. हा व्हिडिओ जवळपास 5 वर्षे जुना आहे, हा व्हिडिओ 2017 सालचा आहे. सर्व मित्र गाडीत होते. सर्वजण एका कार्यक्रमातून परतत होते. त्याचवेळी त्यांनी गमतीत हे म्हंटले होते. या सर्व गोष्टी त्यांनी वैयक्तिकरित्या मजेशीर स्वरात सांगितल्या. आपण सगळे एकत्र बसलो की असे विनोद होतात. प्रत्येकजण करतो, तसेच त्यांनी देखील केले. ज्यावर आता विरोधी पक्ष चुकीचा दावा करत आहेत.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही हा दावा करणाऱ्या यूजर चा तपास केला. Tasnim Bloch चे आम्ही सोशल स्कॅनिंग केले. त्यात आम्हाला कळले कि यूजर एका विशिष्ट विचार धारेचा आहे. यूजर चा फेसबुक प्रोफाइल 2016 साली बनवण्यात आला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि भाजप खासदार रवी किशन चा व्हायरल होत असलेला व्हिडिओ २०१७ चा असून तो आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट