Fact Check: भाजप आमदाराने हे व्हायरल वक्तव्य केले नाही
व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि भाजप आमदार गोपीचंद पडळकर ह्यांनी वेदांत- फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट वर व्हायरल वक्तव्य केले ते खोटे असल्याचे समोर आले. पडळकर ह्यांनी व्हायरल वक्तव्य केले नाही.
- By: Ankita Deshkar
- Published: Sep 16, 2022 at 05:38 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): 1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. अश्यातच एक दावा व्हायरल होत आहे. असा दावा करण्यात येत आहे कि, भाजप चे आमदार आणि प्रवक्ते गोपीचंद पडळकर ह्यांनी म्हंटले कि, “तिघडी सरकारनं एसटी. कामगारांचं सरकारमध्ये विलिनीकरण केलं असतं तर आज सेमी कंडक्टर गुजरातला गेला नसता.”. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sonali Kulkarni ने एक ग्राफिक, “एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक” नावाच्या फेसबुक ग्रुप मध्ये पोस्ट केले आणि लिहले: आजची सर्वात “अभ्यासू प्रतिक्रिया”
ग्राफिक मध्ये दावा केला होता कि हे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर ह्यांनी केले: तिघडी सरकारनं एसटी. कामगारांचं सरकारमध्ये विलिनीकरण केलं असतं तर आज सेमी कंडक्टर गुजरातला गेला नसता.
हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात व्हायरल ग्राफिक वर गूगल लेन्स वापरण्यापासून केली. आम्ही ग्राफिक वरचे टेक्स्ट काढून गूगल वर ह्याचा तपास घेतला कि खरंच गोपीचंद पडळकर ह्यांनी असे वक्तव्य केले का.
आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही. पण त्यांनी केलेल्या दुसऱ्या एका वक्तव्याच्या बातम्या आम्हाला सापडल्या.
त्यांनी नुकतेच पवारांवर एक विधान केले होते, ज्यात त्यांनी म्हंटले, “श्रीलंकेतील नेते जसे पळून गेले तसं पवारांना पळून जावं लागणार!”
हि बातमी एक आठवडा जुनी होती.
आता आम्ही फेसबुक वर ह्या बातमी मधील काही शब्द किवर्ड म्हणून वापरून तपासले.
आम्हाला असेच अजून एक ग्राफिक मिळाले.
आम्हाला शेवटी खरे ग्राफिक एका ठिकाणी मिळाले.
खरे ग्राफिक एका फेसबुक पेज Young Maharashtra यंग महाराष्ट्र, वर शेअर करण्यात आले होते, ज्यात गोपीचंद पडळकर ह्यांचे हे वक्तव्य दिले गेले होते, “श्रीलंकेतील नेते जसे पळून गेले तसं पवारांना पळून जावं लागणार!”
हे व्हायरल वक्तव्य नव्हते.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही गोपीचंद पडळकर ह्यांचे पर्सनल असिस्टंट सुजित पवार ह्यांच्या सोबत बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल ग्राफिक खोटे आहे. पडळकर ह्यांनी वेदांत- फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट वर वक्तव्य केले नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर सोनाली कुलकर्णी ह्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. त्यात कळले कि सोनाली कुलकर्णी ह्या पुण्याच्या रहिवासी आहेत आणि त्यांना 321 लोकं फेसबुक वर फॉलो करतात.
निष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि भाजप आमदार गोपीचंद पडळकर ह्यांनी वेदांत- फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट वर व्हायरल वक्तव्य केले ते खोटे असल्याचे समोर आले. पडळकर ह्यांनी व्हायरल वक्तव्य केले नाही.
- Claim Review : आजची सर्वात अभ्यासू प्रतिक्रिया
- Claimed By : Sonali Kulkarni
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.