Fact Check: धीरेंद्र शास्त्री ला Z+ सिक्योरिटी देण्याचा बीबीसी चा स्क्रीनशॉट खोटा
केंद्र सरकार धीरेंद्र शास्त्री यांना Z+ सुरक्षा देत असल्याबद्दल बीबीसीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट खोटा आहे. हे ओके सॅटायर फेसबुक पेजवरून व्यंग्य म्हणून पोस्ट केले गेले होते, जे यूजर्स सत्य असल्याचे समजून शेअर करत आहेत.
- By: Sharad Prakash Asthana
- Published: Jan 27, 2023 at 02:42 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या खूप चर्चेत आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये बीबीसी न्यूज हिंदीचा लोगो आहे. त्यावर लिहिले आहे की, वादात सापडलेल्या धीरेंद्र शास्त्री यांना मोदी सरकारने Z+ सुरक्षा दिली आहे. आता त्यांच्यासोबत 25 कमांडो असतील. यावर असंही लिहिलं आहे की, यासाठी संयुक्त राष्ट्रांनीही मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्क्रीनशॉट बनावट असल्याचे आढळून आले. बीबीसीने असे कोणतेही ट्विट केलेले नाही किंवा केंद्र सरकारने अद्याप अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. हा स्क्रीनशॉट एका व्यंग्य पृष्ठाने पोस्ट केला होता, जो वापरकर्त्यांद्वारे चांगल्या विश्वासाने शेअर केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mohit Mishra (आर्काइव्ह लिंक) ने 23 जानेवारी रोजी एक स्क्रीनशॉट शेअर केला. त्यावर धीरेंद्र शास्त्री आणि श्याम मानव च्या चित्रांसोबत लिहले होते,
विवादों में फंसे धीरेंद्र शास्त्री के लिए मोदी सरकार ने Z+ सिक्योरिटी।
25 कमांडोज के साथ रहेंगे धीरेंद्र शास्त्री,
UN ने भी कहा-मोदी सरकार ने किया सही काम , विरोध कने वाले @ShyamManav पर इंटरपोल ने दर्ज किया मुकदमा
तपास:
व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी, आम्ही प्रथम धिरेंद्र शास्त्री यांना Z+ सुरक्षा दिली जात आहे हि माहिती कीवर्डसह शोधली. 24 जानेवारी रोजी दैनिक जागरणमध्ये बातमी आली की बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ते सध्या छत्तीसगडमधील रायपूर येथे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धीरेंद्र शास्त्रींना आव्हान देणाऱ्या श्याम मानव यांनाही अशाच धमक्या आल्या आहेत. श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक भाग आहेत. पण, आम्हाला बातम्यांमध्ये Z+ सुरक्षिततेचा कोणताही उल्लेख आढळला नाही.
हिंदुस्थानमध्ये २४ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, धीरेंद्र शास्त्री यांना धमक्या मिळाल्यानंतर सुरक्षेची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस नेते अमित श्रीवास्तव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धीरेंद्र शास्त्री यांना Y+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
25 जानेवारी रोजी दैनिक भास्कर मधील एका बातमी प्रमाणे, धमक्या मिळाल्यानंतर धीरेंद्र शास्त्री हे 24 जानेवारी रोजी बागेश्वर धाम ला परतले. त्यांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. पण आम्हाला सापडलेल्या बातम्यांमध्ये कुठे झेड प्लस सुरक्षेबद्दल सांगण्यात आले नाही.
आम्ही श्याम मानव यांच्यावर इंटरपोलने गुगलवर कीवर्डसह गुन्हा दाखल केल्याचा दावा देखील शोधला, परंतु दाव्याची पुष्टी करणारी कोणतीही बातमी आम्हाला आढळली नाही. आम्हाला इंटरपोलच्या वेबसाइटवरही अशी कोणतीही माहिती सापडली नाही.
आम्हाला शोधात कोणत्याही विश्वसनीय वेबसाइटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही, जेणेकरून UN ने धीरेंद्र शास्त्री यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक केले आहे याची पुष्टी करता येईल. युनायटेड नेशन्सच्या वेबसाइटवरही आम्हाला अशी कोणतीही प्रेस रिलीझ सापडली नाही.
त्यानंतर आम्ही बीबीसीच्या व्हायरल ट्विटची काळजीपूर्वक चौकशी केली. त्यात काही चुका आहेत, जसे पहिले वाक्य अपूर्ण आहे.
आम्ही बीबीसी न्यूज हिंदीचे ट्विटर खाते देखील शोधले. ट्विटर हँडलचा लोगो आणि व्हायरल स्क्रीनशॉटचा लोगो वेगळा आहे. तसेच, टिक मार्कचा रंग नारिंगी आहे, तर व्हायरल स्क्रीनशॉटमधील टिक मार्क निळा आहे. आम्हाला ट्विटर हँडलवर अशी कोणतीही पोस्ट सापडली नाही.
शोधल्यावर, आम्हाला फेसबुक पेज OK Satire वर व्हायरल स्क्रीनशॉट (आर्काइव्ह लिंक) सापडला. हे 21 जानेवारी रोजी पोस्ट केले आहे.
या प्रोफाइल (आर्काइव्ह लिंक) वाचले असता, Parody Tweets That seems Real (विडंबन ट्विट्स जे खरे वाटतात) या पेजवर आम्हाला बीबीसी लोगोचे अनेक स्क्रीनशॉट सापडले. यामध्ये, बस मॅटर आणि तारीख भिन्न आहेत, परंतु रिट्विट्स आणि लाईक्सची संख्या सारखीच आहे.
पुढील पुष्टीकरणासाठी, आम्ही मुकेश शर्मा, डिजिटल प्रमुख, बीबीसी हिंदी ह्यांना संपर्क केला आणि त्यांना व्हायरल स्क्रीनशॉट पाठवला. त्याने हा स्क्रीनशॉट खोटा आणि बनावट असल्याचे सांगितले.
फेक स्क्रीनशॉट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर ‘मोहित मिश्रा‘ यांची प्रोफाइल आम्ही स्कॅन केली. त्याप्रमाणे ते अहमदाबाद चे रहिवासी असल्याचे आम्हाला समजले. त्यांचे 14700 फ्रेंड्स आहेत, ते एका विशिष्ट विचारधारेसोबत प्रभावित आहेत.
निष्कर्ष: केंद्र सरकार धीरेंद्र शास्त्री यांना Z+ सुरक्षा देत असल्याबद्दल बीबीसीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट खोटा आहे. हे ओके सॅटायर फेसबुक पेजवरून व्यंग्य म्हणून पोस्ट केले गेले होते, जे यूजर्स सत्य असल्याचे समजून शेअर करत आहेत.
- Claim Review : धीरेंद्र शास्त्री ला Z+ सिक्योरिटी देण्याबद्दल बीबीसी हिंदी चा स्क्रीनशॉट
- Claimed By : Mohit Mishra
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.