Fact Check: महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा जुना व्हिडिओ कर्नाटकचा सांगून केला जात आहे व्हायरल 

विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळून आले की, एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याच्या व्हायरल व्हिडिओबाबत केला जात असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकातील नुकत्याच घडलेल्या घटनेचा नसून 2018 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा आहे. महाराष्ट्रातील चोपडा बस स्टॉपजवळील एक परिसर मोकळा करण्यासाठी पोलीस आले होते. त्या दरम्यान एका दुकानदाराने पोलिसाला धमकी दिली होती.   

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). एका व्यक्तीने पोलिसाला धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ कर्नाटकातील नुकत्याच घडलेल्या घटनेचा आहे. 

विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळले की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकातील नुकत्याच घडलेल्या घटनेचा नसून, 2018 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा आहे. महाराष्ट्रातील चोपडा बस स्टॉपजवळील एक परिसर मोकळा करण्यासाठी पोलीस आले होते. त्या दरम्यान एका दुकानदाराने पोलिसाला धमकी दिली होती.  

काय होत आहे व्हायरल?

29 ऑक्टोबर 2024 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कर्नाटकमध्ये जाळीदार टोपी घातलेला एक माणूस पोलिसांना उघडपणे धमकी देत ​​आहे, तुझा गणवेश काढ आणि मला एकट्याला भेट.”

पोस्टची संग्रहित लिंक येथे पहा.

तपास 

या व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डने गुगलवर घेतला. आम्हाला 24 सप्टेंबर 2018 रोजी सोपान जाधव नावाच्या एका फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळला. तिथे मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील चोपडा बस स्टॉपवर घडलेल्या घटनेचा आहे.

आम्हाला हा व्हिडिओ Jubileehills Feroz Khan च्या पेजवर देखील 20 सप्टेंबर 2018 रोजी अपलोड केलेला आढळला. येथे देखील कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ महाराष्ट्रातील चोपडा बस स्टॉपचा असल्याचा सांगण्यात आले आहे. 

हा दावा आधी सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या दरम्यान अधिक माहितीसाठी आम्ही चोपडा पोलिस स्टेशनशी संपर्क साधला होता. पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) अवतार सिंग चौहान यांनी सांगितले की, ‘ही घटना सन 2018 मध्ये घडली होती, जेव्हा काही लोकांनी चोपडा बसस्थानकाजवळ एक वाहन उभे केले होते, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत होता. त्यास हटवण्यावरून वाद झाला आणि तेथील लोकांनी पोलिसांना धमकी देऊन पाहून घेण्याचा इशारा दिला होता.’

अखेरीस, आम्ही चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे खाते स्कॅन केले. आम्हाला आढळले की, हा वापरकर्ता एक विचारधाराशी संबधित पोस्ट शेअर करतो. या वापरकर्त्याला 52 हजार फॉलोअर्स आहेत. 

निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळून आले की, एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याच्या व्हायरल व्हिडिओबाबत केला जात असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकातील नुकत्याच घडलेल्या घटनेचा नसून 2018 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा आहे. महाराष्ट्रातील चोपडा बस स्टॉपजवळील एक परिसर मोकळा करण्यासाठी पोलीस आले होते. त्या दरम्यान एका दुकानदाराने पोलिसाला धमकी दिली होती.   

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट