Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने छायाचित्र राजस्थान मध्ये नाही, गुजरात मध्ये घेतले गेले आहे, व्हायरल पोस्ट मधला दावा खोटा आहे
नरेंद्र मोदी यांचे व्हायरल छायाचित्र हे राजस्थान च्या बाडमेर मधले नसून, गुजरात च्या कच्छ मध्ये काढले गेले आहे. व्हायरल पोस्ट सोबत करण्यात येणार दावा खोटा आहे.
- By: Amanpreet Kaur
- Published: Mar 30, 2021 at 11:24 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र व्हायरल होत आहे. ह्या छायाचित्रात मोदी यांच्या सोबत काही लोकं झोपडपट्ट्यांच्या बाहेर एका परिवारासोबत संवाद साधताना दिसतात. व्हायरल पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि हे छायाचित्र ३१ वर्षं जुने आहे, जेव्हा नरेंद्र मोदी बाडमेर मध्ये पाकिस्तान मधून विस्थापित झालेल्या हिंदूंना भेटायला आले होते.
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला आणि त्यात आम्हाला दावा खोटा असल्याचे समजले. हे छायाचित्र १९८२-८३ मध्ये गुजरात च्या कच्छ बांनी क्षेत्रात घेतले गेले आहे. मोदी तेव्हा तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून अनुसूचित जाती च्या लोकांना भेटायला गेले होते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर G.m. Chauhan ने हे छायाचित्र पोस्ट करून कॅप्शन मध्ये लिहले : ये 31 वर्ष पुरानी दुर्लभ तस्वीर है, जब नरेंद्र मोदी #बाड़मेर में पाकिस्तान से #विस्थापित_हिंदुओं से मिलने उनके कैम्प में पहुँचे थे. तब वो ना गुजरात के मुख्यमंत्री थे और ना ही देश के प्रधानमंत्री थे.दुख, मुशीबत मे लोगों के साथ खड़ा होना मोदी जी की फितरत में शामिल है।
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून त्याला शोधण्यापासून केली. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खासगी वेबसाईट वर एका आर्टिकल मध्ये हे छायाचित्र मिळाले. या छायाचित्रासोबत कॅप्शन मध्ये लिहले होते: गुजरात के एक गांव में नरेंद्र मोदी। इस आर्टिकल में बताया गया है कि नरेंद्र मोदी को संभाग प्रचारक बनाया गया था, जिसके बाद उन्हें साउथ व सेंट्रल गुजरात का चार्ज दिया गया था। इसके आगे बताया गया है कि 1980 के दशक के शुरुआत में मोदी ने पूरे गुजरात में कई यात्राएं की और इस दौरान उन्हें हर ताल्लुका और करीब-करीब राज्य के हर गांव में जाने का मौका मिला।
या संपूर्ण आर्टिकल मध्ये कुठेच असे नव्हते लिहले गेले कि मोदी हे राजस्थान च्या बाडमेर मध्ये विस्थापित झालेल्या हिंदूंना भेटायला त्यांच्या कॅम्प मध्ये गेले होते.
अधिक माहिती साठी दैनिक जागरण च्या अहमदाबाद चे रिपोर्टर (विशेष संवाददाता) शत्रुघ्न शर्मा यांनी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक किशोर मकवाणा यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र १९८२-८३ चा आहे, जेव्हा नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रचारक म्हणून कच्छ चे बन्नी क्षेत्रात एका गावात अनुसूचित जाती च्या लोकांना भेटायला गेले होते. त्यांच्या सोबत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय पदाधिकारी मोहन जोशी आणि संघ कार्यकर्ता हरिजन वेलजी पोपट देखील छायाचित्रात दिसतात.
विश्वास न्यूज स्वतंत्र रूपात पुष्टी करत नाही कि हे छायाचित्र कोणत्या साली काढल्या गेले आहे. हे छायाचित्र राजस्थान चे नसून गुजरात चे आहे.
आम्ही फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर G.m. Chauhan यांचे प्रोफाइल स्कॅन केले. आम्हाला कळले कि यूजर हे गुजरात च्या अहमदाबाद चे रहिवासी आहे.
निष्कर्ष: नरेंद्र मोदी यांचे व्हायरल छायाचित्र हे राजस्थान च्या बाडमेर मधले नसून, गुजरात च्या कच्छ मध्ये काढले गेले आहे. व्हायरल पोस्ट सोबत करण्यात येणार दावा खोटा आहे.
- Claim Review : नरेंद्र मोदि यांचे ३१ वर्ष जुने छायाचित्र बाडमेर, राजस्थान चे आहे.
- Claimed By : G.m Chauhan
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.