X
X

Fact Check : २०१८ चे छायाचित्र आता शेतकरी आंदोलनाच्या नावावर होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि २०१८ मध्ये झालेल्या एका आंदोलनाचे छायाचित्र आता सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावावर शेअर केले जात आहे. तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या शेतकरी आंदोलनाची एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात काळ्या रंगाचा एक बॅनर बघितला जाऊ शकतो. त्या बॅनर वर लिहले होते, ‘न मोदी, न योगी, न जय श्रीराम। देश पर राज करेगा मजदूर किसान।’. यूजर्स दावा करत आहे कि हे छायाचित्र आताच्या शेतकरी आंदोलनाचे आहे.

विश्वास न्यूज ने व्हीआरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला समजले कि २०१८ च्या शेतकरी आंदोलनाचे छायाचित्र आता व्हायरल होत आहे. आमच्या तपासात हे छायाचित्र खोटे असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अर्जुन माली यांनी ३ नोव्हेंबर रोजी एक बॅनर चे छायाचित्र अपलोड केले आणि ते शेतकरी आंदोलन चे असल्याचे सांगितले. पोस्ट मध्ये दावा केला गेला कि: अगर ये किसान आंदोलन ही है, तो इसमें हिन्दू विरोध कहाँ से और कैसे आ गया ?? मोदी, योगी का विरोध तो ठीक है ! लेकिन प्रभु श्री राम का विरोध क्यों.. ??

अर्थात: जर हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे त यात हिंदूंचा विरोध कुठून आला? मोदी आणि योगी यांचा विरोध ता ठीक आहे पण प्रभू श्रीराम यांचा विरोध का करावा?

फेसबुक पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च या टूल मध्ये अपलोड केला आणि सर्च करण्याचा प्रयत्न केला. हे छायाचित्र आम्हाला एका फेसबुक पेज पेज वेळ जुन्या तारखेला मिळाला. जन गण मन कि बात या नावाच्या फेसबुक पेज वर ६ डिसेंबर २०१८ रोजी अपलोड केलेले मिळाले. ओरिजिनल पोस्ट तुम्ही इथे बघू शकता.

तसेच हे छायाचित्र आम्हाला, दुसऱ्या एंगल नि ऑल इंडिया किसान महासभा च्या फेसबुक पेजवर मिळाले, हे तेच बॅनर होते जे आता व्हायरल होत आहे. बॅनर वर AIKM लिहले होते. याचा अर्थ होतो, ऑल इंडिया किसान मोर्चा. या पोस्ट ला इथे बघा. ह्या पेज वर हे छायाचित्र ४ डिसेंबर २०१८ रोजी अपलोड केले गेले होते.

गूगल सर्च च्या वेळी आम्हाला कळले कि ३० नोव्हेंबर २०१८ रोजी देशभरातील शेतकरी दिल्ली मध्ये किसान मुक्ती मोर्चा घेऊन पोहोचले होते. या संबंधित बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
अधिक माहिती साठी आम्ही ऑल इंडिया किसान महासभा चे राष्ट्रीय सचिव पुरुषोत्तम शर्मा यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि व्हायरल छायाचित्र २०१८ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या रॅली चे आहे, ज्याला काही लोकं आता व्हायरल करत आहे.
तपासाच्या शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या फेसबुक यूजर अर्जुन माली यांच्या अकाउंट चा तपास केला. सोशल स्कँनिंग मध्ये आम्हाला कळले कि यूजर एका विशिष्ठ विचारधारासोबत प्रभावित आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि २०१८ मध्ये झालेल्या एका आंदोलनाचे छायाचित्र आता सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावावर शेअर केले जात आहे. तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later