Fact Check: अमित शाह ने योगिनां नाही लिहले पत्र, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेले पत्र खोटे असल्याचे समोर आले. गृह मंत्री अमित शाह ने असे कुठलेच पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहले नाही.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर गृह मंत्री अमित शाह यांचे एक पत्र व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे कि हे हे पत्र शाह यांनी युपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहले. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पत्र फेक असल्याचे समजले. तपासात कळले कि हे पत्र गृह मंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नाही लिहले. हा दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल यूपी कांग्रेस सपोर्टर्स ने 4 जून ने खोटे पत्र व्हायरल करून लिहले: ‘उत्तर प्रदेश चुनाव 2022 से पहले भाजपा की हेराफेरी। कृपया अमित शाह की इस असंवैधानिक कार्रवाई को उठाएं।’
पत्रात अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ ला संबोधित करून पत्र लिहल्याचे सांगितले आहे कि जुलै २०२१ च्या मध्यापासून पश्चिम युपी मध्ये १८ वर्षाच्या वरच्या लोकांची व्हॅक्सिनेशन ची प्रक्रिया वाढवणे आवश्यक आहे. युपी च्या २०२२ च्या निवडणुकांमध्ये हीच व्हॅक्सिनेशन ची प्रक्रिया यश प्राप्त करून देईल.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. अन्य यूजर्स देखील या पत्राला खरे मानून शेअर करत आहेत.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ह्या पत्रामागचे सत्य जाणून घेण्यासाठी साध्य कीवर्ड सर्च चा वापर करून तपास केला, आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही, जे हे सिद्ध करेल कि व्हायरल होत असलेले पत्र खरे आहे. तपासाच्या पुढच्या टप्यात आम्ही गृह मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील तपासले. आम्हाला तिथे देखील काहीच मिळाले नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही गृह मंत्रालयाच्या मीडिया एवं संचार विभाग के महानिदेशक नितिन वकंनकर यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि पीआयबी द्वारे या पत्राचे आधीच खंडन केल्या गेले आहे. हे पत्र पूर्णपणे खोटे आहे.

आम्ही आता खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. ट्विटर हैंडल UP Congress Supporter यांच्या सोशल स्कँनिंग मध्ये आम्हाला कळले कि हे अकॉउंट युपी चेच आहे. याला मे २०२१ मध्ये बनवले गेले होते. तसेच या अकाउंट ला २६८८ लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेले पत्र खोटे असल्याचे समोर आले. गृह मंत्री अमित शाह ने असे कुठलेच पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट