नवी दिल्ली (विश्वास न्यूज). दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नुकत्याच झालेल्या अटकेनंतर त्यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या अटकेबाबत बोलताना ऐकू येत आहेत. ऑडिओ क्लिपला खरी मानून वापरकर्ते ती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत आढळले की, अरविंद केजरीवाल यांची ही ऑडिओ क्लिप एआय द्वारे तयार केलेली किंवा सिंथेटिक मीडिया आहे, जी त्यांच्या पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. अटक झाल्यानंतर केजरीवाल यांनी त्यांचा संदेश पाठवला होता, जो त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सार्वजनिक केला होता.
ही ऑडिओ क्लिप विश्वास न्यूजच्या टिपलाईन क्रमांक +91 95992 99372 वर पाठवून सत्य सांगण्याची विनंती वापरकर्त्याद्वारे करण्यात आली आहे.
आमचा तपास सुरू करताना, सर्वप्रथम आम्ही ऑडिओ काळजीपूर्वक ऐकला, आम्हाला तो ऑडिओ अरविंद केजरीवाल यांच्या खऱ्या आवाजापेक्षा थोडा वेगळा असल्याचे आढळले. या आधारावर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि शोधात आम्हाला 23 मार्च रोजी दुपारी 4:20 वाजता आप (एएपी) मुंबईचे कार्याध्यक्ष रुबेन रिचर्ड मस्करेनस यांच्या एकस हँडलवर व्हिडिओ म्हणून अपलोड केलेली एक व्हायरल ऑडिओ क्लिप सापडली. येथे दिलेल्या कॅप्शननुसार, ‘तुरुंगातून अरविंद केजरीवाल यांचा संदेश त्यांच्या एआय द्वारे निर्माण केलेल्या आवाजात.’
या ऑडिओ क्लिपबद्दल विश्वास न्यूजशी बोलताना रुबिन रिचर्ड म्हणाले की, “हा ऑडिओ एआय द्वारे निर्मित आहे. त्यांनी हा तयार केलेला नाही, तो आधीच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होता आणि त्यांनी तो फक्त त्याच्या एक्स हँडलवर अस्वीकरणासह शेअर केला आहे.”
हा तपास पुढे नेत असताना, आम्ही ही ऑडिओ क्लिप एआय ऑडिओ शोधणाऱ्या टूल, elevenlabs.io वर अपलोड केली. येथे आढळलेल्या निकालांनुसार, ही एक फेरफार केलेली ऑडिओ क्लिप आहे.
पुढील तपास करत असताना आम्ही बातमी शोधली. शोधल्यावर आम्हाला हिंदुस्तान टाईम्सची 23 मार्चची बातमी सापडली. त्यानुसार, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शनिवारी आप च्या कार्यकर्त्यांना आणि दिल्लीतील लोकांना तुरुंगात टाकलेल्या पतीचा संदेश वाचून दाखवला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा हवाला देत केजरीवाल यांच्या पत्नी म्हणाल्या की, कोणताही तुरुंग मला आत ठेवू शकत नाही, मी बाहेर येऊन मी माझी आश्वासने पूर्ण करेन.”
अरविंद केजरीवाल यांच्या सत्यापित हँडलवर त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांचा एक व्हिडिओ 23 मार्च रोजी रात्री 11:57 वाजता अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये त्या केजरीवाल यांनी देश आणि दिल्लीतील जनतेला दिलेला संदेश सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओचा मजकूर लहान आणि इंग्रजीत करून तो केजरीवाल यांच्या एआय द्वारे निर्मित आवाजाच्या स्वरूपात तयार करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओशी संबंधित पुष्टीकरणासाठी, आम्ही आम आदमी पार्टीचे मुख्य मीडिया समन्वयक विकास योगी यांच्याशी संपर्क साधला. याविषयी बोलताना ते म्हणाले, ही ऑडिओ क्लिप केजरीवाल यांची नाही, कोठडीत असताना ते सध्या थेट वक्तव्य देऊ शकत नाहीत.
यापूर्वी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचा डीपफेक ऑडिओही व्हायरल झाला होता, ज्याची आम्ही चौकशी केली होती. फॅक्ट चेक इथे वाचता येईल.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत आढळून आले की, अरविंद केजरीवाल यांची ही ऑडिओ क्लिप एआय द्वारे निर्मित किंवा सिंथेटिक मीडिया आहे, जी त्यांच्या पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. अटक झाल्यानंतर केजरीवाल यांनी त्यांचा संदेश पाठवला होता, जो त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सार्वजनिक केला होता.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923