विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. विश्वास न्यूज सोबत बोलताना आझाद समाज पक्षाचे मध्य प्रदेश अध्यक्ष सुनील आस्ते यांनीही अक्षय कुमारच्या १२ फेब्रुवारीच्या भोपाळ आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार 12 फेब्रुवारी रोजी भोपाळमध्ये आरक्षणासाठी होणाऱ्या भीम आर्मीच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच वेळी, हा दावा खोटा असल्याचे आम्हाला आमच्या तपासात आढळून आले. विश्वास न्यूजसोबत बोलताना आझाद समाज पक्षाचे मध्य प्रदेश अध्यक्ष सुनील आस्ते यांनीही अक्षय कुमारच्या १२ फेब्रुवारीच्या भोपाळ आंदोलनात सहभागी होण्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ने व्हायरल ग्राफ़िक शेअर केला, ज्यात अक्षय कुमार आणि भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आज़ाद चे देखील चित्र आहे आणि सोबत लिहले आहे, ‘भीम आर्मी आज़ाद समाज पार्टी जिन्दाबाद। फिल्म अभिनेता अक्षय कुमार। में आरहा हूँ आरक्षण के समर्थन में। चलो भोपाल आरक्षण जिंदाबाद 12 फरवरी भोपाल।”
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आमचा तपास सुरू करत, सर्वप्रथम, आम्ही अशी कुठली बातमी सापडते का शोधली, पण शोधात आम्हाला अशी कोणतीही बातमी सापडली नाही जी याची पुष्टी करते. अधिक तपास करत आम्ही अक्षय कुमारचे फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट स्कॅन केले, पण तिथेही आम्हाला पोस्ट सोबत संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही.
चंद्रशेखर आझाद, भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरही अक्षय कुमारच्या १२ फेब्रुवारीच्या भोपाळ यात्रेत सहभागी झाल्याची कोणतीही बातमी आम्हाला सापडली नाही.
एबीपी न्यूजच्या १३ जानेवारीच्या बातमीत चंद्रशेखर आझाद यांच्या १२ फेब्रुवारीला भोपाळमध्ये झालेल्या आंदोलनाशी संबंधित बातमी मिळाली. येथे सांगण्यात आले की, ‘भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मध्य प्रदेश सरकारला आव्हान दिले आहे. त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी राजधानी भोपाळमध्ये मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
चंद्रशेखर आझाद यांनीही ट्विट करून भोपाळ आंदोलनात सामील होण्याची माहिती दिली होती.
विश्वास न्यूजसोबत बोलताना आझाद समाज पार्टीचे मध्य प्रदेश अध्यक्ष सुनील आस्ते म्हणाले, “हे अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे, परंतु अक्षय कुमार 12 फेब्रुवारीच्या भोपाळ आंदोलनात सामील होणार नाही. ही निव्वळ अफवा आहे. आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलवरही या अफवांचे खंडन नक्की करू. अक्षय कुमारला पार्टीने निमंत्रण दिलेले नाही आणि ते येणारही नाहीत.”
फेक पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक युजरच्या सोशल स्कॅनिंगमध्ये असे आढळून आले की ‘ओंकार कथेरिया जर्नालिस्ट सपोर्ट’ या युजरला १.७ हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. विश्वास न्यूज सोबत बोलताना आझाद समाज पक्षाचे मध्य प्रदेश अध्यक्ष सुनील आस्ते यांनीही अक्षय कुमारच्या १२ फेब्रुवारीच्या भोपाळ आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923