X
X

Fact Check: AI फोटो संपादित करून त्यास इजिप्तमध्ये द ममीच्या स्क्रीनिंगचा सांगून केला जात आहे व्हायरल

  • By: Umam Noor
  • Published: Feb 29, 2024 at 06:48 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक वाळवंटाच्या मध्यभागी ‘द  ममी’ चित्रपट पाहताना दिसत आहेत. या फोटोला लोक खरा समजून आणि त्याचे कौतुक कातून त्याला सामायिक करत आहेत.

‘विश्वास न्यूज’ला आपल्या तपासात हा व्हायरल फोटो खरा नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) टूलच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त, या एआय फोटोत संपादन देखील करण्यात आले आहे आणि हा फोटो संपादित करून त्यात द ममी चित्रपटाचे नाव जोडण्यात आले आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

फेसबुक वापरकर्त्याने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, “How cool is this? Watching the movie THE MUMMY at an outdoor theater in the Egyptian Desert.” (“हे किती मस्त आहे, नाही? इजिप्शियन वाळवंटात मैदानी थिएटरमध्ये द ममी हा चित्रपट पाहण्याची मजा काही औरच आहे.”) 

पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.

तपास 

एआय द्वारे तयार करण्यात आलेले फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, याच्याच आधारे आम्ही एआय फोटो ओळखणारे टूल ‘contentatscale. ai‘ वर व्हायरल फोटो अपलोड केला. तपासाअंती या फोटोत एआय असण्याची  87% शक्यता सांगण्यात आली आहे.

त्याच वेळी, एआय फोटो ओळखणारे दुसरे साधन, ‘isitai.com‘ वर देखील आम्ही हा फोटो अपलोड केला आणि येथे प्राप्त झालेल्या निकालानुसार, हा फोटो 78.94% एआय द्वारे बनविला गेला आहे असे सांगण्यात आले.

आमचा तपास पुढे नेत आम्ही गुगल लेन्सच्या माध्यमातून व्हायरल फोटोचा शोध घेतला. या शोधात आम्हाला हा फोटो इंस्टाग्राम हँडलवर अपलोड केलेला आढळला. तथापि, या फोटोत द  ममी ऐवजी ‘नेफ्लिक्स’ लिहिलेले पाहिले जाऊ शकते. त्याच वेळी, या पोस्टला दिलेल्या मथळ्यानुसार, हे ifonly.ai द्वारे तयार केले गेले आहे.

इन्स्टाग्राम हँडल ifonly.ai वरील व्हायरल फोटो 5 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स मालिकेसह अपलोड करण्यात आला होता, येथे देखील मूळ चित्रात द ममी लिहिलेले दिसत नाही, म्हणजेच व्हायरल फोटो देखील संपादित केला गेला आहे. ifonly.ai च्या हँडलवर माहितीच्या अनुसार, ते एक एआय कलाकार आहे.

व्हायरल पोस्टची पुष्टी करण्यासाठी आम्ही एआय कलाकार अझर मच्छवे यांच्याशी संपर्क साधला आणि व्हायरल पोस्ट त्यांच्याबरोबर शेअर केली. ते म्हणाले, “हा फोटो एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. जर तो बारकाईने पहिला तर चित्रपटाच्या स्क्रीनच्या तळाशी दिसणारा लाईट आणि सीटवर बसलेलेले निळ्या रंगांतील लोक आणि सीट स्पष्टपणे एआय आहेत.”

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हॉलिवूड चित्रपट द ममी 1999 मध्ये रिलीज झाला होता आणि त्याची कथा, इजिप्तच्या काल्पनिक शहर हमुनापात्रातील पुरातत्व मिशनवर गेलेल्या एका तरुणाशी आणि त्याच्या टीमशी संबंधित आहे.

बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, हा वापरकर्ता कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे.   

निष्कर्षः विश्वास न्यूजला तिच्या तपासणीत आढळले की, व्हायरल केला जात असलेला फोटो वास्तविक नाही, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूलच्या मदतीने तयार केला गेला आहे. या व्यतिरिक्त, या एआय फोटोत संपादन देखील करण्यात आले आहे, हा फोटो संपादित करून द ममी चित्रपटाचे नाव त्यात जोडण्यात आले आहे.

  • Claim Review : इजिप्शियन वाळवंटात आऊटडोअर थिएटरमध्ये द ममी
  • Claimed By : FB User: Paul Hopkins
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later