X
X

Fact Check: अफगाणिस्तानमधील विमान अपघाताचा व्हिडिओ नेपाळमधील पोखरा घटनेशी जोडून व्हायरल

एप्रिल 2013 मध्ये, अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेसवरून टेकऑफ केल्यानंतर अमेरिकन मालवाहू विमान क्रॅश झाले. अपघाताचा तो व्हिडिओ नेपाळमधील पोखरा येथील अपघाताशी जोडून व्हायरल केला जात आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नेपाळमधील काठमांडू येथून पोखराला जात असताना विमान अपघाताला त्यातील लोकं बळी पडले. यामध्ये ५ भारतीयांसह ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यात भर म्हणजे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील या घटनेसंबंधी व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये विमानाचा अपघात होताना दिसत आहे. यामध्ये काही वाहनेही रस्त्यावर दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करून यूजर्स पोखरा, नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघाताचा हा व्हिडिओ असल्याचा सांगत आहेत.
विश्वास न्यूजच्या तपासात असे कळले की व्हायरल व्हिडिओ 2013 मध्ये अफगाणिस्तानमधील विमान अपघाताचा आहे. त्याचा नेपाळशी काहीही संबंध नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर NAJAM SYED (आर्काइव्ह लिंक) ने 15 जानेवारी रोजी व्हिडिओ शेअर करत लिहले:

There were 53 Nepali citizens, 5 Indian nationals, 4 Russians, 2 Koreans, 1 Irish, 1 Argentinian, and 1 French national in the aircraft that crashed near #PokharaAirport: Nepal Airport Authorities
The death toll has risen to 40, Nepali media reports NepalPlaneCrash #planecrash

ट्विटर यूजर श्रीकांत त्यागी (आर्काइव्ह लिंक) ने देखील हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

https://twitter.com/mshrikanttyagi/status/1614716655334215681?s=20&t=oY4vqB9oCDipZ2_5wquL1A

तपास:
व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही प्रथम ते गूगल वर कीवर्डसह शोधले. 1 मे 2013 रोजी द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत अपघाताचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. बोईंग ७४७ अमेरिकन मालवाहू विमान अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेसवर कोसळल्याचे लिहिले आहे. या अपघातात विमानातील सातही अमेरिकनांचा मृत्यू झाला.

व्हायरल व्हिडिओ 30 एप्रिल 2013 रोजी TAREK3691 या युट्युब चॅनेलवर देखील अपलोड करण्यात आला होता. त्याचे शीर्षक U.S. Cargo Plane Crashes in Bagram Airfield Afghanistan, Killing 7 ( source LiveLeak.com) (अफगाणिस्तानच्या बगराम एअरबेसवर अमेरिकन मालवाहू विमान कोसळले, 7 ठार). त्याचे वर्णन असे होते की एक अमेरिकन बोईंग 747 कार्गो जेट दुबईला जात असताना अफगाणिस्तानमधील एअरबेसवर उड्डाणानंतर लगेचच क्रॅश झाले. या अपघातात सर्व सात क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

आम्हाला AEROpress BG या युट्युब चॅनेलवर 30 एप्रिल 2013 रोजी अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओ देखील आढळला. त्यानुसार 29 एप्रिल 2013 रोजी बगराम एअरफील्डवर हा अपघात झाला होता. उड्डाणानंतर विमान अपघाताचे बळी ठरले होते.

15 जानेवारी 2023 रोजी एएनआयने एक व्हिडिओ ट्विट करून नेपाळमधील विमान अपघाताची माहिती दिली आहे. त्यानुसार नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी विमान कोसळले. विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

पुढील पुष्टीकरणासाठी, आम्ही काठमांडू, नेपाळ येथील स्वतंत्र पत्रकार दीपक अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ पाठवला. तो म्हणतो, ‘हा व्हिडिओ 2013 मध्ये अफगाणिस्तानात झालेल्या अपघाताचा आहे. हे नेपाळमधील पोखरा येथील अपघाताबाबत नाही.

आम्ही फेसबुक पेज ‘नजम सय्यद’ स्कॅन केले ज्याने खोटा दावा करून व्हिडिओ शेअर केला होता. 13 फेब्रुवारी 2017 रोजी तयार करण्यात आलेल्या या पेजचे सुमारे 5 हजार फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: एप्रिल 2013 मध्ये, अफगाणिस्तानमधील बगराम एअरबेसवरून टेकऑफ केल्यानंतर अमेरिकन मालवाहू विमान क्रॅश झाले. अपघाताचा तो व्हिडिओ नेपाळमधील पोखरा येथील अपघाताशी जोडून व्हायरल केला जात आहे.

  • Claim Review : हा व्हिडिओ नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या विमान अपघाताचा आहे.
  • Claimed By : FB User- NAJAM SYED
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later