Fact Check: नागपूर मध्ये झालेल्या हत्येचा व्हिडिओ, यूपी च्या IAS च्या मर्डर चा सांगून होत आहे व्हायरल

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये दिवसाढवळ्या एका व्यक्तीची क्रूरपणे हत्या केल्याची दिसते. असा दावा केला जात आहे कि ज्या व्यक्तीची हत्या झाली, तो एक शिड्यूल कास्‍ट आईएएस ऑफिसर आहे. यांच्या मुलीसोबत पण दुष्कर्म केले गेले असा दावा केला जात आहे. ह्या घटनेत संघ आणि भाजप च्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे असा देखील दावा केला जात आहे. सांगण्यात येत आहे कि घटना उत्तर प्रदेश ची आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि असे कळले कि हा व्हिडिओ उत्तर प्रदेश चा नसून महाराष्ट्रातल्या नागपूर चा आहे, जेव्हा एका कुख्यात गुंड्याचा खून करण्यात आला होता.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर मधु डी उरकनाकन यांनी ३० सप्टेंबर रोजी एक सीसीटीवी फुटेज अपलोड करून दावा केला कि संघ आणि भाजप च्या गुंड्यांनी उत्तर प्रदेश मध्ये एक दलित IAS ऑफिसर ला मारून टाकले आणि कार मध्ये असलेल्या त्यांच्या १६ वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म देखील केले. या पोस्ट मध्ये इंग्रजीत लिहले होते: It is alleged that ruling Upper Caste Nazi RSSBJP goondas chopped to death a Scheduled Caste IAS officer in UP and raped his 16 year old daughter in the car, just because he neglects directions of RSS BJP not to distribute govt.’s alms to poor scheduled caste people. Where is the exact place of murder and rape?‘

या फेसबुक पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाच्या पहिल्या टप्प्यात सगळ्यात आधी हा व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड केला आणि त्यातून बरेच ग्रैब्‍स मिळवले. गूगल रिवर्स इमेज सर्च मध्ये आम्ही हा व्हिडिओ तपासला, हा व्हिडिओ आम्हाला बऱ्याच यूट्यूब चैनल वर मिळाला. २८ सप्टेंबर रोजी NEW J नावाच्या यूट्यूब चैनल वर हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात सांगितले होते कि नागपूर मध्ये जुए चे अड्डे चालवणारा बाल्या किशोर बिनेकर (Balya Binekar) याचा सिग्नल वर मर्डर झाला. पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

या नंतर आम्ही गूगल मध्ये कीवर्ड सर्च केले आणि या संबंधित बातम्या शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला द लाइव नागपुर या नावाच्या एका वेबसाईट वर हि बातमी मिळाली. 26 सितंबर 2020 प्रकाशित या बातमीत बाल्या बिनेकर च्या हत्ये बद्दल सांगितले गेले आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही नागपुर चे एएनआई के ब्‍यूरो चीफ सौरभ जोशी यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मधली घटना नागपूर ची आहे आणि यासंबंधात नागपूर क्राईम ब्रांच ने काही लोकांना अटक देखील केली आहे.

शेवटी आम्ही दावा करणाऱ्या व्यक्ती चा फेसबुक प्रोफाइल तपासला. फेसबुक यूजर मधु डी उरकनाकन यांना १२७७ लोकं फॉलो करतात.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट