Fact Check: ऑस्ट्रेलियातील २०१७ च्या निषेधाचे छायाचित्र हिंडनबर्ग वादास जोडून व्हायरल

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात आलेल्या घसरणीसह आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधी पक्षांकडून मागणी होत असताना, सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे की, अदानी समूहाच्या विरुद्ध निषेधांची मालिका केवळ देशापुरती मर्यादित नाही, तर देशाबाहेर ऑस्ट्रेलियातही आंदोलने होत आहेत.

विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हा दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले आहे. ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाच्या विरोधात आंदोलनाचे छायाचित्र, जे अलीकडेच शेअर केले जात आहे, ते प्रत्यक्षात २०१७ मधील आहे, ज्याचा हिंडनबर्ग वादाशी संबंध जोडला जात आहे.

व्हायरल म्हणजे काय?

व्हायरल व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करताना, सोशल मीडिया वापरकर्ता ‘हैदराबाद काँग्रेस सेवादल’ ने लिहिले आहे की,

(“ऑस्ट्रेलियात अदानी विरुद्ध निदर्शने. ती वणव्यासारखी पसरत आहे. फक्त आरबीआय (RBI) आणि सेबी (SEBI) त्यांच्या मालकांच्या आदेशाचे शांतपणे पालन करत आहेत.”)

इतर अनेक वापरकर्त्यांनी, हे छायाचित्र अलीकडील आणि मिळते-जुळते असल्याचा दावा करत, सामायिक केले आहे.

तपास

व्हायरल पोस्टमध्ये दिसत असलेल्या छायाचित्रात, लोकांचा एक गट “अदानींना थांबवा (STOP ADANI)” असे फलक घेऊन निषेध करताना दिसत आहे.

छायाचित्राचा मूळ स्रोत शोधण्यासाठी आम्ही उलट प्रतिमा शोध (रिव्हर्स इमेज सर्च)ची मदत घेतली. या शोधामुळे अनेक जुन्या अहवालांचे दुवे मिळाले ज्यामध्ये हे छायाचित्र वापरले गेले आहे. Flickr.com या वेबसाइटवर सर्वात जुनी प्रतिमा आढळली, ज्यामध्ये ही प्रतिमा, २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियातील काँगो बीचवर करण्यात आलेल्या निषेधाची असल्याचे वर्णन केले गेले आहे.

अहवालानुसार, आंदोलक उत्तर क्वीन्सलँडमधील प्रस्तावित कोळसा खाणकामावर बंदी घालण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे करत होते.

१४ ऑक्टोबर, २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या आणखी एका अहवालातही त्याच संदर्भात हीच प्रतिमा वापरली गेली होती. त्यानंतरच्या वर्षांत प्रकाशित झालेल्या इतर अनेक अहवालांमध्येही हे चित्र वापरले गेले आहे.

आमच्या तपासणीतून ही बाब स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेले छायाचित्र, २०१७ च्या ऑस्ट्रेलियातील निषेधाचे आहे. या चित्राबाबत आम्ही ऑस्ट्रेलियात काम करणारे फ्रीलान्स पत्रकार अमित चौधरी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “अलीकडच्या काळात इथे असे कोणतेही विरोध प्रदर्शन झालेले नाही आणि हे चित्र २०१७ मधील आंदोलनाचे आहे.”

विशेष म्हणजे हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली आहे. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्ष या प्रकरणाची संसदद्वारे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहे. विशेष म्हणजे, या वादामुळे अदानी समूहाला आपला एफपीओ (FPO)ही मागे घ्यावा लागला आहे.

भ्रामक दाव्यासह व्हायरल फोटोला सामायिक करणाऱ्या वापरकर्त्याला ट्विटरवर जवळपास १५०० लोक फॉलो करत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, २०२२ हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या दृष्टीने चढ-उतारांनी भरलेले होते आणि या काळात विश्वास न्यूजने १५०० हून अधिक तथ्य तपासणी अहवाल प्रकाशित केले आहेत, ज्यांचे विश्लेषण २०२२ च्या चुकीच्या माहितीच्या ट्रेंडबद्दल माहिती देते. विश्वास न्यूजचे तथ्य तपासणी अहवाल येथे वाचता येतील.

निष्कर्ष: ऑस्ट्रेलियाच्या काँगो बीचवर, उत्तर क्वीन्सलँडमधील प्रस्तावित कोळसा खाण बंदीवर अदानी विरुद्धच्या निषेधाची २०१७ ची प्रतिमा, हिंडनबर्ग विवादाशी संबंधित अलीकडील निषेध म्हणून सामायिक केली जात आहे.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट