Fact Check: व्हायरल पोस्ट मध्ये सांगण्यात येणारा COVID-19 चा अर्थ चुकीचा आहे, विश्वास ठेऊ नये

COVID-19 चा अर्थ ‘सर्टिफिकेट ऑफ आइडेंटिफिकेशन ऑफ वैक्सीनेशन विद आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ असा होत नाही, वायरल पोस्ट खोटी है।

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे ज्यात असा दावा करण्यात येत आहे कि COVID-19 चा अर्थ होतो, ‘सर्टिफिकेट ऑफ आइडेंटिफिकेशन ऑफ वैक्सीनेशन विद आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे आढळले. वर्ल्ड हेअल्थ ऑर्गनाइसेशन (WHO) प्रमाणे COVID-19 मध्ये CO चा अर्थ आहे कॉरोन, VI चा अर्थ आहे व्हायरस आणि D चा अर्थ आहे डिजीज. पहिले याला २०१९ नॉवेल कोरोनाव्हायरस किंवा 2019—nCoV असे नाव देण्यात आले होत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर वर एका पोस्ट मध्ये लिहले गेले आहे: COVID-19 का अर्थ है ‘सर्टिफिकेट ऑफ आइडेंटिफिकेशन ऑफ वैक्सीनेशन विद आर्टिफिशियल इंटेलिजेंस’।
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने जेव्हा व्हायरल पोस्ट चा तपास सुरु केला तेव्हा कळले कि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO) ने ११ फेब्रुवारी २०२० रोजी घोषित केले होते कि COVID मध्ये CO चा अर्थ कोरोना, VI चा अर्थ वायरस आणि D चा अर्थ डिजीज असा आहे. पहिले याला २०१९ नॉवेल कोरोनाव्हायरस किंवा 2019—nCoV असे नाव देण्यात आले होते.

आम्ही डब्ल्यूएचओ ला व्हायरल दाव्यासंदर्भात संपर्क केला. डब्ल्यूएचओ च्या प्रवतांप्रमाणे, COVID-19, सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) आणि कॉमन कोल्ड चे व्हायरस, हे एकाच फैमिली चे व्हायरस आहे. यात CO चा अर्थ कोरोना, VI चा अर्थ वायरस आणि D चा अर्थ डिजीज असा आहे.पहिले याला २०१९ नॉवेल कोरोनाव्हायरस किंवा 2019—nCoV असे नाव देण्यात आले होते.
आम्हाला तपासात ११ फेब्रुवारी २०२० चा डब्ल्यूएचओ च्या प्रेस कॉन्फरन्स चा पण एक व्हिडिओ मिळाला ज्यात, डब्ल्यूएचओ च्या डायरेक्टर जनरल यांनी COVID-19 चा अर्थ समजावला होता.

ट्विटर वर हि पोस्ट “Right To Truth Media” नावाच्या एका यूजर ने शेअर केली. आम्ही या यूजर ची प्रोफाइल स्कॅन केली असता असे कळले कि यूजर चे २२०० पेक्षा जास्ती फोल्लोवर्स आहेत.

निष्कर्ष: COVID-19 चा अर्थ ‘सर्टिफिकेट ऑफ आइडेंटिफिकेशन ऑफ वैक्सीनेशन विद आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ असा होत नाही, वायरल पोस्ट खोटी है।

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट