विश्वास न्यूजने व्हायरल झालेला फोटो तपासला असता हे चित्र अलीकडचे नसून २०११ सालचे असल्याचे आढळून आले. जे लोक आता चुकीच्या संदर्भात शेअर करत आहेत.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): राहुल गांधी ह्यांचे एक पार्टी चे व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या चित्राला आताचे सांगून शेअर करण्यात येत आहे, चित्रात राहुल गांधी सोबत ज्योतिरादित्य सिंधिया देखील दिसतात. हे चित्र शेअर करून दावा करण्यात येत आहे कि नेपाळ राजवंशासोबत संबंध असले तरी केंद्रीय मंत्रीण सिंधीयांना राहुल गांधी समोर कोणी विचारत नाही. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हे छायाचित्र आताचे नसून २०११ सालचे आहे, जे आताच्या संदर्भासह व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Kaushal Dhakad ने 4 मे रोजी हे चित्र शेअर केले आणि लिहले:
राहुल गांधी कुछ नहीं करते, कांग्रेस कुछ नहीं करती मगर सच्चाई अपने आप सामने आ जाती है। नाइट क्लब शादी समारोह में परिवर्तित हो गया और भाजपा नेता भी वहां दिखने लगे। यह अलग बात है कि नेपाल राजवंश में रिश्तेदारी होने के बावजूद वहां केंद्रीय मंत्री सिंधिया को राहुल के सामने कोई पूछ नहीं रहा।
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता. बाकी सोशल मीडिया यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.
तपास:
व्हायरल दाव्यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही चित्राला गूगल ऍडव्हान्स सर्च द्वारे शोधले. ह्या वेळी आम्हाला व्हायरल चित्र एका रिपोर्ट मध्ये सापडले. hindustantimes.com च्या वेबसाईट वर 15 ओक्टोबर 2011 रोजी प्रकाशित एका बातमीत सापडले. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, “थिम्पूच्या चांग लाइम थांग स्टेडियममध्ये राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि राणी जेत्सून पेमा यांच्या स्वागतादरम्यान भूतानचे माजी राजा जिग्मे दोरजी वांगचुक यांच्यासोबत एआईसीसी महासचिव राहुल गांधी आणि राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया. व्हायरल फोटोसोबतच त्याच्याशी संबंधित अनेक छायाचित्रेही बातम्यांमध्ये पाहायला मिळतात.
4 जानेवारी 2016 च्या dailymail.co.uk च्या रिपोर्ट मध्ये आढळले. या रिपोर्टमध्ये भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि राणी जेटसन पेमा यांचे अनेक फोटो आहेत, त्यात आम्हाला व्हायरल फोटो देखील आढळले आहेत.
याच वर्णनासह हे चित्र alamy.com या वेबसाईटवर 15 ऑक्टोबर 2011 रोजी अपलोड करण्यात आले होते. gettyimages.co.nz या वेबसाईटवर व्हायरल चित्रासोबत आणखी काही छायाचित्रेही पाहायला मिळाले.
ऑक्टोबर 2011 मध्ये, UPA सरकार भारतात सत्तेत होती आणि ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रात मंत्री होते. मार्च 2020 मध्ये, सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशातील गुना येथील खासदार सिंधिया यापूर्वी काँग्रेसमध्ये होते.
या संदर्भात पुष्टी करण्यासाठी विश्वास न्यूजने काँग्रेसचे यूपी प्रवक्ते अभिमन्यू त्यागी यांच्याशी संपर्क साधला. आम्ही त्याच्यासोबत व्हायरल पोस्टची लिंकही शेअर केली आहे. माहिती देताना त्यांनी सांगितले की, हे चित्र जुने आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसची प्रतिमा डागाळण्यासाठी काही लोकांकडून जुने फोटो व्हायरल केले जात आहेत.
तपासाच्या अंतिम फेरीत, आम्ही बनावट पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याची तपासणी केली. आम्हाला कळले की फेसबुक वापरकर्ता हा झालावाड, राजस्थानचा रहिवासी आहे. फेसबुकवर युजरचे २ हजारांहून अधिक मित्र आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने व्हायरल झालेला फोटो तपासला असता हे चित्र अलीकडचे नसून २०११ सालचे असल्याचे आढळून आले. जे लोक आता चुकीच्या संदर्भात शेअर करत आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923