Fact Check: ट्विटर वर नाही आहे मनमोहन सिंह, व्हायरल ट्विट फेक आहे

विश्वास न्यूज च्या तपासात पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे सिद्ध झाले. त्यांचे ट्विटर हॅन्डल नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): देशाचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांच्या नावाने सोशल मीडिया वर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. यूजर्स ह्याला खरे समजून शेअर देखील करत आहेत. यूजर्स दावा करत आहेत कि पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांनी काँग्रेस वर हल्ला करत सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची तारीफ केली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हायरल ट्विट खोटा असल्याचे सिद्ध झाले. मनमोहन सिंह ह्यांचे अधिकृत हॅन्डल ट्विटर वर नाही. हि पोस्ट खोटी आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर नरेंद्र गुप्‍ता ने व्हायरल स्क्रीनशॉट आपल्या अकाउंट वर शेअर केला. स्क्रीनशॉट मध्ये मनमोहन सिंह ह्यांचे चित्र दिसते, सोबत लिहले आहे: बड़े बड़े फैसले मैं भी करता था, लेकिन कांग्रेस कभी मुझे अपनी इच्‍छा से कोई काम नहीं करने दी थी, नरेन्‍द्र मोदी खुद फैसले लेता है इसीलिए देश तरक्‍की कर रहा है।

फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. ह्याला खरे समजून बाकी यूजर्स देखील शेअर करत आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने मनमोहन सिंह च्या नावाच्या व्हायरल पोस्ट चे सत्य जाणून घेण्यासाठी, सगळ्यात आधी ट्विट मध्ये दिसत असलेल्या @manmohan_5 ह्या हॅन्डल चा शोध सुरु केला. हा ट्विट एडिटिंग टूल च्या मदतीने बनवण्यात आला होता. तसेच जर का हा ट्विटर हॅन्डल पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांचा असता तर तो वेरिफाइड असता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्व्स न्यूज ने कांग्रेस च्या सोशल मीडिया टीम चे नेशनल को-ऑर्डिनेटर डॉक्‍टर विपिन यादव ह्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल पोस्ट व्हाट्सअँप वर शेअर केली. त्यांनी सांगितले कि हि पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. पूर्व पंतप्रधान सिंह ह्यांचा सोशल मीडिया अकाउंट नाही आहे.

सोशल मीडिया वर ह्या आधी देखील बऱ्याच वेळा सिंह ह्यांच्या नावाने खोट्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, ज्यांचा विश्वास न्यूज ने तपास केला आहे. ह्या तूदेखील तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही, पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांचा खोटा ट्विट व्हायरल करणाऱ्या यूजर चा तपास केला. फेसबुक यूजर नरेंद्र गुप्‍ता हे मुंबई चे रहिवासी आहेत आणि त्यांचे 1600 पेक्षा जास्ती मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे सिद्ध झाले. त्यांचे ट्विटर हॅन्डल नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट