मोहरीचे तेल कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी वापरता येत नाही. मात्र, याचे इतर अनेक फायदे आहेत. व्हायरल पोस्टचा दावा खोटा आहे.
नवी दिल्ली (विश्वास टीम). सोशल मिडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा केला जात आहे की मोहरीचे तेल कोणत्याही व्हायरसला, अगदी कोरोना व्हायरसला पण नष्ट करू शकते. त्यात पुढे असाही दावा केला आहे की कोरोना व्हायरस कोणत्याही व्यक्तीच्या नाकातून शरीरात शिरते. अशा वेळी जर कोणी आंघोळ करण्यापूर्वी नाकपुड्यांना मोहरीचे तेल लावले तर किमान 8 तासांसाठी व्हायरस पासून सुरक्षित राहता येते. विश्वास न्यूजच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. मात्र, मोहरीच्या तेलाचे इतर अनेक फायदे नक्की आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये
महेंद्र पलेचा नावाच्या पेजवर ही व्हायरल पोस्ट शेयर केली आहे. यात लिहिले आहे, “मोहरीचे तेल कोणत्याही व्हायरसला नष्ट करू शकते. कोरोना व्हायरस श्वसन प्रणालीचा रोग आहे ज्यात इतर व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून निघणाऱ्या पाण्याच्या कणांमध्ये व्हायरस असते जे दुसऱ्या व्यक्तीने श्वास घेतल्यावर त्याच्या नाकात शिरते. सकाळी आंघोळ करण्यापूर्वी नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांच्या आत मोहरीचे तेल लावले तर किमान 8 तास व्हायरस पासून सुरक्षित राहता येते. कारण मोहरीचे तेल व्हायरसरोधक तेल आहे ज्यात व्हायरस नाकाच्या भिंतींना चिकटते आणि मरते/नष्ट होते आणि आपल्या फुफुसांचे नुकसान होत नाही. सर्व बांधवांना विनंती आहे की हा उपाय त्वरित अंमलात आणावा आणि कोरोना व्हायरस पासून स्वतःला सुरक्षित ठेवावे, व आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पण नक्की सांगावे.”
या पोस्टची आरकाइव्हड आवृत्ती इथे पाहू शकता.
तपासणी
विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत मोहरीचे तेल कोरोना व्हायरसला नष्ट करू शकते का हे शोधण्याचा प्रयत्न केला. WHO यांच्या वेबसाइट वर आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइट वर असे कुठेही नमूद नाही की मोहरीचे तेल कोरोना व्हायरसला नष्ट करू शकते.
मात्र, आम्हाला मोहरीच्या तेलाचे इतर फायदे नक्कीच सापडले. जसे सूज कमी करणे, शरीरातील वेदना कमी करणे. पण अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही की मोहरीचे तेल वापरून कोरोना व्हायरस संक्रमणावर उपचार करता येतात.
WHO यांच्याप्रमाणे – काही पाश्चिमात्य, पारंपरिक किंवा घरगुती उपचार कोरोनाच्या लक्षणांना थोडे कमी करू शकतात. मात्र असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही की या उपचारांमुळे रोग होत नाही किंवा रोग बरा होतो. यात पुढे असेही म्हटले आहे की कोरोनासाठी उपचार म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध, जसे अँटीबायोटिक इ. घेण्याची शिफारस WHO करत नाही. पाश्चिमात्य आणि पारंपरिक औषध पद्धतींचे अनेक वैद्यकीय अभ्यास सुरु आहेत आणि कोणतीही महत्वपूर्ण माहिती मिळाल्यास ती प्रसिद्ध केली जाईल.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो ने PIB Fact Check यांच्या फेसबुक पेजवर या पोस्टमधील दाव्याला खोटे ठरवले आहे.
विश्वास न्यूजने आयुष मंत्रालयाच्या आयुर्वेदिक डॉक्टर विमल एन यांच्याबरोबर संवाद साधला. त्यांनी सांगितले, “नाकात आग होत असल्यास कधीकधी मोहरीचे तेल वापरले जाते. याचे इतर लाभ पण आहेत, मात्र, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी हे वापरता येत नाही. याचा काहीही पुरावा नाही.”
महेंद्र पलेचा नावाच्या फेसबुक युझरने ही व्हायरल पोस्ट शेयर केली आहे. आम्ही या पेजचे सोशल स्कॅनिंग केले. तपासणीपर्यंत या पेजचे 187 फोलोवर होते.
निष्कर्ष: मोहरीचे तेल कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी वापरता येत नाही. मात्र, याचे इतर अनेक फायदे आहेत. व्हायरल पोस्टचा दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923