नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट कोहली एका मुलीला आपल्या मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. वापरकर्ते हा फोटो व्हायरल करून दावा आहेत की, या फोटोमध्ये विराट कोहलीची मुलगी, वामिका कोहली त्याच्यासोबत आहे.
विश्वास न्यूजला व्हायरल केलेला दावा खोटा असल्याचे आढळले आहे. खरे पाहता, व्हायरल फोटोमध्ये भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंगची मुलगी हिनाया, विराट कोहलीसोबत आहे. हा फोटो 2017 सालचा आहे, जो आता खोटा दावा करून शेअर केला जात आहे.
फेसबुक पेज Sudhanshu Trivedi Fan Club ने 28 नोव्हेंबरला फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे: विराट कोहली त्याच्या मुलीसोबत.#viratkohli #cricket #anushkasharma “
फेसबुक पोस्टचा मजकूर, जसा आहे अगदी तसाच येथे लिहिला गेला आहे. त्याची संग्रहित आवृत्ती येथे वाचा.
या व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी, आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून हा फोटो सर्च केला. विराट कोहलीच्या व्हेरिफाइड इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हायरल फोटो मिळाला आहे. 2 मे 2017 रोजी हा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये इंग्रजीत लिहिले आहे. त्यानुसार, फोटोमध्ये हरभजन सिंगची मुलगी हिनाया दिसत आहे.
तपासाच्या दरम्यान, आम्हाला एबीपी न्यूज (ABP News)च्या वेबसाइटवर व्हायरल फोटोशी संबंधित बातम्या देखील सापडल्या. 2 मे 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की, विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर हरभजनची मुलगी हिनायासोबतचा एक फोटो शेअर केला होता.
फोटोशी संबंधित इतर माहिती इथे वाचता येईल. आता आम्ही विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीबद्दल सर्च केले. 24 जानेवारी 2022 रोजीच्या दैनिक जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये आम्हाला विराट कोहलीची मुलगी वामिकाचा फोटो सापडला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मुलगी वामिकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली नाराज झाला होता. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. त्याचवेळी, ‘Shri Hit Radha Kripa’ नावाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा, मुलगी वामिकासोबतचा एक व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ, जेव्हा कोहली आणि अनुष्का श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते, त्या 5 जानेवारी 2023 रोजीचा आहे.
या पोस्टबाबत आम्ही दैनिक जागरणचे स्पोर्ट्स एडिटर अभिषेक त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, या फोटोमध्ये विराट कोहलीसोबत त्याची मुलगी नसून, हरभजनची मुलगी हिनाया आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
खोटा दावा करणारे फेसबुक पेज आम्ही स्कॅन केले. 7 फेब्रुवारी रोजी तयार करण्यात आलेल्या या पेजचे 12 हजार फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला तपासात आढळले की, विराट कोहली आणि त्याच्या मुलीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी आहे. खरा फोटो 2017 मधील आहे आणि या फोटोमध्ये कोहलीसोबत, भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंगची मुलगी हिनाया आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923