Fact Check: ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्या घरावर सीबीआय (CBI)च्या छाप्याचा बनावट व्हिडिओ व्हायरल
- By: Ashish Maharishi
- Published: Jul 25, 2023 at 11:08 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). उत्तर प्रदेश सरकारच्या प्रख्यात अधिकारी ज्योती मौर्य यांच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक बनावट फोटो, कथा आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टींचा वेळोवेळी तपास करून वाचकांना सत्य सांगण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्या घरांवर सीबीआय (CBI)ने छापे टाकल्याचा दावा करणारे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या कारवाईमुळे दोघांच्याही घरी कोट्यवधी रुपयांचा ऐवज सापडला आहे.
जेव्हा विश्वास न्यूजने याचा तपास केला, तेव्हा हा दावा खोटा ठरला. या तपासात असे आढळून आले की, ज्योती मौर्य यांना बदनाम करण्यासाठी असे व्हिडिओ बनवले जात आहेत आणि प्रसारित केले जात आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वापरकर्ता अंजू प्रजापतीने 14 जुलै रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि दावा केला की सीबीआय (CBI)ने एसडीएम (SDM) ज्योती मौर्य यांच्या घरावर छापा टाकल्याचे लाइव्ह पहा.
त्याचप्रमाणे, काही लोक मनीष दुबे यांच्या घरावर सीबीआय (CBI)च्या छापेमारीच्या नावाखाली एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत. या पोस्टमधील माहिती जशीच्या तशी येथे लिहिण्यात आली आहे. तिची संग्रहित आवृत्ती इथे बघा.
तपास
ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्या व्हिडिओंची सत्यता तपासण्यासाठी विश्वास न्यूजने अनेक ऑनलाइन साधने वापरली. सर्वात अगोदर गुगल ओपन सर्च टूलच्या माध्यमातून संबंधित बातम्या शोधण्यास सुरुवात करण्यात आली. चौकशीदरम्यान, सीबीआय (CBI)ने ज्योती मौर्य किंवा मनीष दुबे यांच्या घरावर छापा टाकल्याची पुष्टी करण्यासाठी आम्हाला कोणतीही माहिती सापडली नाही. तसे काही घडले असते तर मीडियात नक्कीच हेडलाईन्स झळकल्या असत्या.
तपास पुढे नेत असताना आम्ही सीबीआय (CBI)च्या संकेतस्थळाची चाचपणी सुरू केली. शोध घेत असताना आम्हाला येथे देखील अशी कोणतीही प्रेस नोट सापडली नाही.
विश्वास न्यूजने तपास पुढे नेत दैनिक जागरण, बरेलीचे ब्युरो प्रमुख अशोक कुमार यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, व्हायरल झालेली ही पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. पीसीएस (PCS) ज्योती मौर्य आणि होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काय आहे ज्योती मौर्य प्रकरण?
मुळात वाराणसीतील चिरईगाव येथील ज्योती मौर्य यांनी 2010मध्ये आझमगडच्या आलोक मौर्य यांच्याशी लग्न केले होते. आलोक पंचायत राज विभागातील सफाई कर्मचारी आहेत, तर ज्योती यांची 2015मध्ये एसडीएम (SDM) पदावर निवड झाली होती. त्यांना दोन मुलीही आहेत. ज्योती यांनी प्रयागराजच्या देवघाट झलवा येथे एक घर बांधून कुटुंबासह राहण्यास सुरुवात केली होती. सध्या त्या बरेली येथे तैनात आहेत. ज्योती आणि आलोक यांच्यात जवळपास तीन वर्षांपासून मतभेद आहेत. दोन महिन्यांपूर्वी ज्योती यांनी धुमंगंज पोलीस स्टेशनमध्ये पती आणि सासरच्यांविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता, ज्याचा तपास सुरू आहे. ज्योती यांनी आलोकवर नोकरीबद्दल खोटे बोलून लग्न करण्याचा आरोप केला आहे, तर आलोकने ज्योती यांचे व्हॉट्सअॅप चॅट सार्वजनिक करून गंभीर आरोप केले आहेत. ज्योती-आलोक यांचे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आहे.
ज्योती मौर्यच्या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्या विषयीच्या तपासाबद्दल आपण खाली वाचू शकता.
ज्योती मौर्य प्रकरणात मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल
ज्योती मौर्य यांच्या निधनाची अफवा व्हायरल
ज्योती मौर्य यांना तुरुंगात टाकण्यात आले नाही, व्हायरल दावा बनावट आहे
तपासाच्या शेवटी, बनावट पोस्टला पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याची चौकशी करण्यात आली. फेसबुक युजर अंजू प्रजापतीला 14 हजार फॉलोअर्स आहेत. आम्हाला या पेजवर मोठ्या प्रमाणात व्हायरल सामग्री आढळली.
निष्कर्षः ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्या घरावर सीबीआय (CBI)ने केलेल्या छापामारीचा व्हिडिओ बनावट ठरला आहे. या दोघांविरोधात चुकीची माहिती देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
- Claim Review : मनिष दुबे, ज्योती मौर्य यांच्या घरावर सीबीआय (CBI)ची छापेमारी
- Claimed By : फेसबुक पेज अंजू प्रजापती
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.