Fact Check: ‘रईस’च्या प्रमोशनदरम्यानचा शाहरुख खानचा फोटो आता ‘पठाण’शी जोडून व्हायरल
- By: Ashish Maharishi
- Published: Feb 8, 2023 at 11:48 AM
- Updated: Jul 10, 2023 at 06:14 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर भलेही धमाल करत असेल, पण त्याबद्दलच्या खोट्या पोस्ट आणि चुकीची माहिती थांबलेली नाही. पठाण चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खान ट्रेनने घरी गेल्याचा दावा करत आता त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. सोशल मीडियावर काही वापरकर्ते हे चित्र विरोधकांना टोमणे मारण्यासाठी वापरत आहेत तर काहीजण ते खरे असल्याचे मानून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आहे. जो फोटो व्हायरल होत आहे, तो शाहरुख खानच्या रईस या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळचा असल्याचे कळते. त्यावेळी शाहरुख खान मुंबईहून दिल्लीला ट्रेनने गेला होता.
काय व्हायरल होत आहे
मरियम गारमेंट्सच्या फेसबुक पेजने २८ जानेवारी रोजी शाहरुख खान ट्रेनमध्ये बसल्याचे चित्र अपलोड केले आणि लिहिले की, ‘पठाण फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खान घरी जात आहे.’
या चित्रास, वापरकर्ते मिळत्या जुळत्या दाव्यांसह सोशल मीडियावर सामायिक करत आहेत. पोस्टच्या संग्रहित आवृत्तीला येथे पाहिले जाऊ शकते.
तपास
विश्वास न्यूजने सर्वप्रथम शाहरुख खानच्या ट्रेनमधील चित्राचे सत्य जाणून घेण्यासाठी गुगल लेन्सच्या मदतीने शोध सुरू केला. आम्हाला इंडियन एक्सप्रेस वेबसाइटवरील एका बातमीत मूळ चित्र सापडले. २४ जानेवारी, २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत शाहरुख खानचा तोच फोटो वापरला होता, जो आता खोटा दावा करून सामायिक केला जात आहे. त्याविषयी इथे वाचा.
तपासादरम्यान आम्हाला शाहरुख खानच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओही सापडला आहे. त्यास २३ जानेवारी, २०१७ रोजी पोस्ट केले होते. या व्हिडिओमध्ये ‘रईस’च्या प्रमोशनदरम्यान शाहरुख खान ट्रेनमध्ये दिसत आहे.
शोध घेत असताना २३ जानेवारी, २०१७ चा व्हिडिओ सापडला. तो बॉलिवुड हेल्पलाइन नावाच्या यूट्यूब (YouTube) वर अपलोड करण्यात आला होता. ‘रईस’च्या प्रमोशनसाठी शाहरुख खानने मुंबई ते दिल्ली असा ट्रेनने प्रवास केल्याचे सांगण्यात आले.
तपासादरम्यान, आम्हाला प्रताप सिंह चौपहाट नावाच्या यूट्यूब (YouTube) चॅनेलवर शाहरुख खानची मुलाखत सापडली. ती २४ जानेवारी, २०१७ रोजी अपलोड करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये आणि सध्या व्हायरल होत असलेल्या शाहरुख खानच्या फोटोमध्ये बरेच साम्य आढळले.
तपासानंतर विश्वास न्यूजने मुंबईत बॉलिवूडचे कव्हरेज करणारे ज्येष्ठ पत्रकार पराग छापेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट सामायिक केली. त्यांनी पुष्टी केली की, व्हायरल प्रतिमेचा ‘पठाण’शी काहीही संबंध नाही. हे चित्र ‘रईस’च्या प्रमोशनच्या काळातील आहे. त्यावेळी शाहरुख खान मुंबईहून दिल्लीला ट्रेनने गेला होता.
तपासाच्या अंतिम टप्प्यात, मरियम गारमेंट्स या फेसबुक पेजचे सोशल स्कॅनिंग करण्यात आले. हे पेज आझमगडमधील मुबारकपूर येथून चालवले जात असल्याची माहिती मिळाली. या पेजला लाईक करणाऱ्यांची संख्या 33 हजारांहून अधिक आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की, शाहरुख खानचा जो फोटो पठाण चित्रपटाशी जोडून व्हायरल केला जात आहे, तो रईस चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळातील आहे.
- Claim Review : पठाण फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खान घरी जात आहे
- Claimed By : मरियम गारमेंट्सच्या फेसबुक पेज
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.