Fact-check: या व्हायरल संदेशात केलेले विविध दावे खोटे आहेत

व्हायरल होत असलेल्या या पोस्ट मध्ये केलेले विविध दावे खोटे आहे त्यांच्यावर कुठेही पुरावा सापडलेला नाही.

गेल्या काही आठवड्यांपासून विविध व्हाट्सअँप ग्रुपवर आणि विविध फेसबुक पेजवर एक मेसेज फिरतोय. या दीर्घ संदेशात खूप सारे दावे करण्यात आले आहेत.

काय होतंय व्हायरल?

व्हायरल होत असलेली पोस्ट खालीलप्रमाणे आहे.

LAST HOUR🔺
INTERNATIONAL 🔴 ITALY 🇮🇹

IN ITALY THE CURE FOR THE CORONAVIRUS IS FINALLY FOUND.

Italian doctors, disobeyed the world health law WHO, not to do autopsies on the dead of the Coronavirus and they found that it is NOT a VIRUS but a BACTERIA that causes death. This causes blood clots to form and causes the death of the patient.

🔷Italy defeats the so-called Covid-19, which is nothing other than “Disseminated intravascular coagulation” (Thrombosis).

🔷And the way to combat it, that is, its cure, is with the “antibiotics, anti-inflammatories and anticoagulants”. ASPIRIN, indicating that this disease had been poorly treated.
This sensational news for the world has been produced by Italian doctors by performing autopsies on corpses produced by the Covid-19.

🔷Something else, according to Italian pathologists. “The ventilators and the intensive care unit were never needed.”

🔷Therefore in Italy the change of protocols began, ITALY THE SO-CALLED global pandemic is REVEALED AND RAISED BY THE WHO, this cure the Chinese already knew and did not report FOR DOING BUSINESS.

Source: ITALY Ministry of Health.
SHARE THAT THE WORLD KNOWS THAT WE HAVE BEEN DECEIVED AND MURDERED BY OUR OLDER PERSONS !!!
@ italiarevelacurardelcovid19

EYE ALERT

Pass this on to your entire family, neighborhood, acquaintances, friends, colleagues, coworkers … etc. etc … and its environment in general …:
If they get to contract the Covid-19 … which is not a Virus as they have made us believe, but a bacterium … amplified with 5G electromagnetic radiation that also produces inflammation and hypoxia.
They will do the following:
They are going to take Aspirin 100mg and Apronax or Paracetamol …
Why? … because it has been shown that what Covid-19 does is to clot the blood, causing the person to develop a thrombosis and the blood not to flow and not oxygenate the heart and lungs and the person to die quickly due to not be able to breathe.
In Italy they screwed up the WHO protocol and did an autopsy on a corpse that died from Covid-19 … they cut the body and opened the arms and legs and the other sections of the body and realized that the veins were dilated and coagulated blood and all veins and arteries filled with thrombi, preventing the blood from flowing normally and bringing oxygen to all organs, mainly to the brain, heart and lungs and the patient ends up dying,
Already knowing this diagnosis, the Italian Ministry of Health immediately changed the Covid-19 treatment protocols … and began to administer to their positive patients Aspirin 100mg and Apronax …, result: the patients began to recover and present improvements and the Ministry of Health released and sent home more than 14,000 patients in a single day.
URGENT: transmit this information and make it viral, here in our country they have lied to us, with this pandemic, the only thing that our president comes out to say every day is data and statistics but not giving this information to save citizens, will be that It will also be threatened by the elites? … we do not know, suddenly all the governments of the world, but Italy broke the norm … because they were already overwhelmed and in serious chaos of daily deaths …, now the WHO. … would be sued worldwide for covering up so many deaths and the collapse of the economies of many countries in the world … now it is understood why the order to INCINERATE or immediately bury the bodies without autopsy … and labeled them as highly polluting .. .
It is in our hands to carry the truth and hope to save many lives …. SPREAD IN ALL NETWORKS URGENT !!!!! that’s why the antibacterial gel works and the chlorine dioxide … The whole PANDEMIC is because they want to vaccinate and kick to assassinate the masses to control them and reduce the World Population
GOD SAVE US

तपास:

विश्वास न्यूज ने वर सांगितलेल्या दाव्यांना तीन भागात वाटून घेतले, ते खालील प्रमाणे:

दावा क्रमांक १:

A. IN ITALY THE CURE FOR THE CORONAVIRUS IS FINALLY FOUND. Italian doctors, disobeyed the world health law WHO, not to do autopsies on the dead of the Coronavirus and they found that it is NOT a VIRUS but a BACTERIA that causes death. This causes blood clots to form and causes the death of the patient. Italy defeats the so-called Covid-19, which is nothing other than “Disseminated intravascular coagulation” (Thrombosis). And the way to combat it, that is, its cure, is with the “antibiotics, anti-inflammatories and anticoagulants”. ASPIRIN, indicating that this disease had been poorly treated. This sensational news for the world has been produced by Italian doctors by performing autopsies on corpses produced by the Covid-19.

B Something else, according to Italian pathologists. “The ventilators and the intensive care unit were never needed.”

C Therefore in Italy the change of protocols began, ITALY THE SO-CALLED global pandemic is REVEALED AND RAISED BY THE WHO, this cure the Chinese already knew and did not report FOR DOING BUSINESS.

Source: ITALY Ministry of Health.
@ italiarevelacurardelcovid19

दावा क्रमांक २:

A If they get to contract the Covid-19 which is not a Virus as they have made us believe, but a bacterium … amplified with 5G electromagnetic radiation that also produces inflammation and hypoxia.

They will do the following:

Result: the patients began to recover and present improvements and the Ministry of Health released and sent home more than 14,000 patients in a single day.

दावा क्रमांक ३:

A Now the WHO would be sued worldwide for covering up so many deaths and the collapse of the economies of many countries in the world now it is understood why the order to INCINERATE or immediately bury the bodies without autopsy … and labeled them as highly polluting .. .

B It is in our hands to carry the truth and hope to save many lives …. SPREAD IN ALL NETWORKS URGENT !!!!! that’s why the antibacterial gel works and the chlorine dioxide … The whole PANDEMIC is because they want to vaccinate and kick to assassinate the masses to control them and reduce the World Population.

तपास:

या सगळ्या दाव्यांवर विश्वास न्यूज ने एक-एक करून तपास केला.

या पोस्ट मध्ये असा दावा केला आहे की कोरोनाव्हायरसचा उपचार इटलीमध्ये सापडला आहे. पण नुकत्याच काही बातम्यांनुसार इटालियन शास्त्रद्यांनी कोरोनाव्हायरस वर लस सापडल्याचा दावा केला ज्यात त्यांनी असे म्हंटले कि त्यांच्या लसीने, कोरोनाव्हायरस मानवी पेशींमध्ये न्यूट्रलाईस झाला आहे.
स्त्रोत: https://www.cnbctv18.com/healthcare/coronavirus-cure-italy-claims-worlds-first-covid-19-vaccine-report-5850281.htm

अजून एका दाव्यात असे म्हटले आहे की, इटालियन डॉक्टरांनी, कोरोनाव्हायरसच्या मृत व्यक्तींवर शवविच्छेदन न करण्याच्या (WHO) जागतिक आरोग्य कायद्याचे उल्लंघन केले आणि त्यांना असे आढळले की व्हायरस मुळे न्हवे तर बॅक्टरीया मुळे लोकांचा जीव जात होता. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असतात. पण विश्वास न्यूज ने तपास केला असता असे आढळले कि असा कुठलाही जागतिक आरोग्य कायदा WHO ने दिला नाही. पण नुकतेच, WHO नि कोरोनाव्हायरस च्या संदर्भात मृतदेहाच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी संक्रमण प्रतिबंधक आणि नियंत्रण: अंतरिम मार्गदर्शन आपल्या संकेतस्थळावर घोषित केले जे आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना शवविच्छेदन युनिट, शवगृह या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करते.
त्याबद्दल इथे वाचा.

तसेच आता याबद्दल खात्री झालीच आहे कि कोरोनाव्हायरस हा बॅक्टरीया नसून व्हायरस आहे.

व्हायरल संदेशामधील आणखी एक दावा म्हणतो: कोरोनाव्हायरस डिसीमिनेटेड इंट्राव्हास्क्यूलर कोग्युलेशन (थ्रोम्बोसिस) शिवाय काहीच नाही
तर डिसीमिनेटेड इंट्राव्हास्क्यूलर कोग्युलेशन (थ्रोम्बोसिस) म्हणजे काय? रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव थांबविण्याच्या रक्ताच्या क्षमतेवर परिणाम करणारी ही स्थिती आहे. असे बरेच दावे आहेत जे म्हणतात रूग्णांमध्ये थ्रोम्बोसिस मृत्यूचे एक प्रमुख कारण होते. पण हा दावा दिशाभूल करणारा आहे आणि सर्वत्र थ्रोम्बोसिसमुळे रुग्ण बळी पडतात असे नाही. विश्वास न्यूज ला नुकतीच आयरिश रुग्णांवर केलेली एक स्टडी सापडली.
थ्रोम्बोसिस ला मुख्य कारण म्हणून बघता येणार नाही.


लॅन्सेट स्टडी मध्ये असे म्हटले आहे की श्वसनक्रिया अपयश हे मृत्यूचे मुख्य कारण आहे.

विश्वास न्यूज ने द लोकल इटली च्या संपादक, पत्रकार क्लेअर स्पीक यांच्या सोबत संवाद साधला, ज्यांनी याची पुष्टी केली की व्हॉट्सअ‍ॅप संदेशावरील दावे खोटे आहेत आणि इटालियनच्या आरोग्य मंत्रालयाने पोस्टमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टीची घोषणा केलेली नाही.

व्हायरल झालेल्या या पोस्ट च्या दुसऱ्या टप्प्यात असा दावा केला गेला आहे कि कोरोनाव्हायरस ला 5G सोबत ऍम्प्लिफाय केल गेल आहे, पण एप्रिल २३, २०२० रोजी युनाइटेड नॅशन च्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानासाठी एजन्सीने म्हंटले कि 5G तंत्रन्यानाचा आणि कोरोनाव्हायरस चा काहीही संबंध नाही. त्याबद्दल इथे वाचा.


आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे कि, अँटीबायोटिक्स व्हायरस विरूद्ध कार्य करीत नाहीत, फक्त बॅक्टरीया विरुद्धच ते काम करू शकतात. कोरोनाव्हायरस एक विषाणू आहे आणि म्हणूनच, अँटी-बायोटिक चा उपचारासाठी वापर करू नये. तसे निर्देश WHO नि देखील दिले आहेत.

पोस्टमध्ये असा दावाही केला आहे की इटलीने एकाच दिवशी १४००० रुग्णांना घरी पाठवले, परंतु इटलीने दिवसभरात घरी पाठवलेली सर्वाधिक रुग्णांची संख्या 30 एप्रिल रोजी प्रमाणे ४६९३ इतकी आहे.

पोस्ट मध्ये तिसऱ्या दाव्यात असे म्हंटले आहे कि WHO वर खटला दाखल हू शकतो, पण आम्ही इंटरनेट वर शोध घेतला असता याची कुठेही नोंद नाही.

विश्वास न्यूजने एक इटालियन डॉक्टर मार्को विनेल्ली यांच्याशी संपर्क साधला जे कोरोनाव्हायरस मध्ये आपली सेवा देत आहे. पोस्ट मध्ये एक वक्तव्य आहे, ज्यात असे म्हंटले आहे कि इटली च्या पॅथॉलॉजिस्ट नि असे म्हंटले कि व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागाची गरज या साथीच्या रोगाला न्हवती, तसेच या पोस्ट मध्ये असे पण पुढे म्हंटले आहे कि कोरोनाव्हायरस च्या रुग्णांना Aspirin 100mg आणि Apronax द्यावे, या डॉक्टरनी हे दोन्ही दावे नाकारले.

डॉ सजल बन्सल, जे नागपूर च्या कोरोनाव्हायरस विभागात कार्यरत आहेत, त्यांना देखील आम्ही हेच प्रश्न विचारले, अँटीकोआगुलंट्स रुग्णांना देण्याबाबतीत ते बोलले कि रुग्णांच्या परिस्थिती वर हे औषध दिले जाते, आधी त्यांची रक्त तपासणी होते आणि जर त्यांना अँटीकोआगुलंट्स ची गरज असेल तरच ते दिले जाते, सगळ्या रुग्णांना एकच औषध देऊ शकत नाही. पुढे ते असे पण म्हणाले कि कोरोनाव्हायरस हा एक श्वसन रोग आहे, आणि त्यामुळे असे कोणीच म्हणू शकत नाही कि त्यांना व्हेंटिलेटर ची गरज नाही. त्यांनी रुग्णांवर उपचारासाठी Asprin 100 mg आणि Apronax किंवा paracetamol दिलेले नाही असे सांगितले.

स्पॅनिश भाषेत प्रसारित होत असलेल्या त्याच पोस्ट वर विश्वास न्यूज ला फॅक्ट-चेक सापडला.

विश्वास न्यूजने या वेबसाईट चे फॅक्ट-चेकर यांच्या सोबत संपर्क साधला, बोलिव्हिया व्हेरिफाच्या चे जोक़िन मार्टेला म्हणाले, “बोलिव्हियामध्ये हा संदेश केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरुन प्रसारित केला जात नव्हता, तर फेसबुकवरही प्रसिद्ध करण्यात आला होता. मे महिन्यात सुरुवातीला हि पोस्ट विविध सोशल प्लॅटफॉर्म वर यायला लागली आणि नंतर ती बर्‍याच लोकांनी शेअर केली. मेसेजमध्ये कोरोनाव्हायरस ला बरे करण्यासाठी अ‍ॅस्पिरिन्स आणि इतर औषधांची शिफारस केली गेली आहे. या पोस्ट वर कोनीही पुढे पुरावे सादर केले नाही.

सरकार आमच्यासोबत खोटे बोलत आहे यावर विश्वास ठेवून बर्‍याच लोकांनी ही पोस्ट शेअर केली होती. काहींनी तर हि वाचून स्वत: वर औषधोपचार पण केले आणि ते अंमलात आणले. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. फॅक्ट-चेकर्स म्हणून या परिस्थितीत आपले काम अजून महत्वाचे ठरते.”

हि पोस्ट विविध सोशल प्लॅटफॉर्म वर अनेक लोकांनी शेअर केली, त्या पैकी एक आहेत मनोज गोएंका. त्यांनी हि पोस्ट फेसबुक वर शेअर केली. ते सध्या चुरु येथे राहतात तसे ते कलकत्त्याचे रहिवासी आहेत. त्यांचे ५००० फेसबुक वर मित्र आहेत. त्यांच्या या पोस्ट ला ८ वेळा शेअर केले गेले आणि २३ लोकांनी त्यावर रिऍक्ट केले.

निष्कर्ष: व्हायरल होत असलेल्या या पोस्ट मध्ये केलेले विविध दावे खोटे आहे त्यांच्यावर कुठेही पुरावा सापडलेला नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट