मुकेश अंबानी यांना नातू झाल्याच्या खुशीत जियो कस्टमर्स ला 555 रुपए चा फ्री रिचार्ज देण्याची घोषणा केली गेली नाही. व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): जर तुम्हाला असा मेसेज किंवा पोस्ट येत आहे ज्यात दावा केला जात आहे कि, रिलायन्स जियो आपल्या यूजर्स ला ५५५ रुपयांचा फ्री रिचार्ज देत आहे त त्यावर विश्वास ठेऊ नका. सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे कि मुकेश अंबानी यांना नातू झाल्याच्या खुशीत सगळ्या यूजर्स ला ५५५ रुपयांचा तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज देत आहेत. रिचार्ज मिळवण्याची लिंक देखील लोकं शेअर करत आहेत.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे, आणि पोस्ट सोबत शेअर करण्यात येणाऱ्या लिंक द्वारे लोकांचा पर्सनल डेटा चोरी करण्यात येत आहे. रिलायन्स जियो आपल्या यूजर्स ला ५५५ रुपयांचा फ्री रिचार्ज देत आहे.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला व्हाट्सअँप चॅट-बोट नंबर 9599299372 वर या पोस्ट ला फॅक्ट चेक करण्याची रिक्वेस्ट मिळाली. पोस्ट वर लिहले आहे: Mukesh Ambani ने त्यांना नातू झाल्याच्या खुंटीशीत सगळ्या जियो यूजर्स ला 555 रुपयांचा रिचार्ज फ्री मध्ये द्यायचा कबुल केले आहे. मला फ्री रिचार्ज मिळाला, तम्ही देखील मिळवू शकता.
https://cutt.ly/JioFreeRecharge कृपया लक्ष द्या, ऑफर फक्त, 30 JANUARY 2021 पर्यंत.
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात रिलायन्स जियो च्या वेबसाईट पासून केली https://www.jio.com/ आणि अँप वर या ऑफर बद्दल सर्च केले. जर जियो तर्फे असा कुठला ऑफर असता तर त्याची माहिती वेबसाईट वर नक्की मिळाली असती. पण आम्हाला अशी कुठलीच माहिती मिळाली नाही.
आम्ही रेलिअन्स जियो चे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट देखील पहिले, पण आम्हाला कुठलाच ऑफर त्यावर मिळाला नाही.
आम्ही व्हायरल पोस्ट वर असलेल्या लिंक वर क्लिक केले, त्यांनी आम्हाला आमच्या जियो नंबर सोबत संबंधित माहिती मागितली. हि माहिती भरल्या नंतर आम्हाला १० व्हाट्सअँप ग्रुप वर आमच्या मित्रांना हे शेअर करण्यास सांगितले. असे केल्यानंतर स्क्रीन वर आम्हाला रेजिस्ट्रेशन मिळाले. त्यावर आम्हाला पॉर्न कन्टेन्ट ची एक वेबसाईट ची लिंक देखील मिळाली.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती करून घेण्यासाठी आम्ही आयटी तज्ज्ञ आयुष भारद्वाज यांना व्हायरल संदेशासह लिंक पाठवली. या दुव्याचे विश्लेषण केल्यानंतर, त्यांनी आम्हाला सांगितले की हे ब्लॉगपोस्टवर तयार केलेले एक पृष्ठ आहे, ते वेबसाइटवर दुवा नाही. या पृष्ठाचा उद्देश केवळ वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरणे आहे. या पृष्ठावर एक नंबर देखील आढळतो, त्यापुढील असे लिहिले आहे की आतापर्यंत बर्याच वापरकर्त्यांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे. वास्तविक तो डेटाच नाही तर केवळ जावास्क्रिप्ट आहे, ज्यामुळे ही संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसते. हा नंबर पाहता असे समजू नये की बर्याच लोकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे आणि तो सतत घेत आहेत.
आम्ही रिलायन्स च्या जियो च्या कस्टमर केअर अधिकारी अजित यांच्यासोबत बोललो. त्यांनी सांगितले कि व्हायरल होत असलेला मेसेज फेक आहे. रिलायन्स जियो या प्रकारचा कुठलाच ऑफर देत नाही आहे.
आम्ही इंटरनेट वर देखील मुकेश अंबानी यांना नातू झाल्याच्या खुशीत ते कस्टमर्स ला कुठला ऑफर देत आहेत का या संबंधी सर्च केले, पण आम्हाला कुठेच अशी मीडिया रिपोर्ट मिळाली नाही, ज्याने व्हायरल पोस्ट मध्ये दिलेल्या दाव्याची खात्री पटेल.
फेसबुक वर व्हायरल पोस्ट, INDIAN FREE FIRE LOVERS (MAX PRITAM) नावाच्या पेज ने शेअर केली आहे. या पेज च्या प्रोफाइल ला स्कॅन केल्यानंतर हा ग्रुप ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी बनवल्या गेल्याचे आम्हाला कळले. बातमी बनावे पर्यंत त्याचे 1043000 मेंबर्स होते.
निष्कर्ष: मुकेश अंबानी यांना नातू झाल्याच्या खुशीत जियो कस्टमर्स ला 555 रुपए चा फ्री रिचार्ज देण्याची घोषणा केली गेली नाही. व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923