विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा दुष्प्रचार असल्याचे समजले. व्हायरल होत असलेले चित्र एडिट करून ब्रेकिंग प्लेट वर चालवण्यात आले. राघव चढ्ढा यांनी भगवंत मान यांच्याबाबत असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विधानसभा निवडणुकीबाबत पंजाबमध्ये राजकीय सट्टेबाजी सुरू आहे. भगवंत मान यांना आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ब्रेकिंग प्लेट चे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम आदमी पार्टीचे सदस्य राघव चड्ढा यांनी भगवंत मान यांच्याबद्दल सांगितले होते की, लोखंड लोखंडाला कापतो, त्याचप्रमाणे मद्यपी ड्रग्ज संपवतो, असा दावा केला जात आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा दुष्प्रचार असल्याचे सिद्ध झाले. व्हायरल होत असलेले चित्र एडिट करून चालवण्यात येत आहे. राघव चढ्ढा यांनी भगवंत मान यांच्याबाबत असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Monalisa Biswal ने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करून लिहले: भगवंत मान को शराब की जबरदस्त लत है, फिर भी आम आदमी पार्टी ने उन्हें पंजाब में मुख्यमंत्री उम्मीदवार घोषित किया। इस बारे में आम आदमी पार्टी सदस्य राघव चड्ढा ने कहा, “लोहा लोहे को काटता है, वैसे ही शराबी नशे को खत्म करेगा”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
राघव चढ्ढा यांनी त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत असे विधान करणे अस्वाभाविक आहे, त्यामुळे प्रथमदर्शनी ते खोटे असल्याचे सूचित केले जात आहे. बातम्यांच्या शोधात आम्हाला असे कोणतेही विधान किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही वक्तव्य सापडले नाही. आम्ही राघव चड्ढा यांचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स देखील तपासले, परंतु आम्हाला कुठेही व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती सापडली नाही. आम्ही आम आदमी पार्टीचे सोशल मीडिया खातेही तपासले. परंतु आम्हाला तेथेही व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही.
तपास सुरू असताना आम्ही व्हायरल पोस्ट काळजीपूर्वक पाहिली. पाहिल्यावर, आम्हाला आढळले की व्हायरल पोस्टवर एबीपी न्यूजचा लोगो आहे. यानंतर आम्ही काही कीवर्डद्वारे गुगलवर सर्च केले. या दरम्यान आम्हाला 18 जानेवारी 2022 रोजी एबीपीच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हायरल दाव्याशी संबंधित एक व्हिडिओ सापडला. व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्यानंतर, आम्हाला आढळले की व्हायरल स्क्रीनशॉट संगणकाद्वारे एडिट केला गेला आहे. व्हायरल स्क्रीनशॉटसह दृश्य 1 मिनिट 44 सेकंदावर पाहिले जाऊ शकते. 1 मिनिट 44 सेकंदात, राघव चड्ढाचे नाव लिहून येते, ज्याला एडिट करून लोहा लोहे को काटता है, वैसे ही शराबी नशे को खत्म करेगा असे जोडले आहे.
खाली दिलेला कोलाज दोघांमधला अंतर स्पष्ट सांगतो.
अधिक तपशिलांसाठी, आम्ही आपचे प्रवक्ते Harjot Bhains ह्यांना केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. राघव चढ्ढा यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आमची प्रतिमा खराब करण्यासाठी विरोधी पक्ष अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत.
तपासाअंती, आम्ही फेसबुक यूजर Monalisa Biswal ह्यांचे सोशल स्कॅनिंग केले ज्याने ही पोस्ट शेअर केली. स्कॅनिंगवरून, आम्हाला समजले की यूजर एका विशिष्ट विचारसरणीने प्रभावित आहे. ऑगस्ट २०१२ पासून फेसबुकवर वापरकर्ता सक्रिय आहे. मोनालिसा बिस्वालचे फेसबुकवर 14,626 फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा दुष्प्रचार असल्याचे समजले. व्हायरल होत असलेले चित्र एडिट करून ब्रेकिंग प्लेट वर चालवण्यात आले. राघव चढ्ढा यांनी भगवंत मान यांच्याबाबत असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923