Fact Check: भाजप चा झेंडा फडकवताना लोकांचा हा व्हिडिओ जम्मू काश्मीर चा आहे, पीओके चा नाही

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. हा व्हायरल व्हिडिओ पीओके चा नाही जम्मू काश्मीर चा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, व्हिडिओ मध्ये बस वर बसलेले लोकं भाजप चा झेंडा दाखवत आहे. या व्हिडिओ मध्ये लोकं उत्साहात दिसतात आणि झेंडा फडकवताना नारे देखील लावतात. यूजर्स विडिओ शेअर करताना दावा करत आहेत कि हा पीओके चा व्हिडिओ आहे.

विश्वास न्यूज ने या दाव्याचा तपास केला आणि कळले कि व्हायरल होत असलेला व्हिडिओ पीओके चा नाही तर, जम्मू काश्मीर चा आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sri live ने हा व्हिडिओ शेअर करून दावा केला, “Bjp flag in pakistan occupied kashmir.
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हा व्हडिएओ invid टूल मध्ये अपलोड केला आणि काही किफ्रेम्स काढले. नंतर आम्ही या किफ्रेम्स ला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले आणि सर्च करण्यास सुरुवात केली. आम्हाला २२ नोव्हेंबर २०२० रोजी, भाजप च्या जम्मू काश्मीर संबंधी अधिकृत फेसबुक पेज वर अपलोड केलेला व्हिडिओ मिळाला ज्यात व्हायरल छायाचित्राचे काही अंश आम्हाला सापडले.
व्हिडिओ सोबत लिहले होते, “#DDCElections #JKWithBJP #DDCElections #JKWithBJP Visuals from #JammuKashmir clearly indicates the love and affection of the people as well as their rock-hard faith on the leadership of PM Narendra Modi Ji See Less
पोस्ट प्रमाणे हा व्हिडिओ जम्मू काश्मीर चा आहे.

या नंतर आम्ही भाजप च्या जम्मू काश्मीर युनिट चे मीडिया प्रमुख मंजूर भट यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि, “हा व्हिडिओ जम्मू च्या किश्तवार मध्ये नुकत्याच झालेल्या एका निवडणुकीच्या रॅली चा व्हिडिओ आहे.”
विश्वास न्यूज ला झाले कि हा व्हिडिओ पीओके चा नसून जम्मू काश्मीर चा आहे.
जम्मू काश्मीर मध्ये २८ नोव्हेंबर आणि १९ डिसेंबर रोजी डीडीसी निवडणूक आणि पंचायत उपनिवडणूक ८ टप्प्यात होत आहेत.

आम्ही खोटा दावा करून छायाचित्र शेअर करणारे फेसबुक यूजर, Sri live याचे प्रोफाइल स्कॅन केले. यूजर चे फेसबुक वर १,९५७ फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. हा व्हायरल व्हिडिओ पीओके चा नाही जम्मू काश्मीर चा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट