लाल कृष्ण अडवाणी फेब्रुवारी 2020 मध्ये काश्मिरी पंडित वर बनलेल्या ‘शिकारा’ मुवि च्या स्पेशल स्क्रिनिंग मध्ये लाल कृष्ण अडवाणी गेले होते. हा चित्रपट विधु विनोद चोपड़ा ह्यांनी डायरेक्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये विधु विनोद चोपड़ा देखील दिसतात. ह्या व्हिडिओचा आता रिलीज झालेल्या The Kashmir Files सोबत काही संबंध नाही आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काश्मिरी पंडितांवर नुकतीच The Kashmir Files हे चित्रपट चर्चेत आहे. ह्या संदर्भात सोशल मीडिया वर एक 26 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात भाजप चे वरिष्ठ नेता लाल कृष्ण आडवाणी दिसतात. दावा करण्यात येत आहे कि अडवाणी हे काश्मिरी पंडितांवर बनलेल्या ह्या The Kashmir Files चित्रपट पाहून रडले. विश्वास न्यूज च्या तपासात समजले कि हा व्हिडिओ जवळपास दोन वर्ष जुना आहे, काश्मिरी पंडितांवर अजून एक चित्रपट बनले होते, ‘शिकारा’, त्याच्या स्क्रिनिंग ला अडवाणी भावुक झाल्याचा हा व्हिडिओ आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Ishwar Lal Chouhan ने 12 मार्च 2022 रोजी व्हिडिओ पोस्ट करून दावा केला: कश्मीरी पंडितों पर बनी फिल्म #TheKashmiriFiles को देखकर रो पड़े भाजपा के वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी जी….
फेसबुक वर अन्य यूजर्स देखील हा व्हिडिओ पोस्ट करून असाच दावा करत आहे.
तपास:
व्हायरल दाव्याचा तपास करण्यास आम्ही किवर्ड सर्च पासून सुरु केले. आम्हाला 8 फरवरी 2020 रोजी NDTV च्या एका बातमीची लिंक मिळाली. ह्यात व्हायरल व्हिडिओ अपलोड केला होता. ह्या बातमी प्रमाणे, विधु विनोद चोपड़ा चे चित्रपट शिकारा रिलीज झाली असून, तो चित्रपट बघायला, भाजप चे वरिष्ठ नेता लाल कृष्ण अडवाणी पोहोचले. चित्रपट पाहून ते भावुक झाले. हा व्हिडिओ विधु विनोद चोपड़ा ह्यांनी देखील शेअर केला.
7 फरवरी 2020 रोजी timesnowhindi ने देखील हि बातमी घेतली, ज्यात देखील दिले होते कि चित्रपट पाहून अडवाणी भावुक झाले. विधु विनोद चोपड़ा, शिकारा चित्रपटाचे डायरेक्टर आहे. ते स्वतः अडवाणींकडे जाऊन त्यांना सावरताना दिसतात.
Vidhu Vinod Chopra Films ट्विटर अकाउंट वर देखील 7 फरवरी 2020 रोजी हा व्हिडिओ ट्विट करून लिहले गेले आहे: Shri L K Advani at the special screening of #Shikara We are so humbled and grateful for your blessings and your appreciation for the film Sir.
ह्या दाव्याबद्दल अधिक माहिती साठी, आम्ही लाल कृष्ण अडवाणी ह्यांच्या पीए ला संपर्क केला, त्यांनी सांगितले कि कॉरोन काळापासून अडवाणी घराबाहेर निघाले नाही आहे. ते The Kashmir Files मुवि बघायला गेले हि मात्र अफवा आहे.
व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह, फेसबुक यूजर Ishwar Lal Chouhan ह्यांचे फेसबुक प्रोफाइल आम्ही स्कॅन केले. ते एका विशिष्ठ राजनेतिक दलासोबत जुडलेले आहे. ते ऑक्टोबर 2012 पासून सक्रिय आहे.
निष्कर्ष: लाल कृष्ण अडवाणी फेब्रुवारी 2020 मध्ये काश्मिरी पंडित वर बनलेल्या ‘शिकारा’ मुवि च्या स्पेशल स्क्रिनिंग मध्ये लाल कृष्ण अडवाणी गेले होते. हा चित्रपट विधु विनोद चोपड़ा ह्यांनी डायरेक्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये विधु विनोद चोपड़ा देखील दिसतात. ह्या व्हिडिओचा आता रिलीज झालेल्या The Kashmir Files सोबत काही संबंध नाही आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923