Fact Check: आयफा 2019 चा व्हिडिओ कतरीना च्या लग्नाचा सांगून व्हायरल

: विश्वास न्यूज च्या तपासात कतरिनाच्या लग्नाचा सांगून व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ मुंबई, 2019 मध्ये आयफा अवॉर्ड्स चा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नापासून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या फेक न्यूज पसरवल्या जात आहे. आता कॅट-विक्कीच्या रिसेप्शन पार्टीत सलमान खानने गाणे म्हंटल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टची चौकशी केली. असल्याचे आमच्या तपासात कळले. 2019 मध्ये आयफा अवॉर्ड्स दरम्यान काढलेली एक व्हिडिओ क्लिप आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर शोएब जमशेद ने 10 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड करून लिहले: ‘Leaked video of the reception’
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल व्हिडिओच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम ऑनलाइन साधनांचा वापर केला. InVID टूलवर व्हिडिओ अपलोड करून विश्वास न्यूज ने विडिओ ग्रेब्स घेतले. मग गुगल रिव्हर्स इमेज टूलवर अपलोड करून शोध सुरू केला. आम्हाला अनेक ठिकाणी व्हायरल झालेला व्हिडिओ सापडला. 8 नोव्हेंबर 2019 रोजी एका YouTube चॅनेलवर आम्हाला हा व्हिडिओ सापडला. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडिओ कतरिनाच्या लग्नाच्या आधी म्हणजे दोन वर्षे जुना असल्याचे स्पष्ट झाले.

आमच्या तपासादरम्यान, आम्हाला फेसबुकवरील आयफा अवॉर्ड्सच्या पेजवर मूळ व्हिडिओ सापडला. 14 ऑक्टोबर 2021 रोजी अपलोड केलेले, मुंबईतील IIFA 2019 दरम्यान सलमान खानचे हे प्रदर्शन होते. हा व्हिडिओ इथे बघा.

अधिक तपास करत विश्वास न्यूजने बॉलिवूड बीट चे ज्येष्ठ पत्रकार पराग चाचेकर ह्यांना संपर्क केला. त्याने सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओचा कतरिना कैफच्या लग्नाशी काहीही संबंध नाही.

तपासाअंती विश्वास न्यूजने बनावट पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी केली. शोएब हा यूजर बांगलादेशचा रहिवासी असल्याचे आम्हाला समजले.

निष्कर्ष: : विश्वास न्यूज च्या तपासात कतरिनाच्या लग्नाचा सांगून व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ मुंबई, 2019 मध्ये आयफा अवॉर्ड्स चा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट