व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि एकनाथ शिंदे ह्यांनी नशेत एअरपोर्ट वर मीडिया ला संबोधले तो दिशाभूल करणारा आहे. एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक दावा एका व्हिडिओ सह व्हायरल होताना दिसला. त्यात म्हंटले होते कि महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र हे एअरपोर्ट वर मद्यपान करून नशेत होते. व्हिडिओ मध्ये एकनाथ शिंदे हे रेपोर्टर्स च्या मध्ये दिसतात आणि असे वाटते जणू त्यांनी मद्यपान केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. एकनाथ शिंदे ह्यांनी एअरपोर्ट वर नशेत रेपोर्टर्स चे संबोधन केले नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज, Isma Times ने व्हायरल व्हिडिओ 25 June रोजी शेअर केला आणि लिहले: Rebel Shiv Sena leader Shinde. Was drunk on power or just drunk?
हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
आम्हाला हा दावा ट्विटर वर देखील व्हायरल होत असताना दिसला.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात व्हिडिओ ला नीट निरखून पाहण्यापासून केली. व्हिडिओ ब्लर असल्याचा दिसले पण त्यावर एक लोगो होता, त्यावर ‘MH 04’ असे लिहले होते. म्हणून आम्ही असे पेजेस तपासले ज्यावर आम्हाला हा लोगो दिसेल.
विश्वास न्यूज ला तो पेज सापडला पण इथे आम्हाला तो व्हिडिओ दिसला नाही.
आम्ही त्यानंतर एकनाथ शिंदे ह्यांचे फेसबुक पेज पहिले. त्यात आम्ही ‘mentions’ हा सेक्शन तपासला. त्यात आम्हाला एक यूजर आढळला ज्याने ह्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला होता.
हा व्हिडिओ देखील ब्लर होता पण ह्यात एकनाथ शिंदे नशेत दिसत नव्हते. आम्हाला त्या व्हिडिओ वर एक मोबाईल नंबर दिसला जो त्या मीडिया चे एडिटर संदीप लब्दे ह्यांचा होता. विश्वास न्यूज ने त्यांना संपर्क केला.
संदीप लब्दे ह्यांनी आम्हाला सांगितले, “तो व्हिडिओ आम्हीच अपलोड केला होता. पण हा दावा कि एकनाथ शिंदे हे नशेत होते हा खोटा आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जसे दिसते, रेपोर्टर्स ने शिंदे ह्यांना घेरून घेतले होते. हा व्हिडिओ ते सुरत वरून गुवाहाटी करता निघाले असतानाचा आहे. तेव्हा एअरपोर्ट वर खूपं गोंधळ होता आणि अश्यातच हा व्हिडिओ घेतला गेला आहे. कोणीतरी ह्या व्हिडिओ ची सुरुवात क्रॉप करून शेअर करत आहे. व्हायरल दावा खोटा आहे.“
त्यांनी व्हाट्सअँप वर आमच्या सोबत खरा व्हिडिओ देखील शेअर केला, ह्यात एकनाथ शिंदे सध्या स्तिथीत पत्रकारांना संबोधताना दिसतात.
अजून माहिती करीत आम्ही, ANI चे प्रमोद शर्मा ह्यांना देखील संपर्क केला. त्यांनी पण सांगितले कि सुरत एअरपोर्ट वर एकनाथ शिंदे नशेत नव्हते.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओं पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. Isma Times ला 21,599 लोकांनी लाईक केले आहे.
निष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि एकनाथ शिंदे ह्यांनी नशेत एअरपोर्ट वर मीडिया ला संबोधले तो दिशाभूल करणारा आहे. एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923