X
X

Fact Check: सचिन तेंडुलकर यांच्या नावावर व्हायरल होत असलेली गोष्टं काल्पनिक आहे

विश्वास न्यूज च्या तपासात सचिन तेंडुलकर यांच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट काल्पनिक असल्याचे समजले.

  • By: Umam Noor
  • Published: Feb 15, 2021 at 11:33 AM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत एक गोष्टं व्हायरल होत आहे, ज्यात सांगण्यात येत आहे कि कसे सचिन तेंडुलकर शाकाहारी बनलेत. या पोस्ट ला खरे मानून सोशल मीडिया वर यूजर्स त्याला शेअर करत आहेत. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि हि गोष्टं काल्पनिक आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Suresh Jain Rituraj ने १३ फेब्रुवारी २०२१ रोजी एक पोस्ट अपलोड केली, ज्यात सचिन तेंडुलकर यांचे एक छायाचित्र आहे आणि सोबत लिहले आहे, “मैंने जिस दिन चिकन शॉप में मुर्गे को सामने कटते देखा, मेरी अंतरात्मा कांप गई. मैं उस रात सो नही सका. मेरी आँखों के सामने रात भर मेरे बच्चो का चेहरा घूम रहा था. वो जीव भी तो किसी का बच्चा था. मेरे स्वाद के लिए उसे कितनी भयंकर पीड़ा से गुजरना पड़ा. मैंने उसी दिन आजीवन शाकाहारी बनने का संकल्प ले लिया: सचिन रमेश तेंदुलकर।
अर्थात: मी ज्या दिवशी चिकन शॉप मध्ये माझ्या समोर मुर्गा कापताना बघितले त्यादिवशी मला विचित्र वाटले. मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या लहान मुलांचा चेहरा येत होता. ते जीव पण कोणाचे लेकरू असतील. माझ्या स्वादासाठी कोणाला भयंकर पीडा मधून जावे लागते. मी त्यादिवशी आजीवन शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला: सचिन रमेश तेंडुलकर.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

सोशल मीडिया वर बरेच यूजर या खोट्या गोष्टी ला खरे मानून शेअर करत आहेत.

तपास:
आमच्या तपासाची सुरुवात आम्ही व्हायरल दाव्याचा तपास गूगल न्यूज सर्च द्वारे केला. न्यूज सर्च मध्ये आम्हाला सचिन तेंडुलकर चा असा कुठलाच विधान सापडला नाही. आम्हाला त्यांची शाकाहारी असल्याची देखील कुठलीच बातमी मिळाली नाही.

टाइम्स ऑफ इंडिया, एनडीटीव्ही फूड ची न्यूज वेबसाईट यावर आम्हाला सचिन तेंडुलकर मांसाहारी असल्याच्या काही बातम्या सापडल्या.

२ जानेवारी २०१८ रोजी सचिन तेंडुलकर च्या ऑफिसिअल इंस्टाग्राम अकाउंट वर आम्हाला एक व्हिडिओ मिळाला, ज्यात त्यांना नवीन वर्ष प्रित्यर्थ चिकन बनवताना पाहिले जाऊ शकते. तसेच ३० ऑक्टोबर २०२० रोजी कुक्ड फिश चे छायाचित्र पोस्ट करून त्यांनी लिहले आहे, ‘हे माझी मुलगी सारा हिने सगळ्यांसाठी बनवले.”

सगळ्यांचे खाण्या-पिण्याबद्दल आपले स्वतंत्र मतं असतात, पण कोणाबद्दल खोटा दावा व्हायरल करणे चुकीचे आहे.

विश्वास न्यूज ने पोस्ट च्या मागचे सत्य जाणून घ्यायला दैनिक जागरण चे स्पोर्ट्स एडिटर, अभिषेक त्रिपाठी यांना संपर्क केला आणि त्यांच्यासोबत हि पोस्ट शेअर केली. त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या एका जवळच्या व्यक्तीकडून पुष्टी करून सांगितले कि व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी, काल्पनिक आहे.

आम्ही खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Suresh Jain Rituraj यांचे सोशल सकॅनिंग केले. आम्हाला त्यात कळले कि यूजर मेरठ चे रहिवासी आहेत आणि त्यांना ७८६ लोकं फोल्लो करतात. ते एका विशिष्ठ पार्टी बद्दलचे पोस्ट जास्ती शेअर करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात सचिन तेंडुलकर यांच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट काल्पनिक असल्याचे समजले.

  • Claim Review : मी ज्या दिवशी चिकन शॉप मध्ये माझ्या समोर मुर्गा कापताना बघितले त्यादिवशी मला विचित्र वाटले. मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या लहान मुलांचा चेहरा येत होता. ते जीव पण कोणाचे लेकरू असतील. माझ्या स्वादासाठी कोणाला भयंकर पीडा मधून जावे लागते. मी त्यादिवशी आजीवन शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला: सचिन रमेश तेंडुलकर.
  • Claimed By : Suresh Jain Rituraj
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later