Fact Check: BJP च्या नावावर व्हायरल होणारी रिचार्ज योजना बनावट, तज्ज्ञांचा सल्ला, अशा लिंकवर क्लिक करू नका
- By: Umam Noor
- Published: Dec 6, 2023 at 02:54 PM
- Updated: Dec 6, 2023 at 03:21 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). भारतीय जनता पक्षाच्या नावावर विनामुल्य रिचार्ज योजनेचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि वापरकर्ते दावा करत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सर्व भारतीय वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी 239 रुपयांचा रिचार्ज विनामुल्य दिला जात आहे, जेणेकरून 2024 च्या निवडणुकीत लोक भाजपला मतदान करतील आणि भाजप सरकार पुन्हा स्थापन होईल.
विश्वास न्यूजला तपासात आढळले की, व्हायरल पोस्ट आणि त्यात केलेला दावा दोन्ही बनावट बाबी आहेत. भाजप सरकारद्वारे अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही, जी सर्व भारतीय वापरकर्त्यांना विनामूल्य रिचार्ज पुरविण्याचे आश्वासन देते.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल पोस्ट शेअर करताना, फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी* सर्व भारतीय वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी *₹239* चा *रिचार्ज विनामुल्य* देत आहेत, जेणेकरून *2024 च्या निवडणुकी*त अधिकाधिक लोक भाजपाला मतदान करू शकतील आणि पुन्हा *BJP सरकार* सत्तेवर येईन. मी सुद्धा याद्वारे माझा 28 दिवसांचा विनामुल्य Recharge केला आहे, तुम्ही देखील खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून, 28 दिवसांचा Free Recharge मिळवू शकता (अंतिम तारीख – 16 नोव्हेंबर 2023)”.
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
आम्ही सर्वप्रथम व्हायरल पोस्टमध्ये किती सत्य आहे, हे शोधण्यासाठी कीवर्डसह बातम्या शोधल्या, परंतु आम्हाला शोधात अशी कोणतीही बातमी सापडली नाही, ज्यात असे नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे अशी विनामूल्य रिचार्ज योजना चालवित आहेत.
तपासास पुढे नेऊन आम्ही भाजपच्या सोशल मीडिया हँडलवर शोध घेतला. दाव्याची पुष्टी करणारी कोणतीही पोस्ट आम्हाला सापडली नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाइटही या दाव्याची चौकशी केली. आम्हाला तिथेही अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.
आमचा तपासास अधिक पुढे नेऊन आम्ही व्हायरल पोस्टमधील freerechargechunavyojna ही लिंक तपासली. या लिंकवर क्लिक केल्यावर एका ब्लॉगस्पॉटची लिंक ओपन होते. ज्यामध्ये तुम्हाला विनामुल्य रिचार्ज मिळविण्यासाठी फोन नंबर भरण्यास सांगितले जाईल आणि नंतर रिचार्ज ऑफर मिळविण्यासाठी त्यास व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा 10 लोकांसह सामायिक करण्यास सांगितले जाईल. आम्ही आमच्या वाचकांना सांगू इच्छितो की, अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे.
यापूर्वीही ही बनावट लिंक सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि त्यावेळी आम्ही भारतीय सायबर आर्मीचे अध्यक्ष आणि भारतीय पोलिसांचे सायबर क्राइम सल्लागार किशालय चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी ही लिंक आणि दावा बनावट असल्याचे सांगितले आणि सल्ला दिला होता की, वापरकर्त्याने अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. यामुळे वापरकर्त्याचा डेटा हॅक होऊ शकतो आणि त्यांची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते.
अशा अनेक पोस्ट्स यापूर्वीही व्हायरल झाल्या आहेत, ज्यांचा वेळोवेळी विश्वास न्यूजने तपास केला आहे. फसवणूक करण्यासाठी आणि फोन नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती यासारखी आपली वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी अशा लिंक तयार केल्या जातात. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, अशी सूचना देऊ इच्छितो.
आता वेळ आली होती ज्या वापरकर्त्याने ही पोस्ट शेअर केली आहे त्याचे सोशल स्कॅनिंग करण्याची. वापरकर्त्याच्या बायोनुसार, तो इंदूरमध्ये राहतो आणि फेसबुकवर या वापरकर्त्याचे 108 मित्र आहेत.
निष्कर्षः विश्वास न्यूजला असे आढळले की, व्हायरल पोस्ट आणि त्यात केलेला दावा, दोन्ही बनावट बाबी आहेत. भाजप सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही, जी सर्व भारतीय वापरकर्त्यांना विनामूल्य रिचार्ज देण्याचे आश्वासन देते.
- Claim Review : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सर्व भारतीय वापरकर्त्यांना 28 दिवसांचा 239 रुपयांचा रिचार्ज विनामुल्य दिला आहे, जेणेकरुन 2024 च्या निवडणुकीत लोक भाजपला मत देतील आणि भाजप सरकार पुन्हा स्थापन होईल.
- Claimed By : FB वापरकर्ता: BanTy Das
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.