Fact Check : अखिलेश यादव च्या पराभवासोबत पोस्ट चा संबंध नाही, व्हायरल पोस्ट फेक आहे

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मधील चित्राचा तपास केला त्यात कळले कि चिंत्रांसोबत केलेला दावा खोटा आहे. वेग वेगळ्या राज्यात झालेल्या आत्महत्येच्या घटनांना जोडून हि पोस्ट बनवण्यात आली आहे. व्हायरल चित्राचा उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये अखिलेश यादवच्या पराभवासोबत काहीच संबंध नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या शेअर केल्या जात आहे. आता निकाल देखील जाहीर झाले आहे आणि तरी सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे. व्हायरल चित्र एक कोलाज आहे ज्यात तीन वेगळे चित्र आहे. तिन्ही मध्ये लोकांना आत्महत्या करताना बघितले जाऊ शकते. आता असा दावा करण्यात येत आहे कि अखिलेश यादव ची सरकार ना बनल्या कारणाने तीन बेरोजगार युवकांनी आत्महत्या केली. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि ह्या चित्रांचा अखिलेश यादव च्या आत्महत्येसोबत काही संबंध नाही. विश्वास न्यूज सोबत बोलताना प्रयागराज च्या पोलिसांनी देखील व्हायरल दाव्याचे खंडन केले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर “संदीप यादव” ने व्हायरल पोस्ट ला शेअर करत लिहले, “अखिलेश भइया के न आने से तीन भाइयों ने प्रयागराज में लगाई फासी।” चित्रात देखील एक कॅप्शन आहे, ज्यात म्हंटले आहे, “गाव शहर रो रहा है, सत्य की एक बार पराजय हुआ।”

ह्याच दाव्यासह अजून एक फेसबुक यूजर, “मानसी सिंह” ने देखील अशे एक चित्र सोशल मीडिया वर शेअर केले. ह्या शिवाय बऱ्याच यूजर्स नि देखील असाच काही दावा केला आहे आणि हे चित्र शेअर केले आहे.

ह्या पोस्ट सोबत शेअर करण्यात आलेले चित्र हिंसक असल्या कारणाने आम्ही ते इथे एम्बेड केले नाही. आणि ना आम्ही ना इथे स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
ह्या पोस्ट साठी फॅक्ट चेक रिक्वेस्ट आम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबर वर आर्यन सिंह ने देखील पाठवली आहे.

तपास:
वीश्वास न्यूज ने एक एक करत सगळ्या चित्रांचा तपास सुरु केला.

पहिले चित्र:
विश्‍वास न्यूजने तपास सुरू करत, गुगल रिव्हर्स इमेज टूल वापरून पहिली इमेज शोधली. पहिल्याच सर्च, आम्हाला हे चित्र 24 नोव्हेंबर 2020 रोजी संजीवनी टुडे नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या लेखात सापडले. बातमीत दिलेल्या माहितीनुसार, ‘ही घटना रामगढ येथील असून, पैशांअभावी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरूणाचे नाव रणधीर कुमार, तारा महतो यांचा मुलगा असून, कसमार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कर्मा येथील तो व्यक्ती रहिवासी आहे.’

अजून थोडे सर्च केल्यावर आम्हाला मिळती जुळती अजून एक रिपोर्ट मिळाली, त्यात आम्हाला कळले कि मृतक 25 वर्षाचा असून एका मोबाईल कंपनी मध्ये काम करत होता.

तिसरे चित्र:

गूगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला हे चित्र एका रिपोर्ट मध्ये मिळाले. त्यात कळले कि नाजीर ने गळफास लावून आत्महत्या केली.

वेबसाईट वर मिळालेल्या माहिती मध्ये आम्हाला काही कॅवॉर्ड्स मिळाले, गूगल सर्च केल्यावर आम्हाला दैनिक भास्कर ची तीन वर्ष जुनी रिपोर्ट त्यात मिळाली. रिपोर्ट मध्ये कळले कि युवकाचे नाव राजेश राजपूत होते, तो ३५ वर्षाचा होता आणि ते न्यायालयात नायब नजीर म्हणून तैनात होते. तो मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गोंड खैरी बागरोड चौकातील रहिवासी होता.

विश्वास न्यूज ने अधिक माहिती साठी जनपद प्रयागराज मीडिया सेल सोबत संपर्क केला, व्हायरल पोस्ट संबंधी त्यांनी भाष्य केले. पोस्ट चा खंडन करत त्यांनी आम्हाला सांगितले कि अशी कुठली घटना प्रयागराज मध्ये झाली नाही. त्यांनी आमच्यासोबत पोलीस च्या ट्विट चे लिंक देखील शेअर केले ज्यात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले गेले आहे. हे ट्विट खाली बघा.

आम्ही व्हायरल पोस्ट संबंधी अधिक माहिती साठी समाजवादी पार्टी च्या राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष कुमार वर्मा ह्यांच्यासोबत संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि अशी कोणती घटना समोर आली नाही.

आम्ही तपासादरम्यान दुसऱ्या चित्राची पुष्टी करू शकलो नाही पण हे स्पष्ट होते कि ह्याचा अखिलेश यादव च्या पराभवासोबत काही संबंध नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर “संदीप यादव” चे सोशल मीडिया प्रोफाइल तपासले, त्यात कळले कि त्यांना 1,453 लोकं फॉलो करतात. ते एका राजनेतिक पार्टी सोबत जुडलेले आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मधील चित्राचा तपास केला त्यात कळले कि चिंत्रांसोबत केलेला दावा खोटा आहे. वेग वेगळ्या राज्यात झालेल्या आत्महत्येच्या घटनांना जोडून हि पोस्ट बनवण्यात आली आहे. व्हायरल चित्राचा उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये अखिलेश यादवच्या पराभवासोबत काहीच संबंध नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट