Fact Check: मध्य प्रदेश च्या गृह मंत्रायच्या नावावर व्हायरल होत आहे खोटी पोस्ट
विश्वास न्यूज च्या तपासात मध्य प्रदेश चे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बंडखोरी केल्याची पोस्ट खोटी ठरली.
- By: Ashish Maharishi
- Published: Jun 9, 2021 at 02:47 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोसिअल मीडिया वर मध्य प्रदेश चे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या बद्दल एक खोटी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यात एबीपी न्यूज चैनल च्या नावाचा वापर करून दावा केला जात आहे कि मध्य प्रदेश चे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा हे ३० आमदारांना घेऊन बंडखोरी करण्यास निघाले. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज INDIA मनुवाद के खिलाफ ने ७ जून रोजी एका न्यूज चॅनेल ची ब्रेकिंग न्यूज ची प्लेट अपलोड करून दावा केला: ‘बीजेपी में भारी #विद्रोह…… यूपी के बाद मध्य प्रदेश में भी #बीजेपी में भूचाल। #मध्यप्रदेश के गृहमंत्री नरोत्तम मिश्रा 30 विधायकों के साथ बागी हुए, शिवराज के विरुद्ध खोला मोर्चा।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात मध्य प्रदेश चे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सोशल मीडिया अकाउंट चा तपास करण्यापासून केली. आम्हाला डॉक्टर मिश्रा यांचा ट्विटर हॅन्डल वर एक व्हिडिओ मिळाला. याला ७ जून रोजी अपलोड केले होते. यात त्यांना बोलताना बघितले जाऊ शकते कि शिवराज सिंह मुख्यमंत्री होते, आहे आणि राहतील. डॉक्टर मिश्रा ने सोशल मीडिया वर सरकार आणि संगथानाबद्दल व्हायरल होत असलेले दावे खोटे असल्याचे सांगितले.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने गूगल सर्च ची मदत घेतली. आम्हाला एकहि अशी बातमी नाही मिळाली, ज्यात मध्य प्रदेश च्या गृह मंत्र्यांनी बंडखोरी केल्याचे सांगितले असेल.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने नईदुनिया, भोपाल च्या ब्यूरो चीफ धनंजय प्रताप सिंह यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि नरोत्तम मिश्रा यांच्या नावावर व्हायरल होत असलेले न्यूज चॅनेल चे स्क्रीनशॉट फेक आहे. एबीपी चे स्क्रीनशॉट असल्या कारणाने आम्ही त्यांच्या सिनिअर एडिटर सोबत देखील संपर्क केला, त्यांनी देखील आम्हाला ती प्लेट फेक असल्याचे सांगितले.
आता आम्ही खोटी व्हायरल करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला सोशल स्कॅनिंग मध्ये कळले कि फेसबुक पेज INDIA मनुवाद के खिलाफ ला १५ हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. या पेज ला ४ डिसेंबर २०१९ रोजी बनवले गेले होते.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मध्य प्रदेश चे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बंडखोरी केल्याची पोस्ट खोटी ठरली.
- Claim Review : मध्य प्रदेश चे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बंडखोरी केली
- Claimed By : INDIA मनुवाद के खिलाफ
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.