विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि सेना भरती बद्दल व्हायरल होत असलेली बातमी निराधार आहे. भरती च्या नियमांमध्ये कोणतेच बदल करण्यात आले नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर एका न्यूज चॅनेल चा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. ह्यात लिहले आहे कि सेना भर्ती 2022 नवीन नियमात दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे. व्हायरल पोस्ट खरी समजून बाकी यूजर्स देखील ह्यलाल व्हायरल करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे लक्षात आले. बातमी लिहली जात पर्यंत तरी सेनेत भरती होण्यासाठी असा कुठला नियम बदलण्यात आला नव्हता.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज यूपी 43 गोंडा ने 29 ऑक्टोबर रोजी एक स्क्रीनशॉट अपलोड केला. ह्यात दावा करण्यात आला होता कि, सेने मध्ये भरती साठी काही बदलावं करण्यात आले आहेत ज्यात वयात दोन वर्षाची सूट देण्यात आली आहे.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. आम्हाला कुठेच व्हायरल पोस्ट मध्ये दावा करत असलेली बातमी मिळाली नाही ज्यात सेनेत भरती साठी वयाची सूट सांगितली असेल.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही झी न्यूज च्या युट्युब चॅनेल वर असलेल्या व्हिडिओ चा तपास केला. आम्हाला व्हायरल बातमी मिळाली नाही, पण तो स्क्रीनशॉट झी न्यूज चा सांगूनच व्हायरल करण्यात येत होता. आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट आणि झी न्यूज च्या ब्रेकिंग प्लेट चे तुलनात्मक विश्लेषण केले. आम्हाला दोघांमध्ये बराच अंतर असल्याचे लक्षात आले. फॉन्ट आणि बऱ्याच बाकीच्या गोष्टी ह्यात वेगळ्या आढळल्या.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने भारतीय सेना प्रवक्ते ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि मागील काही दिवसांपासून सेने बद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. हि बातमी पूर्णपणे खोटी आहे.
शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. फेसबुक पेज यूपी 43 गोंडा च्या सोशल स्कॅनिंग मध्ये कळले कि त्यांचे 47 हजार फॉलोअर आहेत. ह्या पेज ला 27 जानेवारी 2020 रोजी बनवण्यात आले होते.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि सेना भरती बद्दल व्हायरल होत असलेली बातमी निराधार आहे. भरती च्या नियमांमध्ये कोणतेच बदल करण्यात आले नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923