X
X

Fact Check: पीएम नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचे टाइम मॅगझीन चे कव्हर मॉर्फ्ड आहे

आमच्या तपासात हे सिद्ध झाले कि टाइम मॅगझीन चे व्हायरल होत असलेले छायाचित्र मॉर्फ आहे. टाइम मॅगझीन ने पीएम मोदी यांचे छायाचित्र आपल्या कव्हर वर पब्लिश केले नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर टाइम मॅगझीन चे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्राच्या कव्हर वर पंतप्रधान नरेंद्र मोदीदिसतात . त्यात इंग्रजी मध्ये लिहले आहे: Superspreader, Will humanity now have to pay for one man’s hunger for power?
विश्वास न्यूज च्या तपासात हि व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.
व्हायरल होत असलेले टाइम मॅगझीन चे कव्हर मॉर्फ केलेले आहे,
ह्या व्हायरल कव्हर ला खोट्या टाइम मॅगझीन जनरेटर ची वेबसाईट वापरून बनवले गेले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Shoukat Ali Khan ने हे छायाचित्र शेअर करून इंग्रजी मध्ये कॅप्शन लिहले, Superspreader, Will humanity now have to pay for one man’s hunger for power?
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेले कव्हर सगळ्यात आधी इंटरनेट वर शोधले. जर टाइम मॅगझीन नि हे कव्हर पब्लिश केले असते जे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आहे, तर या बद्दल भारतीय मीडिया मध्ये कुठे वाच्यता झालीच असती. पण आम्हाला व्हायरल कव्हर बद्दल कुठेच माहिती मिळाली नाही.
या नंतर आम्ही टाइम मॅगझीन ची वेबसाईट चेक केली, पण आम्हाला २०२१ च्या एका पण अंकावर आम्हाला पीएम मोदी यांचे छायाचित्र दिसले नाही.

आम्ही व्हायरल पोस्टर झूम करून बघितले त त्याच्या टॉप वर जुलाई 17, 2006 लिहले होते. जेव्हाकी दुसऱ्या ठिकाणी, www.time.com AOL Keyword: TIME लिहलेले दिसले. आम्ही टाइम मॅगझीन चे आर्काइव्हस बघितले, त्यात आम्हाला १७ जुलै, २००६ चा अंक सापडला. पण त्यावर पीएम मोदी यांचे छायाचित्र नव्हते, पण एका मोठ्या हेट चे छायाचित्र होते आणि कव्हर स्टोरी चे टायटल होते, ‘द एंड ऑफ काउब्वॉय डिप्लोमैसी’. आता हे स्पष्ट होते कि व्हायरल छायाचित्र एका वेबसाईट च्या मदतीने बनवण्यात आले होते.

आम्ही इंटरनेट वर टाइम चा कव्हर क्रिएट करण्याबाबत सर्च केले त्यात आम्हाला KAPWING नावाची वेबसाईट मिळाली. याच वेबसाईट च्या मदतीने व्हायरल कव्हर बनवले गेले होते.
अधिक माहिती साठी आम्ही टाइम मॅगझीन च्या वाईस प्रेसिडेंट (कॅम्म्युनिकेशन) क्रिस्टिन मैटजन यांना इमेल द्वारे संपर्क केला, त्यांना आम्ही व्हायरल छायाचित्र पाठवले, इमेल च्या रिप्लाय मध्ये त्यांनी म्हंटले कि व्हायरल कव्हर ऑथेंटिक नाही, अजून असे कुठलेच कव्हर रिलीस केले नाही.

आम्ही व्हायरल कव्हर मधले मोदी यांचे छायाचित्र क्रॉप करून गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधले. आम्हाला व्हायरल छायाचित्र एएनआई च्या एका ट्विट मध्ये मिळाले. २५ फेब्रुवारी २०२१ च्या या ट्विट प्रमाणे, पीएम पुडुचेरी च्या रॅली मध्ये असतानाचे हे छायाचित्र आहे. हे छायाचित्र पीटीआय च्या आर्काइव्ह मध्ये देखील आहे. हे छायाचित्र पीटीआय चे फोटोग्राफर सेंथिल कुमार यांनी क्लीक केले आहे.

आता आम्ही फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणारे यूजर Shoukat Ali Khan यांची प्रोफाइल स्कॅन केली. प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि त्यांनी अकाउंट जून २०११ मध्ये बनवले आणि फेसबुक वर बरेच ऍक्टिव्ह आहे.

निष्कर्ष: आमच्या तपासात हे सिद्ध झाले कि टाइम मॅगझीन चे व्हायरल होत असलेले छायाचित्र मॉर्फ आहे. टाइम मॅगझीन ने पीएम मोदी यांचे छायाचित्र आपल्या कव्हर वर पब्लिश केले नाही.

  • Claim Review : नरेंद्र मोदी यांचे टाइम मॅगझीन वर छायाचित्र
  • Claimed By : Shoukat Ali Khan
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later