X
X

Fact-Check: कानपूर चकमकीतील आरोपीच्या नावे भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचा फोटो व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्येचा आरोपी विकास दुबे यांच्या नावावर, युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले आहे. व्हायरल दावा बनावटी आहे. व्हायरल फोटोत भाजप नेते उमा भारतीसोबत दिसणारी व्यक्ती म्हणजे विकास दुबे, गँगस्टर विकास दुबे नव्हे तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नेते आहेत.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज) उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात ८ पोलिसांच्या हत्येनंतर या घटनेतील मुख्य आरोपी विकास दुबे याला काल अटक आणि नंतर याचे आज एन्काऊंटर करण्यात आले. करण्यात आली. आरोपी विकास दुबे यांच्या नावावर अनेक बनावट पोस्ट व्हायरल होत आहेत.

भाजप नेत्या उमा भारती यांच्यासोबत पक्षाचा पंचा गळ्यात असलेल्या एका माणसाचा फोटो व्हायरल होत आहे, असा दावा केला जात आहे कि छायाचित्रातील व्यक्ती हा विकास दुबे असून तोच ८ पोलिसांच्या हत्येसाठी जबाबदार आहे.
हा दावा विश्वास न्यूज च्या तपासात खोटा ठरला. आम्हाला हे समजले की व्हायरल चित्रात उमा भारतीसोबत उभे असलेल्या व्यक्तीचे नाव ‘पंडित विकास दुबे’ असे आहे, पण कानपूर घटनेचा आरोपी ‘विकास दुबे’ हे नाही.
छयाचित्रात दिसणारी व्यक्ती भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता आहे. विकास दुबे यांच्या नावावर काही लोक मुद्दाम हे छायाचित्र व्हायरल करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?


फेसबुक यूजर, Javed Saifi यांनी ३ जुलै रोजी एक छायाचित्र अपलोड केले, आणि त्यात लिहले, “हर गुंडे अपराधी का संबंध भाजपा से है, कानपुर पुलिस कर्मियों की मौत का मुख्य अभियुक्त विकास दुबे भाजपा नेता के साथ।”
अर्थात: प्रत्येक गुंड गुन्हेगार भाजपसोबत संबंध ठेवणारा आहे, कानपूर पोलिस कर्मचाऱ्यांचा मुख्य आरोपी विकास दुबे भाजप नेत्या बरोबर.
पोस्ट आणि फेसबुकची अकाईव्ह लिंक इथे पहा.

तपास:

विश्वास न्यूजने व्हायरल चित्राचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्यानंतर गुगलने रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला हे चित्र Pandit Vikas Dubey Bjym नावाच्या फेसबुक अकाउंटवर सापडले. हे चित्र 3 मे 2020 रोजी अपलोड केले गेले आहे.
या छायाचित्रासोबत लिहला गेलेला मजकूर असा, “भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं राजनीतिक सूझ-बूझ को आध्यात्मिक दृष्टिकोण प्रदान कर जनसेवा करने वाली दीदी सुश्री उमा भारती जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। ईश्वर से प्रार्थना है कि आप सदैव प्रसन्न, स्वस्थ रहें एवं दीर्घायु हों।@umasribharti पं विकास दुबे। क्षेत्रीय अध्यक्ष कानपुर बुन्देलखण्ड क्षेत्र भाजयुमो। पूर्व अध्यक्ष कानपुर विश्वविद्यालय”
अर्थात: दीदी सुश्री उमा भारती जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राजकीय शहाणपणा यांना आध्यात्मिक दृष्टी देऊन लोकांची सेवा केली. देव तुम्हाला नेहमी आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. @umasribharti पं. विकास दुबे. प्रादेशिक अध्यक्ष कानपूर बुंदेलखंड प्रदेश, भाजयुमो. माजी अध्यक्ष कानपूर विद्यापीठ

जेव्हा आम्ही हे फेसबुक अकाऊंट तपासले तेव्हा कळले की विकास दुबे नावाचा हा माणूस भाजपा युवा मोर्चाच्या कानपूर-बुंदेलखंडचा प्रादेशिक अध्यक्ष आहे.
या अकाउंटवर आम्हाला विकास दुबे यांचा व्हिडिओ सापडला. या व्हिडिओमध्ये त्यांनी असे म्हंटले आहे की काही लोकांनी त्याचे नाव गुन्हेगार विकास दुबेशी जोडले आहे आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ते सर्वांविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. आपण हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

विश्वास न्यूजने भाजप नेते विकास दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विश्वास न्यूजला सांगितले, “माझा फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होत आहे. जे लोक माझे नाव खराब करत आहेत त्यांच्याविरूद्ध मी कठोर कारवाई करीन. “

यानंतर आम्ही 8 पोलिसांना मारल्याचा आरोपी विकास दुबे यांचे छायाचित्र शोधण्यास सुरवात केली. आम्हाला त्याचे चित्र जागरण वेबसाईटवरील एका बातमीत आढळले.
यानंतर विश्वास न्यूजने विकास दुबे आणि भाजप नेते विकास दुबे यांच्या छायाचित्राची तुलना केली. आम्हाला समजले की ते दोघे वेगवेगळे लोक आहेत.

छायाचित्र डाव्याबाजूचा माणूस विकास दुबे आहे, ज्यांना पोलिसांनी आज अटक केली, तर उजव्या बाजूला विकास दुबे हे भाजपा नेते आहेत.

शेवटी आम्ही खोटी पोस्ट शेअर करणारे यूजर Javed Saifi चे अकाउंट तपासले. त्यात आम्हाला कळले कि ते उत्तर प्रदेश च्या पिलखुआ मध्ये राहतात आणि त्याचे फेसबुक वर 4,955 फ्रेंड्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्येचा आरोपी विकास दुबे यांच्या नावावर, युवा मोर्चाचे नेते विकास दुबे यांचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले आहे. व्हायरल दावा बनावटी आहे. व्हायरल फोटोत भाजप नेते उमा भारतीसोबत दिसणारी व्यक्ती म्हणजे विकास दुबे, गँगस्टर विकास दुबे नव्हे तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नेते आहेत.

  • Claim Review : हर गुंडे अपराधी का संबंध भाजपा से है, कानपुर पुलिस कर्मियों की मौत का मुख्य अभियुक्त विकास दुबे भाजपा नेता के साथ
  • Claimed By : Javed Saifi
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later