Fact Check: शरद पवार आणि अनिल देशमुख यांचे मॉर्फ केलेले छायाचित्र व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात शरद पवार आणि अनिल देशमुख यांचे व्हायरल होत असलेले छायाचित्र मॉर्फ केले असल्याचे लक्षात आले.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 30, 2021 at 09:08 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): एनसीपी प्रमुख शरद पवार आणि महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांचे एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या छायाचित्रात दोन्ही नेते सोबत बसून दोन हजार च्या नोटांचे बंडल मोजताना दिसतात. तसेच बाजूच्या छायाचित्रात सोनिया गांधी देखील दिसत आहेत.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. खरे छायाचित्र हे इंदोर मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी छापा मारण्यात आला होता तेव्हाचे आहे. खऱ्या छायाचित्राला मॉर्फ करून त्यावर शरद पवार आणि अनिल देशमुख यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. तसेच, याच मॉर्फ छायाचित्रात सोनिया गांधी यांचे देखील छायाचित्र वापरण्यात आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हॅन्डल राजेश “हिंदुस्थानी याने २५ मार्च रोजी मॉर्फ छायाचित्र अपलोड करून दावा केला: Vasuli hafta gangs मुम्बई वसूली गैंग का असली सरगना… टेड़ा मुँह है… ये दोनों एक दिन पूरा महाराष्ट्र लूट कर खा जाएंगे।
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. हेच छायाचित्र विविध सोशल मीडिया वेबसाईट वर देखील व्हायरल होत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी हे छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेऊन शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला खरे छायाचित्र बऱ्याच ठिकाणी आढळले.
यानंतर आम्ही टाइमलाईन टूल ची मदत घेतली. आम्हाला सगळ्यात जुने छायाचित्र हिन्दुस्तान टाइम्स च्या वेबसाईट वर मिळाले. १८ डिसेंबर २०१६ रोजी पब्लिश झालेल्या एका बातमीत सांगितल्या प्रमाणे, इंदोर च्या क्राइम ब्रांच ने एका घरी छापा मारून ११. लाख रुपये रोख जप्त केली. नवीन २००० रुपयांच्या रूपात हि रोख होती. पोलिसांनी चार लोकांना कस्टडी मध्ये घेतले. पूर्ण बातमी इथे वाचा.
यानंतर विश्वास न्यूज ने एनसीपी प्रवक्ता, महेश तपासे यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत व्हायरल छायाचित्र शेअर केले. त्यांनी सांगितले कि हे खोटे छायाचित्र आयटी सेल वाले व्हायरल करत आहे, ज्यांचे लक्ष्य महाराष्ट्र सरकार ला त्रास देणे आहे.
आम्ही त्या यूजर बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला ज्यांनी खोटे छायाचित्र व्हायरल केले. आम्हाला कळले कि ट्विटर हॅन्डल राजेश “हिंदुस्थानी” यांचा अकाउंट जुलै २०२० मध्ये बनवला गेला. यांना ११०० पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात शरद पवार आणि अनिल देशमुख यांचे व्हायरल होत असलेले छायाचित्र मॉर्फ केले असल्याचे लक्षात आले.
- Claim Review : शरद पवार आणि अनिल देशमुख यांचे छायाचित्र
- Claimed By : राजेश हिंदुस्थानी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.