विश्वास न्यूज ला आपल्या तापसात राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या छायाचित्रासोबत केलेला दावा खोटा असल्याचे कळले. हे छायाचित्र आताचे नाही. व्हायरल छायाचित्र २०१९ साली काढण्यात आले होते.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उत्तर प्रदेश च्या हाथरस मध्ये घडलेल्या भयावह घटनेनंतर, काँग्रेस नेता राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांचे एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या छायाचित्रासोबत दावा करण्यात येत आहे कि हे छायाचित्र जेव्हा ते हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते तेव्हाचे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात असे आढळले कि हे छायाचित्र, २०१९ मध्ये कानपूर एअरपोर्ट वर घेण्यात आले होते.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात राहुल आणि प्रियांका गांधी एक दुसऱ्या च्या गळ्यात गळे घालून हसत असल्याचे दिसतात. पोस्ट सोबत दावा केला जात आहे, “हाथरस जाते विपक्ष के नेता, अत्यधिक दुःख चेहरे पर साफ़ दिखाई दे रहा हैं Neutral face #ड्रामेबाज_भाईबहन“
अर्थात: हाथरस ला जाताना विपक्ष नेता, त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्ट दिसत आहे.
या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
या फोटो चा तपास करण्यास आम्ही गूगल रिव्हर्स इमेज पासून सुरुवात केली. सर्च च्या वेळी आम्हाला व्हायरल झालेले छायाचित्र २७ एप्रिल, २०१९ रोजी NDTV वर पब्लिश झालेली एक बातमी मिळाली. बातमीत दिल्या प्रमाणे, हे छायाचित्र कानपूर च्या एअरपोर्ट वर घेण्यात आले होते जेव्हा राहुल गांधी आपली बहीण प्रियांका यांच्यासोबत तिथे पोहोचले होते.
आम्हाला टाइम्स ऑफ़ इंडिया च्या यूट्यूब चॅनेल वर २७ एप्रिल, २०२० रोजी अपलोड केलेल्या एका व्हिडिओ मध्ये पण आम्हाला व्हायरल झालेल्या छायाचित्रासोबत मिळते जुळते दृश्य आढळले.
या विषयाबाबतीत आम्ही काँग्रेस चे मीडिया इन्चार्ज प्रणव झा यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले, “हे छायाचित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचा आहे. हे दोघं एकाच हेलिकॉप्टर ने जाणार होते आणि त्यावेळी राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांची थट्टा केली कि त्यांना एक नवीन हेलिकॉप्टर घ्यायला येणार आहे.”
काँग्रेस प्रवक्ता संजीव सिंह यांनी देखील हे छायाचित्र जुने असल्याचे सांगितले.
या पोस्ट ला लोकं सोशल मीडिया वर चुकीच्या दाव्याने शेअर करत आहे. यातल्या एक @AnimaSonkar हा ट्विटर प्रोफाइल आहे. या ट्विटर हॅन्डल चे 19.7K इतके फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तापसात राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या छायाचित्रासोबत केलेला दावा खोटा असल्याचे कळले. हे छायाचित्र आताचे नाही. व्हायरल छायाचित्र २०१९ साली काढण्यात आले होते.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923