Fact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे
नमो अगेन अश्या स्लोगन चे कुर्ता घातलेले प्रियांका चतुर्वेदी यांचे छायाचित्र खोटे आणि एडिट केलेले आहे.
- By: Team Vishvas
- Published: Jul 26, 2021 at 04:54 PM
- Updated: Oct 6, 2023 at 01:04 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर शिवसेना आमदार प्रियंका चतुर्वेदी यांचे एक छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे, या छायाचित्रात त्यांनी ‘नमो अगेन’ अश्या स्लोगन चा कुर्ता घातलेला छायाचित्रात दिसतो. दावा करण्यात येत आहे कि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थानात हे कार्य केले.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. आमच्या तपासात कळले कि त्यांचा फोटो ला एडिट करून एडिटिंग टूल्स वापरून एका सूर्य महिलेच्या छायाचित्रावर त्यांचा चेहरा वापरण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
इंस्टाग्राम अकाउंट ‘aapkaapna76’ ने हे छायाचित्र पोस्ट केले आणि त्यात दिसतं कि काँग्रेस सोडून शिवसेनेत पदार्पण केलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना नमो अगेन अश्या मजकुराचा कुर्ता घातलेले बघता येते. या पोस्ट चे आर्काइव्ह लिंक इथे बघा.
सोशल मीडिया यूजर्स या घटनेला खरे समजून हे छायाचित्र शेअर करत आहेत. ट्विटर वर सावरकर मोदी अकाउंट वर देखील हे चित्र पोस्ट करण्यात आले. लिंक इथे बघा.
तपास:
शिव सेनेत दाखल व्हायच्या आधी प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेस मध्ये होत्या. अश्यात त्यांनी खरंच मोदी यांचे समर्थन केले असेल का, असा प्रश्न पडतो. चित्राबद्दल खरे काय ते जाणून घेण्यास, विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेतली.
सर्च च्या वेळी आम्हाला फेसबुक वर हेमिशा ठक्कर नावाच्या महिलेचा प्रोफाइल मिळाला. त्यांच्या प्रोफाइल वरच्या चित्रात त्यांनी प्रियंका चतुर्वेदी त्यांच्यासारखाच कुर्ता घातलेला दिसतो.
फेसबुक वर हे छायाचित्र हेमिशा ठक्कर यांच्या प्रोफाइल वर 5 मार्च 2019 रोजी शेअर करण्यात आले होते ज्याला आता एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. आम्ही दोन्ही छायाचित्रांमधील साम्य निरखून पहिले. आम्हाला कळले कि चेहरा सोडला तर दोन्ही छायाचित्र सारखे आहे.
डाव्या बाजूला खरे चित्र, उजव्या बाजूला चतुर्वेदी यांचे व्हायरल चित्र.
प्रियंका यांचे जुने छायाचित्र वापरून फोटो एडिटिंग टूल ची मदत घेऊन व्हायरल छायाचित्रावर पेस्ट करण्यात आले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांचे खरे छायाचित्र तुम्ही खाली बघू शकता ज्यात त्यांनी लाल रंगाचे कपडे घातले आहेत.
या छायाचित्राबद्दल विश्वास न्यूज ने प्रियंका चतुर्वेदी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले त्यांचे छायाचित्र खोटे आहे. त्यांनी म्हंटले, “मी असा कुर्ता कधीच घातला नाही. मी बऱ्याच वेळा सोशल मीडिया वर देखील हि पोस्ट खोटे असल्याचे सांगितले आहे. तरीही माझे चित्र नेहमीच व्हायरल करण्यात येते. राजकीय लोकं याचा फायदा घेतात.”
व्हायरल चित्र शेअर करणाऱ्या इंस्टाग्राम अकाउंट aapkaapna76 चे 6029 फॉलोवर्स आहेत
सोशल मीडिया वर आधी देखील हे चित्र व्हायरल झाले होते आणि त्याचा तपास, विश्वास न्यूज ने आधी देखील केला होता.
निष्कर्ष: नमो अगेन अश्या स्लोगन चे कुर्ता घातलेले प्रियांका चतुर्वेदी यांचे छायाचित्र खोटे आणि एडिट केलेले आहे.
- Claim Review : प्रियंका चतुर्वेदी यांचे 'नमो अगेन' स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र
- Claimed By : aapkaapna76
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.