विश्वास न्यूज च्या तपासात साध्वी प्रज्ञा यांचे व्हायरल होत असलेले छायाचित्र २०१३ चे असल्याचे समजले. त्या सध्या भोपाळ मध्ये सुखरूप आहेत. मुंबई च्या कोकिलाबेन दवाखान्यात त्या असल्याचा दावा खोटा आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): मध्य प्रदेश ची राजधानी असलेल्या भोपाळ च्या आमदार प्रज्ञा साध्वी यांनी गोमूत्राबद्दल आपले मत मांडल्यानंतर त्यांच्या बदल यूजर्स विविध दावे सोशल मीडिया वर व्हायरल करत आहेत. आता देखील त्यांचे एक जुने छायाचित्र यूजर्स व्हायरल करत आहेत आणि दावा करत आहेत कि त्या मुंबई च्या कोकिलाबेन दवाखान्यात आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले.
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि बरेच वर्ष जुने छायाचित्र आता काही लोकं व्हायरल करत आहेत. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर धम्म प्रिया ने २५ मे रोजी एक छायाचित्र पोस्ट केले आणि लिहले: ‘कोकिलाबेन अस्पताल में एलोपैथिक ट्रीटमेंट देकर सांसद को मारने की कोशिश तो नहीं हो रही है..? काश ! इनके लिए कोई गौमूत्र उपलब्ध करा देता….’
हि व्हायरल फेसबुक पोस्ट इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र इंटरनेट वर शोधले. सर्च च्या वेळी आम्हाला हे छायाचित्र बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनेल वर कव्हर छायाचित्र म्हणून वापरल्याचे लक्षात आले.
सगळ्यात जुने छायाचित्र हे १० जानेवारी २०१३ रोजी द हिन्दू वेबसाइट च्या एका बातमीत वापरले गेले होते. फोटो मधल्या कॅप्शन मधून आम्हाला कळले कि व्हायरल छायाचित्र भोपाळ च्या जवाहरलाल नेहरू कैंसर दवाखान्याचे आहे, जिथे ९ जानेवारी २०१३ रोजी प्रज्ञा साध्वी यांना मेडिकल एक्सामिनेशन साठी नेले गेले होते.
आता आम्हाला हे जाणून घ्यायचे होते कि साधावी प्रज्ञा यांना खरच कोकिलाबेन दवाखान्यात नेण्यात आले होते का. सर्च च्या वेळी आम्हाला कळले कि मार्च २०२१ मध्ये त्यांना श्वास घेण्याच्या त्रासामुळे मुंबई येथील कोकिलाबेन दवाखान्यात नेण्यात आले होते. हि गोष्ट तीन वर्ष जुनी आहे, रिपब्लिक टीव्ही ची हि बातमी तुम्ही खाली बघू शकता.
भास्करडॉटकॉम च्या बातमी प्रमाणे, मार्च मध्ये त्यांना कोकिलाबेन दवाखान्यात नेले होते.
प्रज्ञा साध्वी यांच्या बद्दल करण्यात आलेल्या दाव्यांबद्दल आम्ही मध्य प्रदेश च्या नईदुनिया वृत्तपत्राच्या स्टेट ब्यूरो हेड धनंजय प्रताप सिंह यांना संपर्क केला. आम्ही त्यांच्यासोबत व्हायरल छायाचित्र आणि दावा शेअर केला. त्यांनी सांगितले कि साध्वी प्रज्ञा चे हे छायाचित्र बरेच वर्ष जुने आहे. हे छायाचित्र भोपाळ चे आहे. सध्या त्या भोपाळ मध्ये आहेत आणि स्वस्थ आहेत.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर धम्म प्रिया राजस्थान च्या जयपूरच्या रहिवासी आहेत आणि त्यांना तीन हजार लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात साध्वी प्रज्ञा यांचे व्हायरल होत असलेले छायाचित्र २०१३ चे असल्याचे समजले. त्या सध्या भोपाळ मध्ये सुखरूप आहेत. मुंबई च्या कोकिलाबेन दवाखान्यात त्या असल्याचा दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923