X
X

Fact Check: स्वतंत्र भारतातील पहिल्या इफ्तार पार्टीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल झालेले चित्र हे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या इफ्तार पार्टीचे नाही तर 1948 मध्ये सी. राजगोपालाचारी भारताचे गव्हर्नर जनरल झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरू मंत्रिमंडळासाठी आयोजित केलेल्या जेवणाचे आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक फोटो व्हायरल होत आहे. चित्रात जवाहरलाल नेहरू, भीमराव आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद आणि राजेंद्र प्रसाद यांसारखे महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिक एकाच टेबलावर जेवण करताना दिसतात. हा फोटो व्हायरल करत सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की, हा फोटो भारतातील पहिल्या इफ्तार पार्टीचा आहे. याचे सूत्रसंचालन मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केले. विश्वास न्यूजने व्हायरल दाव्याची चौकशी केली. तो बनावट असल्याचे आमच्या तपासात कळले. वास्तविक हे चित्र सी. राजगोपालाचारी भारताचे गव्हर्नर-जनरल झाल्यानंतर 1948 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंत्रिमंडळासाठी आयोजित केलेल्या भोजनाचे आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘फिरोज खान कॉर्पोरेटर एआईएमआइएम’ ने 15 एप्रिल रोजी एक व्हायरल चित्र पोस्ट केले आणि इंग्रजीत लिहले: “First Iftar party of independent india.”

चित्राच्या वर इंग्रजीत लिहले होते: “First Iftar party after independence in 1947 hosted by first education Minister Moulana Abul Kalam Azad to his colleagues including Jawahar Lal Nehru, B.R. Ambedkar and Dr. Rajender Prasad.”

मराठी अनुवाद: स्वतंत्र भारताची पहिली इफ्तार पार्टी….. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतरची पहिली इफ्तार पार्टी पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्यांचे सहकारी जवाहरलाल नेहरू, बी.आर. आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद.

आम्ही फॅक्ट चेक च्या उद्देशाने हि पोस्ट जशी च्या तशी लिहली आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. हि पोस्ट दुसरे यूजर्स देखील शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल पोस्टच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ओनलाईन टूलचे वापर केला. गुगल रिव्हर्स इमेज टूलमध्ये चित्र अपलोड करून आम्ही शोधले. त्यादरम्यान आम्हाला स्टॉक इमेज वेबसाइट अलमीवर व्हायरल चित्र सापडले. या चित्राच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मराठी: चक्रवर्ती राजगोपालचारी हे पहिले भारतीय जनरल गव्हर्नर बनण्याचा आनंदात वल्लभभाई पटेलांनी मंत्रीमंडळाला दिलेल्या सहभोजन निमंत्रणाला उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद व इतर मंत्री. जून १९४८” मूळ चित्र इथे बघा.

तपासादरम्यान, पीडीएफ स्वरूपात अपलोड केलेल्या याच मेजवानीचे आणखी एक छायाचित्र एका वेबसाइटवर आम्हाला सापडले. व्हायरल चित्र पीडीएफच्या नवव्या पानावर पाहिली जाऊ शकते. चित्रासोबत इंग्रजीत कॅप्शन लिहिले होते. असे लिहिले आहे की 1948 मध्ये सी राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नेहरू मंत्रिमंडळातील सदस्यही दिसले. रफी अहमद किडवई, बलदेव सिंग, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू, सी. राजगोपालाचारी, सरदार वल्लभभाई पटेल, राजकुमारी अमृत कौर, जॉन मथाई, जगजीवन राम, श्री. गाडगीळ, श्री. नियोगी, डॉ. आंबेडकर, श्यामा प्रसाद मुखर्जी, गोपालस्वामी आणि आय. जयरामदास दौलतराम बसलेले दिसतात.

हे छायाचित्र महिला छायाचित्रकार होमाई व्यारावाला यांनी काढले होते. ते येथे क्लिक करून पाहता येईल.

विश्‍वास न्यूजने तपासाअंती जवाहरलाल नेहरूंवर पुस्तक लिहिणाऱ्या पियुष बबेले ह्यांना संपर्क केला. त्याच्यासोबतचा व्हायरल फोटो शेअर केला. त्यांनी सांगितले की, हे चित्र इफ्तार पार्टीचे नाही तर पहिल्या कॅबिनेटच्या काळात दिल्या जाणाऱ्या जेवणाचे आहे.

विश्वास न्यूज ने तपासाच्या शेवटी खोटा दाव्यासह पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला। फेसबुक पेज ‘फिरोज खान कॉर्पोरेटर एआईएमआइएम’ ला सोळा हजार लोकं लाईक करतात. हा पेज 27 ऑगस्ट 2018 पासून फेसबुक वर सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल झालेले चित्र हे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या इफ्तार पार्टीचे नाही तर 1948 मध्ये सी. राजगोपालाचारी भारताचे गव्हर्नर जनरल झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरू मंत्रिमंडळासाठी आयोजित केलेल्या जेवणाचे आहे.

  • Claim Review : मौलाना अबुल कलाम आजाद ने दी स्वतंत्र भारत की पहली इफ्तार पार्टी
  • Claimed By : फिरोज खान कॉर्पोरेटर एआईएमआइएम
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later