Fact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे

मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा मृत्यू झाल्याचे दावा करणारी पोस्ट खोटी आहे. पेडणेकर स्वस्थ आहे आणि उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक फेक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांची अचानक मृत्यू झाली. असे सुद्धा म्हंटल्या जात आहे कि कोरोनाव्हायरस चे व्हॅक्सिन घेतल्यामुळे त्यांच्या सोबत असे आले.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. तबियत खराब होण्याच्या कारणाने त्यांना एका दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण आता त्या स्वस्थ आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, ‘Manish Chawdhry Tushqa’ ने व्हायरल पोस्ट (आर्काइव्ह लिंक) शेअर केले आणि लिहले: ”These Bmc crooks were planning to go door to door to jab the dumb masses with the toxic shite.. Looks like coNvidshield inflicted her with the myocarditis karmic retribution.”

सोशल मीडिया वर हि पोस्ट चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत होती. तसेच अन्य यूजर्स विविध सोशल मीडिया साईट्स वर देखील हि बातमी व्हायरल करत होते.

तपास:
मुंबई च्या महापौरची जर मृत्यू झाली असती तर हि नक्कीच एक मोठी घटना आहे आणि याच्या बातम्या नक्की माध्यमांमध्ये आल्या असत्या. पण आम्हाला त्यांच्या मृत्यू ची एकही बातमी कुठेच दिसली नाही. मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याचे नक्कीच माध्यमांनी कव्हर केले होते.

व्हायरल पोस्ट मध्ये एका वेबसाईट च्या बातमी चे छायाचित्र दिसते, या बातमीचे शीर्षक होते: मुंबई की मेयर किशोरी पेडणेकर का 58 साल की उम्र में निधन।
किशोरी पेडणेकर यांचे वेरिफाइड सोशल मीडिया अकाउंट आहे. त्यावर आम्हाला एक ट्विट मिळाला, १८ जुलै रोजी त्यांनी इंडिया टुडे च्या बातमीचे खंडन करून म्हंटले कि, कि त्यांची मृत्यू झाल्याचा दावा खोटा आहे.

त्या बातमीचा स्क्रीनशॉट देखील त्यांनी शेअर केला होता. पेडणेकर यांनी लिहले: मी जिवंत आहे आणि ग्लोबल हॉस्पिटल मध्ये माझा उपचार सुरु आहे. आणि मी काही वेळेपूर्वीच खिचडी खाल्ली आहे”
याच स्क्रीनशॉट ला लोकं त्यांच्या मृत्यूचा दावा करून व्हायरल करत आहे.

न्यूज सर्च मध्ये आम्हाला अशी बातमी मिळाली ज्यात सांगितले होते कि पेडणेकर यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. टीव्ही९ डॉट कॉम वर १८ जुलै रोजी प्रकाशित एका बातमी प्रमाणे. मुंबई च्या महापौर आणि शिवसेनेच्या नगसेविका यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हि माहिती महपौर ऑफिस ने दिली.

२० जुलै रोजी प्रकाशित टाइम्स ऑफ इंडिया च्या बातमी प्रमाणे असे सांगण्यात आले कि पेडणेकर यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.

आमचे सहयोगी दैनिक जागरण चे मुंबई चे ब्युरो चीफ ओमप्रकाश तिवारी यांनी सांगितले कि किशोरी पेडणेकर पूर्णपणे स्वस्थ आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर च्या प्रोफाइल प्रमाणे ते गुरुग्राम चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा मृत्यू झाल्याचे दावा करणारी पोस्ट खोटी आहे. पेडणेकर स्वस्थ आहे आणि उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट